Thursday, October 26, 2017

भाग - ३ लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या बावीस प्रतिज्ञा.......!

भाग - ३
लाल महालावरील कब्जा शनिवार वाडा....आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या बावीस प्रतिज्ञा.......!
आपण पहिल्या भाग १ व २ मध्ये ब्रम्हा विष्णू महेश राम समजून घेतला आणि त्याला का मानणार नाही आणि त्याची उपासना करणार नाही हे समजून घेतल आहे.आता कृष्ण गौरी आणि गणपती का मानायचे नाही हे समजाऊन घ्यायचे आहे.
कृष्ण -:वासुदेव पुत्र म्हणजे कृष्ण आणि राजा कंस याचा भाचा आणि या भाच्याने आपल्या मामाचा अंत केला असे दाखविलेले आहे.....आणि कृष्णाचा भाऊ म्हणजे हातात नांगर घेऊन दाखविलेला बलराम....!विषय असा आहे की,वासुदेव हा ब्राह्मण आहे.आणि कंस हा इथला राजा आहे.आता याठिकाणी एक प्रश्न असा उपस्थित होतो की,कंस राजाची हत्या वासुदेवाचा आठवा पुत्र म्हणजे कृष्णाच्या हातून होणार होती अशी आकाशवाणी दाखविण्यात आलेली होती...आणि कंस याने आपली बहिण देवकी आणि तिचा नवरा वासुदेव या दोघांना एकाच ठिकाणी एकत्र तुरुंगात ठेवले आणि तिला आठवा पुत्र होण्याची वाट बघत होता....आणि प्रत्येक मुलाची तो हत्या करीत होता.एवढा जर तो क्रूर होता तर त्याने सर्वप्रथम या दोघांपैकी एकाची हत्या का केली नाही किंवा यांना पुत्र होऊ नये म्हणून वेगवेगळे का डांबले असा माझा प्रश्न आहे.तो दोघांना एकत्र ठेऊन आठव्या मुलाची वाट बघत प्रत्येक मुलाची हत्या का करीत होता याचा अर्थ सरळ सरळ हे थोटांत आहे असे काही घडलेले नाही.या कृष्णाचे जीवन टवाळक्या करणार पोर आणि आणि आंघोळ करीत असलेल्या महिलांची छेडछाड करणार व्याभिचारी पोर असे त्याचे चित्र दाखविलेली आहे.आणि स्त्रीचे ज्याने पाहिलं अपहरण केले तो म्हणजे कृष्ण होय.ज्याने महाभारत घडविले म्हणजे आपल्या आप्तांची पाच पांडवांना ज्याने हत्या करायला लावली.या महाभारतात असे दाखविलेले आहे की.एका स्त्रीचा पाच जणांनी पती म्हणून भोग घ्यायचा...त्या स्त्रीला संपूर्ण राज दरबारात वस्त्रहीन दाखविलेले आहे.म्हणजे आपल्या आप्तांची हत्या आणि स्त्रीची विटंबना या कृष्ण रुपी महाभारतात दाखविलेली आहे.म्हणजे अशा कृष्णाला समाजात मान्यता देणं आणि त्याच्या कृत्याला सामाजिक आणि कायदेशीर मान्यता देणं हे गैर आहे.म्हणून अशा कृष्णाला मी मानणार नाही...आणि त्याची उपासना करणार नाही.
तिसरी प्रतिज्ञा -: ३) मी गौरी-गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देव-देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
गौरी - : विषय असा आहे की,ज्या ठिकाणी आपण महेश अमान्य केला आणि त्याचे अस्तित्व आपण मान्य करीत नाही.तर त्याचे पुत्र गौरी गणपती मान्य करता येत नाही ही एक काल्पनिक कथा आहे...आणि गणपतीचा जन्म कल्पनेपलीकडला असून त्याला मान्यता....(क्रमश:)

No comments:

Post a Comment