Thursday, October 11, 2018

डॉ बाबासाहेब आंबेडकर आम्हाला माफ करा...! तुम्ही दिलेली समता आम्ही प्रस्थापित करू शकलो नाही...! तुम्हाला राष्ट्रध्वज तिरंगा अर्पण करू शकलो नाही..!


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पहिले ते चौथी शिक्षण स्वराज्यातील सातारा गादीचे छत्रपती प्रतापसिंह भोसले यांनी स्थापन केल्या शाळेमध्ये झाले आहे.पत्रकार म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी “मूकनायक” हे वृत्तपत्र काढून समाज प्रबोधन केले तेव्हा त्यांचे कौतुक करण्यासाठी स्वराज्यातील कोल्हापूर गादीचे आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी मुंबई येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन त्यांचे कौतुक करून त्यांचे समवेत जेवण करून सर्वोतोपरी सहकार्य केले.अशा प्रकारे इतिहासाचे जाणकार असणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना समतावादी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या माध्यमातून समतावादी छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास समजला त्यामुळे त्यांना “बुध्द” समजले.बुध्द समजल्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वारकरी सांप्रदाय समजाला आणि या सर्वांचा शोध म्हणून तीन दिवस त्यांनी सिंहगडावर मुक्काम केला.त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना “तुळापुर” आणि “वढू बुद्रुक” चा इतिहास समजला.छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येमुळे त्यांना “मनुस्मृती” समजली.”मनुस्मृती” समजल्यामुळे भीमा कोरेगावची लढाई समजली.यासर्व गोष्टी समजल्यामुळे त्यांना सिंधू संस्कृती समजली आणि सिंधू संस्कृती समजल्यामुळे प्राचीन भारत देश समजला आणि त्यातील कृषी संस्कृती समजली.कृषी संस्कृती समजल्यामुळे त्यांनी “रुपयाची समस्या” हा  प्रबंधक” लिहिला.त्यामुळे  भारत देश कसा घडवावा लागेल हे त्यांच्या लक्षात आले त्यामुळे “नदीजोड प्रकल्प” राबविण्यावर त्यांचा जोर होता आर्थिक नीती कशी असावी हे त्यानी ठरविले होते.परंतु या सर्व गोष्टी करायला अडचण काय....? तर त्याचे उत्तर त्यांना मनुस्मृतीच्या माध्यमातून मिळालेच होते.त्यामुळे इथला “कर्मकांड” व “मनुस्मृतीचा कायदा” आणि हे सर्व राबविणारी इथली पेशवाईतील “मनुवादी व्यावस्था” ह्या सर्व जबाबदार आहेत हे त्यांच्या लक्षात आले होते.म्हणजे एकंदरीत या सर्वांचा शत्रू एकच आणि तो म्हणजे “विषमता” आणि ही विषमता मनुवादी व्यवस्थेने प्रत्येक क्षेत्रात पेरून ठेवलेली आहे. त्यामुळे त्यानी इतिहास पूर्णपणे समोर न आणता त्याकडे इशारे देत त्यानी त्यांचे कार्य सुरु करण्याचे ठरविले होते.छत्रपती राजश्री शाहू महाराज यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेतल्या नंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे गुरु संत कबीर व महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचारावर कार्य करण्याचे ठरविले.मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात कोणतेही पाठबळ नसताना एकटा माणूस बौध्द विचार घेऊन तसेच सम्राट अशोकाचे बौध्द साम्राज्य डोक्यात ठेऊन देश घडवायला निघाला होता.इथला अस्पृश्य यांचा लढा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेसाठी क्षम्य होता....त्यांचा खरा लढा होता तो मनुवादी व्यवस्थेच्या विरोधातील “भारत देश” आणि त्या दिशेने त्यांनी आपली पावले टाकली होती. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना पूर्णपणे लढा समजला होता त्याचे स्वरूप त्यांना समजले होते म्हणून त्यानी भारत देश जर घडवायचा असेल तर “समता” केंद्रस्थानी ठेवली पाहिजे.आणि जो पर्यंत “समता” या भारत देशात प्रस्थापित होणार नाही तो पर्यंत भारत देश घडविला जाणार नाही याची पूर्ण जाण डॉ बाबासाहेब आंबेडक  यांना झाली होती.आणि इतिहासात हीच “समता” प्रस्थापित व्हावी यासाठी शंभूराजे यांनी शाख्य कुलीन शाक्त पंथ स्वीकारून वयाच्या चौदाव्या वर्षी म्हणजे १६७१ मध्ये विद्वान हा नेहमी भूषणावह असतो असे मान्य करून “बुधभूषण” नावाचा ग्रंथ लिहून “प्रकांड पंडित” म्हणून उदयास आले.अशा शंभूराजे यांचे सांगण्यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांनी वैदिक धर्मानुसार ६ जून १६७४ मध्ये केलेला पहिला राज्याभिषेक नाकरून तीनच महिन्यात २४ सप्टेंबर १६७४ मध्ये शाक्त पंथानुसार दुसरा राज्याभिषेक करून “शाक्त पंथाला” राजाश्रय दिला होता त्यामुळे चिडून जाऊन वैदिक धर्म पंडितांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची हत्या घडविली.परंतु अंत्यसंस्कार त्यांचेवर माना सन्मानाने झाले नाहीत.त्यानंतर स्वत: शंभूराजे यांनी स्वत:चा राज्याभिषेक शाक्त पंथानुसार नुसार करून ते छत्रपती संभाजी महाराज झाले.ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली गौतमी पुत्र सिध्दार्थ यांना सत्याचा बोध झाला अशा बोधीसत्व वृक्षाच्या पानाची “राजमुद्रा” तयार करून  “समता” प्रस्थापित करण्याचे कार्य स्वराज्यात जोरात सुरु केले.त्यामुळे वैदिक धर्म पंडितांचा विषमतावादी “वर्णाश्रम धर्म” धोक्यात आल्याची त्यांना जाणीव झाली,त्यामुळे त्यानी मोगलाईला हाताशी धरून तुळापुर येथे “मनुस्मृती” प्रमाणे हत्या करून समतावादी स्वराज्य दाबण्यासाठी पेशवाईचा पाया रचला.औरंगजेबाच्या कैदेत असलेल्या शंभूराजे पुत्र शाहू महाराज यांनी वढू येथील छत्रपती संभाजी महाराज यांची ज्यांनी अंत्यसंस्कार करून समाधी उभारली त्यांना काही गावे इनामे देऊन त्यांचा सन्मान केला.परंतु छत्रपती संभाजी महाराज यांचे अंत्यसंस्कार मानसन्मानाने मनुवादी व्यवस्थेने होऊ दिले नाही.छत्रपती शिवराय यांचे गुरु संत तुकाराम महाराज यांनीही समतावादी स्वराज्य उभारणीत मोठे योगदान दिले असल्यामुळे त्यांचेही अंत्यसंस्कार मानसन्मानाने मनुवादी व्यवस्थेने होऊ दिले नाहीत.त्याच प्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांनी समतावादी राज्याभिषेक डोळ्या समोर ठेऊन २४ सप्टेंबर या समतावादी राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून महात्मा ज्योतिबा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना करून समतावादी समाज निर्माण केला.त्यामुळे या मनुवादी व्यवस्थेने त्यांचेही अंत्यसंस्कार मानसन्मानाने होऊ दिलेले नाहीत.आणि या सर्व गोष्टीची साक्ष इतिहास आपल्याला देत आहे.अशा या २४ सप्टेंबर समतावादी राज्याभिषेक दिनाचे आणि सत्यशोधक समाज स्थापनेचे औचित्य साधून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी “समता” प्रस्थापित करण्यासाठी प्रथम समतेचे संरक्षण व्हावे हा दृष्टीकोन ठेऊन २४ सप्टेंबर १९२४ मध्ये “समता सैनिक दल” स्थापन केले आहे.या समता सैनिक दलाच्या सदस्यांना आदर्श अशी आचारसंहिता देऊन डॉ बाबासाहेब आंबेडक यांनी समतावादी छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा बदला स्वराज्याचे सरदार सिद्धानाक महार यांनी भीमा कोरेगाव येथे घेऊन जातीयवादी पेशवाईचा अंत केला.अशा शूर वीरांना भीमा कोरेगाव येथे येऊन त्यांना मानवंदना करून भीमा कोरेगाव येथून ७ कि.मी.वर असलेल्या वढू ब्रुद्रुककडे हात करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी असे उद्गार काढले आहेत की.”जो इतिहास वाचणार नाही तो इतिहास घडविणार नाही” म्हणून इतिहासाकडे आपले लक्ष वेधले आहे.”समता” प्रस्थापित करायची असे ठरविलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीने लादलेला सप्तबंदीचा कायदा मोडीत काढण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह यशस्वी केला आहे.स्वराज्याची राजधानी असलेल्या राजगडाच्या परिसरात मनुस्मृतीचे दहन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी विषमतेच्या विरोधात समतेचे पाऊल टाकून मनुवादी व्यवस्थेला मोठा हादरा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या या लढ्याची प्रचीती म्हणून ब्रिटीश सरकारने भारताला स्वातंत्र्यता देण्याचे पहिले पाऊल म्हणून “गोलमेज परिषद” स्थापन करून भारताचा लोकव्यावस्थेचा आढावा घेण्यासाठी इथल्या भारतीय निवासी यांना न्याय देण्यासाठी “सायमन कमिशन” भारतात पाठविले होते.परंतु इथल्या काँग्रेसी मनुवादी व्यावस्थेने सायमन कमिशनला विरोध केला होता.सायमन कमिशन भारतातून इंग्लंड मध्ये गेल्यावर १९३० मध्ये ब्रिटीश सरकारने भारत स्वतंत्र करणार असल्याचे जाहीर करून इथल्या जनगननेनुसार राजव्यास्थेमध्ये भागीदारी कशी असावी यासाठी गोलमेज परिषेदेच्या बैठीकीचे आयोजन १९३१-३२ मध्ये केले.मोहन करमचंद गांधी यांचे निकटवर्तीय पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी लाहोर येथे २६ जानेवारी १९३० मध्ये कॉंग्रेसचा झेंडा फडकाऊन भारत देशाचा स्वातंत्र दिवस साजरा केला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मागासवर्गीय लोकांचे गोलमेज परिषदेमध्ये प्रतिनिधित्व करून त्यांची भागीदारी कशी राहील याची मांडणी १९३१ च्या पहिल्या जनगननेनुसार केली होती.परंतु कॉंग्रेसचे नेते मोहन करमचंद गांधी यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाला कडाडून विरोध केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटीश सरकारकडी मगासवर्गीयांची मांडलेली भागीदारी कॉंग्रेसला मान्य झाली नाही.त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मागणी पूर्ण करू नये अशी भूमिका घेऊन संपूर्ण देश पेटविण्याची भाषा करून गोलमेज परिषदेतून निघून भारतात आले.भारतात आल्यावर ब्रिटीश सरकार यांनी गांधीना अटक करून पुणे येथील येरवडा कारागृह येथे ठेवले.अहिंसेचा प्रचार करणाऱ्या गांधी यांनी येरवडा कारागृहात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विरोधात स्वत:ची हत्या करण्याचे हिसंक आंदोलन म्हणजे “प्राणांतिक उपोषण” सुरु केले.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेवर मनुवादी कॉंग्रेसकडून जीवघेणे हल्ले सुरु झाले.काँग्रेसी मनुवादी षडयंत्राला डॉ बाबासाहेब आंबेडकर झुकले नाहीत.हे पाहून मनुवादी कॉंग्रेसने मागासवर्गीय समाजावर हल्ले करून हिंसा रुजविण्याचे कार्य जोरात सुरु केले समाजाची हानी होणार हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षात आले.आपली मागणी इथल्या मागासवर्गीय समाजाच्या मानव उद्धारासाठी आहे त्याचा उपभोग घ्यायला जर तोच समाज जिवंत नसेल तर काय उपयोग होणार याची जाणीव करून २४ सप्टेंबर १९३२ मध्ये “पुणे करार” झाला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोळ्यातून प्रथम समाजासाठी अश्रू आले आणि ते म्हणजे पुणे करारावर स्वाक्षरी करीत असताना.अशा प्रकारे स्वतंत्र झालेल्या भारताचा मोहन करमचंद गांधी यांनी पुन्हा मनुवादी कॉंग्रेसला हवा असलेला लढा सुरु केला आणि तो लढा म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर विरुध्द गांधी असा होता आणि तो गांधींच्या मृत्यू पर्यंत चालला.यातच १९३५ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या धर्मात कर्मकांडाला महत्व दिले जाते माणूस म्हणून कोणाला पाहिले जात नाही अशा धर्मात राहणार नसल्याचे जाहीर केले होते ते योग्य वेळेचे आणि संधीची वाट पहात होते.१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला होता औपचारिक राष्ट्रपती म्हणून डॉ राजेंद्र प्रसाद यांनी तर प्रधानमंत्री म्हणून गांधीचे निकटवर्तीय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कारभार हाती घेतला होता.स्वतंत्र भारताची राजघटना लिहिण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशातील ८ विद्वान व्यक्तीना पत्र लिहिली परंतु सर्वानी असमर्थता दर्शविली.तेव्हा त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना स्वातंत्र भारताची राज्यघटना लिहावी म्हणून निमंत्रित केले.डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र भारताचे पहिले “कायदामंत्री” झाले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र कष्ट करून स्वत:च्या तब्येतीची कोणतीही तमा न बाळगता या स्वतंत्र भारताच्या नागरिकाला न्याय देण्यासाठी अतोनात कष्ट केले आहे.स्वतंत्र भारतात स्त्रीला हक्क व सन्मान मिळावा म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यसभेत १९५२ मध्ये “हिंदू कोड बिल” सादर केले ते मान्य केले नाही म्हणून त्यांनी राजीनामा देऊन ते बाहेर पडले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रबंधकांवर भारतीय रिजर्व बँक स्थापन झाली आहे.कामगार जो उपभोग घेत आहे तो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कष्टावर घेत आहे.स्त्रीला जो हक्क अधिकार प्राप्त झाला आहे तो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कष्टाचे फलित आहे.स्वतंत्र भारतातील प्रत्येक नागरिक स्वत:ला सुरक्षित जो समजतो तो त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसारच...त्यानी या भारतातील प्रत्येक नागरिकाला दिलेल्या नागरी हक्क संरक्षण कायद्यानुसार परंतु या कायद्याला बगल देण्याचे कार्य इथल्या काँग्रेसी मनुवादी व्यावस्थेने केले आहे हेही आपण याठिकाणी लक्षात घेतले पाहिजे.”समता” प्रस्थापित करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अतोनात कष्ट केलेले आहे.१९३५ साली ज्या धर्मात कर्मकांडाला महत्व दिले जाते माणूस म्हणून कोणाला पाहिले जात नाही अशा धर्मात राहणार नसल्याचे जाहीर केल्याप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे १४ आक्टोंबर १९५६ साली बौध्द धम्माची दीक्षा घेऊन बौध्द विचारांच्या व्यक्तीसाठी २२ प्रतिज्ञा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी विकसित करून दोनच वर्षात संपूर्ण भारत बौध्दमय करीन म्हणजे विद्वान लोकांचा देश असल्याचे जाहीर करीन अशी घोषणा केली.कारण बौध्द याचा अर्थ विद्वान असा होतो म्हणून शंभूराजे यांनी १४ व्या वर्षी विद्वान हा भूषणावह असतो असे म्हणून “बुधभूषण” नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याच विद्वान लोकांचे साहित्य निर्माण करणारी “बुध्दभूषण” नावाची प्रिटींग प्रेस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारली होती.छत्रपती संभाजी महाराज यांनी सिंधू संस्कृतीच्या स्त्री शक्तीला व गौतम बुद्धांना प्रमाण मानून शाक्त पंथ पद्धतीत स्वत:चा राज्याभिषेक करून बोधीसत्व वृक्षाच्या पानावर राजमुद्रा काढून समतावादी राज्य निर्माण केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून भारत देशाची वाटचाल समतेच्या दिशेने नेली आहे.आणि त्यासाठी बौध्द विचारांच्या व्यक्तीला २२ प्रतिज्ञाच्या माध्यमतून सिंधू संस्कृती देऊन त्या २२ प्रतिज्ञा मधील १० वी प्रतिज्ञा ”मी समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीन” अशी दिली.त्यामुळे मनुवादी व्यावस्था हादरून गेली “समता” प्रस्थपित झाल्यास आपली मनुवादी व्यवस्था आणि धर्म व्यवस्था अडचणीत येईल त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी दिलेले विचार राहिले नाही पाहिजे.जसे छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या घडवून त्यांचे विचार दाबले गेले त्यांचेवर अंत्यसंस्कार मानासन्मानाने केले नाही.त्यांचे विचार बराच काळ दडवून राहिले.त्याप्रमाणे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा घात झाला दिल्ली येथे रहात्या घरी ६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर रात्री झोपल्या नंतर ते सकाळी उठलेच नाही छत्रपती शिवाजी महाराज यांचेही असेच झाले त्यांना तर अग्नीही दिला गेला नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू संशयित ठरला त्यांचे पोस्टमार्टम त्याकाळी मनुवादी यांनी होऊ दिले नाही.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जवळ त्यावेळी कोणी विश्वासू व्यक्ती नव्हता.त्यांच्या महापरिनिर्वाणाची खबर वाऱ्यासारखी महाराष्ट्रात पसरली दु:खाचे डोंगर सर्वावर कोसळले होते.भारत देशाचे तत्कालीन प्रधानमंत्री कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे घरी आले त्यांनी त्यांचे दर्शन घेतले.त्यांचेवर दिल्ली येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश त्यांनी शासन व्यवस्थेला दिले नाही त्यानी दर्शन घेतले व ते निघून गेले.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पार्थिव देहावर कुठे अंत्यसंस्कार करायचे काही ठरले नाही.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर हे मुंबई येथील राजगृही होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर २ वर्षाचे होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त या देशाला आणि इथल्या नागरिकांना न्याय देण्यासाठी आपले जीवन वेचले होते स्वत:साठी किंवा आपल्या कुटुंबासाठी त्यांनी कधी पैसे कमाविले नाही त्यांनी त्यागच केला आहे.त्यामुळी आता दिल्ली मधून पार्थिव देह मुंबईत कसे आणायचे विमानाची तजवीज कशी करायची आणि तजवीज केली तर त्या विमानाचे भाडे कसे द्यायची कोण जाणे त्या सूर्यपुत्राने म्हणजे भैय्यासाहेबानी काय तजवीज केली असेल विमानाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पार्थिव देह मुंबईत आणले गेले.ज्या भारताचे घटनेचे शिल्पकार म्हणून आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतो अशा भारत देशात स्वत:ची सेना असताना त्या सेनेची विमाने असताना,हेलिकॉप्टर असताना कोणतीही तजवीज या भारत देशाच्या राजकीय व्यवस्थेने आणि प्रशासन व्यवस्थेने केली नाही ही या देशातील प्रत्येक नागरिकाची शोकांतिका आहे.मुंबईत राजगृहावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पार्थिव देह आणल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी कोठेही जागा उपलब्ध होऊ शकली नाही.शासकीय इतमामाची कोणतीही तयारी नव्हती सामन्य व्यक्ती मृत्यू पावल्याची परिस्थिती निर्माण झाली होती.त्यामुळे देशाच्या घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना तिरंगा ध्वज अर्पण करण्यात आलेला नव्हता.राजगृहामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांनीच स्थापन केलेला शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचा ध्वज अर्पण करण्यात आलेला होता.खूप वाद झाल्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मुंबईत त्यांना जागा उपलब्ध झाली.त्यामुळे अशा घटनाकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही राष्ट्रध्वज तिरंगा देऊ शकलो नाही त्यांचेवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करू शकलो नाही म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर आम्हाला माफ करा तुम्ही दिलेली समता आम्ही प्रस्थापित करू शकलो नाही.

                                                     धन्यवाद


                                                 राजेश नारायण खडके
                                           समन्वयक सकल मराठी समाज
                                                मो.नं.९८८१७९५३०७

No comments:

Post a Comment