Thursday, June 6, 2019

शुद्र म्हणून हिणवीत आलेल्या वैदिक धर्म पंडितांचा राज्याभिषेक शिवरायांनी नाकारला आहे असे असताना आपण तो साजरा करून त्यांच्या विचारांचा अपमान तर करीत नाही ना…?


 
                    शिवरायांनी स्वराज्य स्थापन करून इथल्या रयतेला समतावादी राज्य असल्याचा विश्वास दिला...परंतु जो पर्यंत शिवराय राज्याभिषेक करीत नाही तो पर्यंत स्वराज्याचे संविधान लागू करता येत नाही.तेव्हा माता जिजाऊ यांनी शिवरायांना राज्याभिषेक करून घेऊन छत्रपती होण्याचे आदेश दिले होते.जेव्हा शिवरायांनी राज्याभिषेक करून छत्रपती होणारा असल्याची घोषणा रयतेला दिली तेव्हा रयतेच्या आनंदाचा पारावार राहिला नाही.परंतु शिवराय छत्रपती होणे हे त्याकाळी वैदिक धर्म पंडितांना मान्य नव्हते.कारण त्यांच्या मते शिवराय हे शुद्र होते आणि शूद्रांना राजा होता येत नाही असा मनुस्मृतीचा कायदा होता...त्याकाळी फक्त शुद्र होते अतिशूद्र म्हणून कोणीही नव्हते.... अतिशुद्र म्हणजे अस्पृश्य होय हे आपण लक्षात घेतले पाहिजे.तेव्हा त्या वैदिक धर्म पंडितांच्या नाकावर टिच्चून आपण छत्रपती व्हायचे असा मनसुभा शिवरायांनी मनाशी धरलेला होता.तेव्हा त्यांनी काशीच्या गागा भट्टाकडून राज्याभिषेक करून घेण्याचे ठरविले परंतु त्यांनीही नकार दिला होता...परंतु वैदिक धर्म पंडितांचा विरोध झुगारून टाकण्यासाठी गागा भट्टाना त्यांच्या वजनाएवढ्या मोहरा देण्याचे कबूल केल्यामुळे त्यांनी राज्याभिषेक करण्याचे मान्य केले होते. परंतु शिवरायांना क्षत्रिय घराण्याशी जोडण्यासाठी त्यांनी त्यांची नाळ राजपूत असलेल्या शिसोदिया घराण्याशी जोडून शिवरायांचा राज्याभिषेक केला त्यामुळे शिवराय छत्रपती झाले.संपूर्ण जगाला शिवराय छत्रपती झाले हा संदेश तर पोहचला परंतु हे रयतेचे स्वराज्य आहे आणि समतावादी विचारांचे आहे याचाही संदेश पोहचला.तरीही इथले वैदिक धर्म पंडित त्यांना छत्रपती मानण्यास नकारच देत होते.
              रयतेच्या सुखासाठी राजपूत घराण्याशी त्यांनी नाळ जोडली आणि गागा भट्टाच्या वजनाएवढे मोहरा देऊनही हे आपणास शुद्र म्हणून हिणवीत असतील तर माझ्या रयतेचे काय हाल करीत असतील याचा सारासार विचार करून छत्रपती शिवरायांनी वैदिक राज्याभिषेक नाकारण्याचे ठरविले.तेव्हा शाक्त पंथीय शंभूराजे यांनी त्यांना शाक्त पंथीय राज्याभिषेक करण्यास सांगितले तेव्हा छत्रपती शिवरायांनी राजपूत शिसोदिया घराणे नाकारून मनुस्मृती मान्य वैदिक धर्म पद्धतीतील राज्याभिषेक नाकारून शाक्त पंथीय राज्याभिषेक करून घेऊन ते समतावादी विचारांचे छत्रपती शिवाजी महाराज झाले.त्यामुळे छत्रपती शिवराय यांनी नाकारलेला ६ जूनचा राज्याभिषेक साजरा करणे म्हणजे त्यांच्या विचारांना तडा देणे होय.त्यामुळे ६ जूनचा राज्याभिषेक करूनही शुद्र म्हणून हिणवीत आलेल्या वैदिक धर्म पंडितांचा राज्याभिषेक शिवरायांनी नाकारला आहे असे असताना आपण तो साजरा करून त्यांच्या विचारांचा अपमान तर करीत नाही ना…?

No comments:

Post a Comment