Sunday, August 16, 2020

कॉग्रेस पक्ष असताना ब्राह्मणी व्यवस्थेला जनसंघ पक्षाची स्थापना का करावी लागली....? राजेश खडके सकल मराठी समाज

 

            गोखले-आगरकर-टिळक यांनी इथल्या प्रशासकीय व्यवस्थेवर दबाव निर्माण करण्यासाठी १८८५ मध्ये कॉंग्रेस ही संस्था स्थापन केली होती.पुढे टिळकांच्या नेतृत्वात मोहन गांधी यांचा १९१५ मध्ये तर श्री हेगडेवार यांचा १९१६ मध्ये प्रवेश झाला.टिळकांचा १९२० मध्ये मृत्यू झालेनंतर कॉंग्रेसचे नेतृत्व मोहन गांधी यांच्याकडे आले.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२४ मध्ये समता सैनिक दलाची स्थापना केल्यामुळे कॉंग्रेस मधून श्री हेगडेवार बाहेर पडले आणि त्यांनी समता सैनिक दलास पॅरेलल असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ १९२५ मध्ये स्थापन केले.त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास नेहमी ब्राह्मणी व्यवस्थेकडून अडचण निर्माण करण्याचे काम होत होते.स्वतंत्र भारतात येथील शूद्रांना समानतेचा दर्जा मिळावा यासाठी गोलमेज परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतिनिधित्व केले होते. शूद्रांना प्रतिनिधित्व देण्यासाठी सायमन कमिशन गठीत होऊन १९२९ मध्ये ते भारतात आले होते.परंतु या कमिशनला कॉंग्रेसने विरोध केला त्यामुळे शूद्रांच्या प्रतिनिधित्वचा प्रश्नासाठी संघर्ष उभा राहिला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३० मध्ये डीप्रेस्ड क्लास्सेस फेडरेशन स्थापन करून अतिमागास वर्गासाठी संघर्ष केला.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेमध्ये शुद्रांची दिलेली जातीय यादी (शेड्युल्ड कास्ट) संदर्भात १९३१ मध्ये जातीची जनगणना करण्यात आली.तर १९३५ मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करून इथल्या कामगारांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी न्याय  दिलेला आहे.

              गोलमेज परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली शुद्रांची जातीय यादी प्रमाणे जणगणना झाली.या सर्व जातीना न्याय देण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४२ मध्ये शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाची स्थापना केली त्यामुळे सर्व जाती या पक्षाकडे आकर्षित झाल्या होत्या.गावगाड्यातील बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार आणि फिरस्ते यांच्यासह  गावगाड्यातील एकतिसावा घटक म्हणजे कुणबी बरोबर घेण्यासाठी शेतकरी कामगार पक्षा बरोबर युती केलेली आहे. शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाचे १९४२ आणि १९४७ चे यश पहाता ब्राह्मणी व्यवस्था आणि कॉंग्रेस पक्ष गडबडला होता.त्यामुळे शेड्युल्ड कास्ट फेडरेशनला रोखण्यासाठी ब्राह्मणी व्यवस्थेने कॉंग्रेसच्या मदतीने ३ अक्टोबर १९५१ साली जनसंघ पक्षाची स्थपना करून हिंदूंच्या नावाखाली फोडण्यास सुरु केले.परंतु १९५२ साली शेड्युल्ड कास्ट फेडरेशन उभा रहात असताना दिसला.आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण नंतर म्हणजे १९५७ साली सुध्दा शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाला मान्यता मिळालेली होती.त्यामुळे १९६२ पर्यंत इतर जाती या शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाला आकर्षित होत्या.परंतु नंतरच्या काळात रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली आणि पुढे पुढे या जाती दूर होत जाताना दिसल्या आहेत.या गावगाड्यातील शेड्युल्ड कास्ट (जातीच्या यादी) प्रमाणे जे वर्गीकरण करण्यात आले जसे SC,ST,NT,VJNT,OBC यांची मते वळविण्याचे कॉंग्रेस,जनसंघ आणि कॉम्रेडच्या माध्यमातून काम करण्यात आले.परंतु आज आदरणीय प्रकाश आंबेडकर या गावगाड्यातील प्रत्येक जाती शोधून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न करताना दिसत आहे.पुढे त्या सर्व गावगाड्यातील जातींची यादी आपण पाहूयात....(क्रमशJ

 

1 comment: