Monday, September 23, 2019

कसबा विधानसभा मतदार संघात VBA चाच उमेदवार विजयी होणार...सक्षम उमेदवार देण्यास भाजप असक्षम…! राजेश खडके


           कसबा विधानसभा मतदार संघात संघाचे कार्यालय म्हणजे मोतीबाग आहे...आणि या मोतीबागेची पकड या मतदार संघात मजबूत रहावी म्हणून संघ कार्यकर्त्यानी नेहमी विधानसभेच्या गिरीष बापट यांना मजबूत करण्याचे कार्य केले आहे.या संघ कार्यकर्त्यानी टिळक घराणे कधीही या मतदार संघात उभे राहू दिलेले नाही.याचाच फायदा घेत गिरीष बापट यांनी स्वत: विरोधात कधीही प्रतिस्पर्धी उभा राहू दिलेला नाही...आणि याचाच परिपाक म्हणून गिरीश बापट खासदार झालेनंतर भाजपाला सक्षम असा उमेदवार आजच्या परिस्थितीत देता येईना.कॉंग्रेसची परिस्थिती जर पाहिली तर फारच भयानक परिस्थिती झालेली आहे.२०१४ मध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस असे दोन्ही पक्ष वेगळे वेगळे निवडणूक लढल्यामुळे मतांचे विभाजन झाले आणि राष्ट्रवादीच्या दीपक मानकर यांनी १० हजार मते खाल्यामुळे मतांचे विभाजन होऊन कॉंग्रेच्या रोहित टिळक यांचा पराभव होऊन गिरीष बापट निवडून आले.नंतरच्या काळात कॉंग्रेसचे उमेदवार रोहित टिळक आजच्या परिस्थितीत बलात्कारच्या केसमध्ये गुंतले आहेत.तसेच अपक्ष नगरसेवक रवींद्र धंगेकर कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले आहेत त्यांना कॉंग्रेस मधून उमेदवारी मिळणार नाही याची शाश्वती झाल्यामुळे ते कॉंग्रेस कडून उमेदवारी लढण्यास इच्छुक आहे असे म्हणता येणार नाही.परंतु यांची लोकप्रियता कमी करण्याचे काम गेल्या २-३ वर्षात झालेले आहे त्यामुळे ते निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असे मला वाटत नाही.त्यातच कॉंग्रेस हा निष्ठावंतांचा पक्ष असल्याचे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण पुणेशहराने पाहिले आहे. पुणेस्टेशनचे नगरसेवक अरविंद शिंदे यांची निष्ठा कमी पडल्यामुळे त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली गेली नाही.ती उमेदवारी भाजपा उमेदवार गिरीष बापट यांचे मित्र मोहन जोशी यांना दिली गेली होती आणि त्यांची निष्ठा साऱ्या पुणेशहराने पाहिली आहे.त्यामुळे कसबा विधानसभा मतदार संघातून मला उमेदवारी मिळावी म्हणून निष्ठावान काँग्रेसी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी दिल्लीला हजेरी लावलेली आहे.त्यामुळे ते उमेदवारी आणतील यात काही शंका असायचे कारण नाही असे मला वाटते.परंतु ते मतदार संघाच्या बाहेरचे आहेत आणि त्यांची पकड या मतदार संघात नाही याची चर्चा जोरदार असताना कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांचे आणि त्यांचे संबध चांगले आहे असे वाटत नाही.त्यामुळे या मतदार संघात दलितांची मते ते अरविंद शिंदे यांना ते मिळवून देतील असे वाटत नाही.आपल्याला प्रतिस्पर्धी नको म्हणून गिरीष बापट यांनी मनपा निवडणुकीत भाजपाचे गणेश बिडकर यांना निवडून आणण्यात अयशस्वी झाले आहेत.त्यामुळे स्वीकृत नगरसेवक पद मिळविण्यासाठी गणेश बिडकर यांना महापलिका भाजपा कार्यालयात हाणामारी करावी लागली असल्याचे साऱ्या शहराने पाहिले आहे.त्यामुळे याचाच फायदा घेऊन खासदार गिरीष बापट कसबा विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारीच्या रिंगणात आपल्या घरातला व्यक्ती उतरू पहात आहे.परंतु विधानसभेच्या राजकारणात तो व्यक्ती चालू शकत नाही अशी भाजपाच्या नेत्यांची धारणा झालेली आहे.त्यामुळे कॉंग्रेसकडे आणि भाजपाकडे सक्षम असा उमेदवार नसल्याच्या चर्चानी उधाण मांडले आहे.यातच आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी स्वराज्यातील अलुतेदार यांना बरोबर घेऊन वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे.हा मतदार संघ डायरेक्ट स्वराज्याला जुडत असल्यामुळे आणि शिव-फुले-शाहू- आंबेडकर यांच्या विचारांचा मतदार संघ असल्यामुळे इथला कुंभी,साळी, माळी,कोळी, कुंभार,भोई,तांबट,काची,दलित,मुस्लीम,रामोशी अशा समाजाची नाळ बांधली आहे. आणि त्यातच याच मतदार संघात स्वराज्याची लाल महालाच्या माध्यमातून पेरणी झालेली आहे.छत्रपती शिवरायांचे विचार पुर्नस्थापित करण्याचे कार्य करणारे महात्मा फुले यांचा प्रेरणा देणारी वाड्याच्या माध्यमातून समताभूमी उभी राहिलेली आहे.फुले-आंबेडकर यांच्या बरोबर काम करणारा ब्राह्मण समाज समाजवादी म्हणून तो आंबेडकरी विचारांच्या बाजूने उभा राहिलेला आहे.आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी अंजलीताई आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांच्या माध्यमातून याच मतदार संघात प्रबुध्द भारत या वृत्तपत्राचे कार्यालय ऐतिहासिक गायकवाड वाड्या समोर उभारून सर्वांची मुठ बांधण्याचे कार्य केले आहे.अशा या मतदार संघात २०१४ पासून मी कार्यरत आहे.२०१६ पासून आदरणीय प्रकाश आंबेडकर यांचा फॉलोअर्स म्हणून काम करीत आहे.त्यांचे विचार संपूर्ण समजात पोहचविण्यासाठी कार्य करीत आहे.अशा प्रकारे वंचित बहुजन आघाडीसाठी हा मतदार संघ अत्यंत मजबूत मतदार संघ म्हणून पुढे आलेला आहे.या मतदार संघातील खाचे खोसे आता मला महित झालेले आहेत.त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने ह्या मतदार संघात मला उमेदवारी दिल्यास वंचित बहुजन आघाडीचाच उमेदवार निश्चितपणे निवडून येईल अशी मला खात्री आहे.

No comments:

Post a Comment