Thursday, October 26, 2017

भाग - ४ लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या बावीस प्रतिज्ञा.......!

भाग - ४
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या बावीस प्रतिज्ञा.......!
गणपती - : आज आंम्ही शिक्षण घेतलेले लोक आहोत....सत्य असत्य आम्हाला समजते.चंद्र सूर्य तारे थोडक्यात आकाशगंगा आम्हाला माहित आहे...आम्हाला याचीही जाणीव आहे की,निसर्ग नियमानुसार जो पर्यंत नर आणि मादी एकत्र येत नाही.तो पर्यंत जन्म नावाची प्रक्रिया घडत नाही.त्यामुळे स्त्री आणि पुरुष यांचे नैसर्गिक मिलन होत नाही तो पर्यंत माणसाचा जन्म होत नाही.तुमचे आणि माझे सत्य असे आहे की,आपल्या आई - बाबांनी नैसर्गिक मिलन केले म्हणून आपला जन्म सत्य आहे.त्यामुळे गणपतीचा जन्म थोतांड आहे.प्रश्न असा आहे की,ज्या शंकराला गणपतीचा बाप दाखविलेला आहे....त्याच्या गळ्यात साप दाखविलेला आहे...आणि पाणी त्याच्या डोक्यातून येते असे दाखवून त्याच्या कमरेला वाघाची लंगोट दाखविलेली आहे....आणि त्याच्या अंगामध्ये जानवे दाखविलेले नाही.सरळ सरळ तो जंगलात राहणारा आदिमाणुस दाखविलेला आहे....आणि गणपतीचा जन्म शरीराच्या घामातून निघालेल्या मळापासून निसर्ग नियमांच्या विरुध्द दाखविलेला आहे....त्यामुळे तो नैसर्गिक जन्म दाखविलेला नाही....तो एक काल्पनिक जन्म आहे....त्यामुळे माझ्यासारखा सुज्ञ आणि शिकलेला व्यक्ती याला सत्य म्हणून मान्यता देऊ शकत नाही.माझी बुद्धी कोणाकडे मी गहाण ठेवलेली नाही.माझ्या मानसिकतेवर कोणाचा ताबा नाही...कोण मला म्हणेल गणपतीचे कापलेल्या शिराच्या जागी हत्तीचे शीर वसवून पहिली सर्जरी भारतात केली आहे...असे म्हणून त्याची जाहिरात करून आमच्या मानसिकतेवर ताबा मारेल...तर असे मी होऊ देणार नाही.मला हे माहित आहे...जन्म झाला की,मृत्यू होतो...आणि मृत्यू झालेला प्राणी पुन्हा जिवंत होत नाही.मी भारताचा नागरिक आहे एवढा वेडा नाही की,कोणी मला काहीही सांगेल....आणि ते मी मान्य करेन..! श्रद्धा कोठे ठेवायची आणि कोणावर ठेवायची याची मला जाण आहे...म्हणून मी गणपती मानणार नाही....आणि त्याची उपासना करणार नाही.
४) देवाने अवतार घेतले, यावर माझा विश्वास नाही.

No comments:

Post a Comment