Thursday, October 26, 2017

भाग-:११ व १२ लाल महालावरील कब्जा शनिवार वाआणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या बावीस प्रतिज्ञा.......!

भाग-:११
लाल महालावरील कब्जा शनिवार वाआणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या बावीस प्रतिज्ञा.......!
चौदावी प्रतिज्ञा -: १४) मी चोरी करणार नाही.
चोरी हा अतिशय वाईट विषय आहे मग ती घरात गुपचूप चुसून करणे असो......वा दरोडा घालून असो....वा विश्वासघात करून असो......!
उदा-क्र.१ सिंधू (हिंदू) ही भारताची संस्कृती होय....याची आर्यांनी चोरी करून त्यावर हिंदू धर्म लादून मानवी जीवनाचे वाटोळे केले आहे.
उदा – क्र.२ गौतम बौध्द ह्याला विष्णूचा अवतार दाखवून त्याच्या विचारांची चोरी या वैदिक धर्म पंडितांनी केली आहे.
उदा – क्र.३ महेश निर्माण करून शिवलिंग मंदिराची चोरी या वैदिक धर्म पंडितांनी केली आहे.
उदा – क्र.४ नैसर्गिक जन्म न घेतलेल्या काल्पनिक जन्म घेणाऱ्या गणपती काल्पनिक महेशाचा पुत्र दाखवून शिवलिंग मंदिराच्या भक्तांची चोरी वैदिक धर्म पंडितांनी केली आहे.
उदा – क्र.५ संताची हत्या करून वारकरी सांप्रदाय यांची चोरी वैदिक धर्म पंडितांनी केली आहे.
उदा – क्र.६ लाल महालची चोरी करून त्यावर शनिवार वाडा उभा करून स्वराज्याची चोरी या वैदिक धर्म पंडितांनी केली आहे.
चोरी झाल्यामुळे मुलनिवासी यांचे अतोनात न भरून निघणारे नुकसान झाले आहे.बौध्द विहारंची चोरी करून येथील भारत बदल्यांचे काम त्यांनी केले आहे.....आणि ज्या व्यक्तीच्या घरात गुपचूप चोरी होती त्याला विचारा त्याचे काय नुकसान होते ते.....ज्याच्या घरात दरोडा पडला आहे त्याला विचारा काय हालत होते ते....आणि विश्वासघात करून ज्याने चोरी केली अशा बहुजन समाजाला विचारा त्याची काय हालत झाली आहे....आणि आज त्या खऱ्या मावळ्यांच्या वंशजाना आणि दलितांना विचारा त्यांच्या स्वराज्यातील योगदानाची चोरी केली गेली तर आज त्यांचे काय हाल झाले आहेत ते......म्हणून मी चोरी करणार नाही.


 भाग-:१२
लाल महालावरील कब्जा शनिवार वाआणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या बावीस प्रतिज्ञा....!
पंधरावी प्रतिज्ञा -: १५) मी व्यभिचार करणार नाही.
व्यभिचार समाजाचा आणि कुटुंबाचा खूप मोठा शत्रू आहे.......व्याभिचाराला दुसरे नाव चंगळवाद म्हटल जाते.आपल्या महापुरुषांनी सामाजिक जीवनात कधीच महत्व दिले नाही. व्यभिचार (चंगळवाद) ही संस्कृती आपली म्हणजे हिंदू संस्कृती नाहीये. ही संस्कृती परकीय देशातून आलेली आहे.पूर्वी व्यभिचार (चंगळवाद) आपल्या देशातील लोकांना माहित नव्हता.जेव्हा आर्यांनी आपल्या संस्कृती वर आक्रमण केले तेव्हा त्यानी ब्रह्मा विष्णू महेशाची निर्मिती केली.इंद्रलोक स्थापन करून त्याचा राज दरबार निर्माण करून मेनका-अप्सरा-रंभा अशा नर्तीकी निर्माण करून स्वर्गलोकात असा आनंद प्राप्त होतो.अशा पद्धतीचा व्यभिचार (चंगळवाद) उभा करून येथील राज घराण्यांना नादी लावण्याचे कार्य करून त्यांची सत्ता आपल्या ताब्यात घेण्याचे काम त्यांनी केली....आणि असा समज निर्माण केला जो नेतृत्व करतो त्याला हे सर्व भोगण्याचा अधिकार आहे.त्यातून त्यांनी आपल्या राजनीतीतील नऊ नितीपैकी व्यभिचार (चंगळवाद) वापरून इथल्या संस्कृतीवर घाला घातला आहे......गाव प्रशासनातील पाटील यांच्यावर याच व्यभिचार (चंगळवाद) पगडा बसविण्याचे कार्य केले....आणि इतिहासात उत्तम उदाहरण द्यायचे झाले तर मी रांजाच्या गुजर पाटलांचे देईन.जेव्हा व्याभिचार प्रकरणी त्याला शिवरायांच्या समक्ष उभा केला तेव्हा तो शिवरायांना हेच म्हणाला की,आम्ही पाटील आहोत आणि कोणतीही स्त्री भोगण्याचा मला अधिकार आहे....आणि त्यात तुला पडायचे कारण नाही.तेव्हा शिवरायांनी त्या गुजर पाटलाचा चौरंगा केलेला आहे.
ज्या लाल महालातून स्वराज्याची बी रोवले गेले त्याच लाल महालावर ताबा मारून त्याचा शनिवार वाडा करून पेशव्यानी व्यभिचार (चंगळवाद) मनसुरादपणे भोगला आहे.श्रीकृष्णाला व्यभिचारी दाखवून भगवतगीतेच्या माध्यमातून तो सामान्य जनतेपर्यंत पोहाचविलेला आहे.मराठी चित्रपटात अभिनेता निळू फुले यांच्या माध्यमातून पाटील कसा व्यभिचारी (चंगळवादी) असतो हे दाखवून मराठ्यांचे स्वराज्यातील योगदान संपविण्याचे कार्य याच मनुवादी षडयंत्राने दाखविलेले आहे.युरोपातील व्यभिचारी (चंगळवादी) पाश्चात्य संस्कृती भारतात आणून येथील तरुणांना त्याच्या नादी लावण्यासाठी पब क्लब,डान्स बार,वैश्या व्यवसाय आणि हिंदी मराठी चित्रपटात स्त्रीला नग्न दाखवून इथला तरुण भ्रमित करण्याचे कार्य यांनीच केले आहे.गणेश उत्सवाच्या माध्यमातून व्यभिचारी (चंगळवादी) जोपासण्याचे कार्य यांनीच केले आहे.त्यामुळे येथील तरुणाचे तर वाटोळे झालेच आहे.परंतु देशाचे आणि समाजाचे पर्यायाने स्वत:च्या कुटुंबाचे वाटोळे झालेले आहे.त्यामुळे मी व्यभिचार करणार नाही.

No comments:

Post a Comment