Saturday, April 18, 2020

चीनने दिलेल्या कोरोना वायरसची भीती आम्हाला का वाटते....? रक्त तपासणी अहवाल प्राप्त न होता मृताचे निदान कोरोना…..!


        अवघ्या साडेतीन महिन्यात कोरोना म्हणजे काय हे देशातील प्रत्येक गाववस्तीच्या शेवटच्या घरा पर्यंत माहित झालेले नाव आहे.आणि त्या शेवटच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला त्या कोरोनाची दहशत बसलेली आहे.परंतु या कोरोनाची एवढी दहशत घेणे गरजेचे आहे काय काय...? असा प्रश्न आज प्रत्येक बुद्धीजीवी व्यक्तीला पडलेला आहे.तर त्याचे कारण साधे आहे आणि ते म्हणजे देशाच्या प्रधानमंत्री असणारे नरेंद्र मोदी यांनी कोरोना संदर्भात भारतीय जनतेला केलेले आवाहन येथे महत्वाचे आहे.आणि त्यांनतर न्यूज मिडीयाने कोरोना संदर्भात चालविलेल्या बातम्या येथे महत्वाच्या आहेत असे मी मानतो.एकंदरीत कुटुंब व्यवस्थेमध्ये आपल्या मुलांची आईबाप काळजी घेत असतात त्यामुळे ते त्याच्या शिक्षणावर जोर देत असतात.कोरोना वायरस हा नवीन असल्यामुळे या विषाणूचा प्रार्दुभाव जगातील मोठमोठ्या देशांना रोखता आलेला नाही.परंतु काही वैज्ञानिक संशोधक आणि डॉक्टर मंडळी यांनी असे सांगितलेले आहे की,विषाणू मुळे होणाऱ्या आजारावर उपचार पद्धत्ती अद्याप तरी विकसित झालेली नाही.त्यामुळे कोरोना विषाणूंचा प्रार्दुभाव लहान मुलावर लवकर होतो त्यामुळे शासनाने शाळा बंद करण्याचा पहिला निर्णय घेतल्या मुळे कोरोना संदर्भातील माहितीचा प्रचार आणि प्रसार प्रत्येक कुटुंबात लवकर झाला.त्यांनंतर घोषित केलेला २१ दिवसांचा देशहितासाठीचा पहिला लॉक डाऊन प्रधानमंत्री यांनी जाहीर केला आणि तो भारतीय जनतेने प्रामणिकपणे पाळला देखील आहे.आवश्यक सेवा पुरविणाऱ्या प्रशासन व्यवस्थेचे थाळी वाजवून,टाळी वाजवून,घंटा वाजवून स्वागत करण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले असता त्याचे भारतीय जनतेने मनापसून स्वागत केले आहे.परंतु नंतर दीप प्रज्वलित करावे असेही आवाहन करण्यात आल्यानंतर यामध्ये काही जणांना राजकारण दिसले असो.जनतेला वाटले की, लॉक डाऊन २१ दिवसा नंतर उठेन आणि आमची कामधंदे आणि रोजी रोटी पुन्हा सुरु होत्तील या आशेने होणारा त्रास भोगून त्याने या आवाहानाला साद देखील घातली.परंतु आवश्यक वस्तू घेण्यासाठी बाहेर पडणारा समाज आणि त्यांना सेवा पुरविणारी लोक यांच्या बद्दल पुन्हा मिडीयाने गरळ ओकून ज्यांनी प्रामणिकपणे लॉक डाऊन पाळला आहे त्यांचेवरच प्रश्न चिन्ह निर्माण केले आहे.त्यामुळे २१ दिवसांत संपुष्टात येणारा लॉक डाऊन पुन्हा मिडीयाच्या या धोरणामुळे १९ दिवसांनी वाढविला गेलेला.त्यामुळे लॉक डाऊनमध्ये शांत बसलेला समाज अस्वस्थ झाला आणि सरळ तो रस्त्यावर उतरला गेला.आता त्यामागे काही ठिकाणी मिडीयाच्या चुकीच्या बातम्यांचा दूषपरिणाम आपल्याला दिसून आलेले आहेत.काही लोकांनी तर रस्यावर धुमाकूळ करीत अक्षरशा लुट केली असल्याच्या बातम्या मिडीयाने प्रसिध्द केलेल्या आहेत.त्यामुळे कोरोना वायरससाठी असणारा लॉक डाऊन आता लोकांना स्वत:ची कैद वाटू लागलेली आहे हे मात्र तेवढे खरे आहे.लॉक डाऊनमुळे सर्वात प्रथम हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब मजुरांच्या पोटा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला त्यांना मदत करण्यासाठी काही लोक पुढे आले त्यांना अन्न पाणी वाटू लागले.परंतु ज्यांना अन्न वाटत होते त्यांचे फोटो ते वायरल करू लागले त्यामुळे त्यांच्या स्वाभिमानीपणाचा प्रश्न निर्माण झाला आणि ते म्हणून लागले की “आम्ही मजबूर आहोत...परंतु भिकारी” त्यामुळे अन्न वाटप कमी झाले कारण ज्यांना अन्न वाटायचे होते त्यांना प्रसिद्धीसाठी फोटो हवा होता.अशातच पुन्हा मिडीयाच्या बातम्या उचल खाऊ लागल्या आज इतके कोरोनाचे रुग्ण सापडले,तितके मेले,इथला एरिया सील केला,तिथला एरिया सील केला, अक्षरशा लॉक डाऊनमुळे घरात बसलेला व्यक्ती भामावून गेली आहे.तो भ्रमित झाला त्यातच पोलिसांच्या गाड्या सारख्या सारख्या सूचना देत वस्ती,वाड्यात,नगरात,गल्ली बोळात फिरू लागल्याचे दृष्य पाहून लॉक डाऊनमुळे घरात बसलेला व्यक्ती अक्षरशा घाबरून गेलेली आहे.या वेळेतच तुम्हाला जीवन आवश्यक वस्तू खरेदी करता येतील नंतर कोणीही रस्त्यावर फिरायचे नाही.तुमच्या हद्दीत कोरोना रुग्ण आढळून आलेला आहे,प्रवासी वाहतूक बंद केली आहे,खाजगी वाहनांना पेट्रोल देणे बंद केले आहे,शाळेमध्ये नवीन विद्यार्थ्यांसाठी प्रवेश होणार नाहीत.अक्षरशा पर्यटन व्यवस्था कोलमडून गेली आहे,अशा स्वरूपाच्या बातम्या रोज येऊ लागला त्यामुळे प्रत्येक नागरिकाला आपले लोक आपल्या पासून हिरावून गेल्याचे वाटत असल्याची भीती त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे.आपल्या मुला बाळांचे भवितव्य काय याचा प्रशन पडल्यामुळे तो घाबरलेला आहे.त्यातच ससून हॉस्पिटलच्या हलगर्जी कारभारामुळे तेथील कोरोना रुग्ण दगावले असल्याची तक्रार कॉंग्रेसचे पुणेशहर नेते अरविंद शिंदे यांनी केल्यामुळे तेथील ससून प्रमुख यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे. अरविंद शिंदे यांनी केलेल्या आरोपामुळे गंभीर प्रश्न उपस्थित झालेला आहे.रक्त तपासणीचा अहवाल न येता मृत रुग्ण कोरोनामुळे दगावला असे खोटे विधान ससून हॉस्पिटल यांनी जाहीर का केले असाही आरोप त्यानी लावलेला आहे.त्यामुळे पोस्टमार्टम न करता रक्त तपासणी अहवाल प्राप्त न होता मृताचे निदान कोरोना का दाखविले जाते असा आरोप करून तशी तक्रार त्यानी शासनाकडे केली आहे.त्यामुळे लॉक डाऊनमुळे घरात बसलेला व्यक्ती अक्षरशा घाबरलेला आहे.



No comments:

Post a Comment