Saturday, October 19, 2019

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमाणे धम्म चक्र प्रवर्तन दिनात तेवढेच महत्व छत्रपती शिवाजी महाराज यांना दिले पाहिजे...! राजेश खडके सकल मराठी समाज


आजची परिस्थिती पहाता भारत देश हिंदू राष्ट्राकडे वाटचाल करीत असताना आपल्याला पहायला मिळत आहे.हजारो वर्षाचे आर्य सनातनी ब्राह्मण समाजाचे हे स्वप्न
आहे आणि हे स्वप्न नेहमी भंग होत असल्यामुळे यावेळी त्यांनी संपूर्ण ताकत प्राणपणाला लावलेली आहे. म्हणून सध्याचे धम्म चक्र प्रवर्तन वर्ष खूप महत्वाचे आहे असे मला वाटते. धम्म चक्र प्रवर्तन हे एक समतेचे चक्र आहे आणि वर्षानुवर्ष हे चक्र फिरतच असते.ज्या कोण्या व्यक्तीचा धम्म म्हणून आभ्यास झालेला असेल आणि धम्म म्हणजे काय हे जर त्याला समजले असेल तर नक्कीच या धम्म चक्र प्रवर्तन दिनात तो सहभागी झाल्याशिवाय रहात नाहीत.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या धम्माचे महत्व आपल्याला समजाविले आहे.जो समजला त्याने छत्रपती संभाजी महाराज समजावून घेतले पाहिजे आणि जो हे समजून घेईन तो छत्रपती शिवराय आणि स्वराज्य हे एक धम्म चक्र प्रवर्तन आहे हे तो मान्य करेन आणि त्याला हे करावेच लागेल.कारण समतेच्या चक्रातून आपण वारकरी सांप्रदाय आणि संताना दूर ठेवू शकत नाही अशा वारकरी संप्रदाय यांचा फेरा समता म्हणून असाच सुरु राहिलेला आहे त्यातील संत तुकाराम महाराज यांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी गुरु मानले तर संत कबीर यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरु मानले आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे म्हणून धम्म चक्र प्रवर्तन दिनात जेवढे महत्व आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना देतो तेवढेच महत्व आपण छत्रपती शिवाजी महाराज यांना दिले पाहिजे असे मला वाटते. त्याच प्रमाणे हे समतेचे चक्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर स्तिराविले होते.परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून त्यांचे समतेचे विचार जनतेमध्ये पोहचवावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी वैदिक धर्म पद्धत्ती मधील झालेला ६ जूनचा राज्याभिषेक नाकारून २४ सप्टेंबर १६७४ हा शाक्त पंथीय राज्याभिषेक करून समतावादी स्वराज्य निर्माण केले आहे.त्याच दिनाचे औचित्य साधून महात्मा ज्योतिबा यांनी यांनी २४ सप्टेंबर १८७३ मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे.आणि या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर १९२४ मध्ये समता सैनिक दल स्थापन केले आहे.
आता आपण धम्म समजून घेऊ या...गौतमी पुत्र सिध्दार्थ यांनी या धम्माचा शोध लावला आहे.आणि धम्म म्हणजे मानव कल्याणकारी विचार होय…! म्हणून प्राणिमात्राला सदैव जगण्याचा अधिकार आहे….आणि त्याला जगण्यासाठी आवशयक लागतो तो म्हणजे श्वास होय.आणि श्वास जिवंत ठेवायचा असेल तर त्याला लागते ऑक्सिजन..हेच ऑक्सिजन तुम्हाला २४ तास पुरविण्याचे कार्य पिंपळाचे वृक्ष करते.याच पिंपळाच्या वृक्षाखाली ह्याच सत्येचे ज्ञान गौतमी पुत्र सिध्दार्थ यांना झाले म्हणून या पिंपळाच्या वृक्षाला बोधिसत्व असे नाव पडले...आणि खऱ्या विद्वांची ओळख याच याच वृक्षाचे म्हणजे पिंपळाचे पान देते म्हणून भारताचा भारतरत्न पुरस्कार याच पिंपळाच्या पानावर दिला जातो.छत्रपती संभाजी महाराज यांनी याच पिंपळाच्या पानावर आपली राजमुद्रा कोरलेली होती.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला या धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमातून बाहेर ठेवता येत नाही.
गौतमी पुत्र सिध्दार्थ यांना ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्यांनी भगवे वस्त्र परिधान केले त्यामुळे लोक त्यांना भगवान गौतम बुध्द म्हणू लागले आणि त्या भगव्या वस्त्राला एवढे महत्व प्राप्त झाले की भगवान गौतम बुद्धांचे अनुयायी पण हेच भगवे वस्त्र परिधान करू लागले तेव्हा पासून भगव्या वस्त्राला एक ओळख आणि एक महत्व प्राप्त झाले आहे.हेच भगवे वस्त्र सम्राट अशोक यांनी बौध्द ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपल्या साम्राज्याची समतेची ओळख म्हणून आपल्या साम्राज्याची निशाणी म्हणून हाच भगवा पताका (भगवा ध्वज) निर्माण केला.त्यामुळे खऱ्या भारताची ओळख हि सम्राट अशोक यांच्या या भगव्या ध्वजामुळेच आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.म्हणून भगव्या ध्वजाचा मानकरी जसे सम्राट अशोक आहेत तसेच तो पुन: स्थापित करण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला आहे.त्यामुळे धम्म चक्र प्रवर्तन दिनात जेवढे महत्व सम्राट अशोक यांना आहे तेवढेच महत्व छत्रपती शिवाजी महाराज यांना दिले पाहिजे असे मला वाटते.
धम्म आणि धर्म यात मोठा फरक आहे हे जाणकार यांना सांगण्याची गरज आहे असे मला वाटत नाही.विद्वान स्विकारतो तो विचार असतो आणि विचार नेहमी कल्याणकारी असतात.धम्मात कधीच धर्माला स्थान दिले गेलेले नाही असे मी केलेल्या अभ्यासातून समोर आलेले आहे.त्यामुळेच इथला आर्य सनातनी हिंदू धर्म म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती मानणारा धर्म आहे.जो चित्पावन कोणस्थ आर्य सनातनी यांनी सतराशे मध्ये पेरणी करून अठराशे मध्ये स्थापन करून गणपती ही देवता इथल्या बहुजनांच्या उरावर बसवलेली आहे.त्यामुळे इथला बहुजन आणि आर्य सनातनी हिंदू धर्माचा काही एक संबध नाही.आणि हा गणपती छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी इतिहासात पुजल्याचे कोठेही पुरावे उपलब्ध होत नाही.त्यामुळे छत्रपती शिवराय यांचे स्वराज्य हे धम्माचे स्वराज्य होते त्यामुळे धम्म चक्र प्रवर्तन दिनात तेवढेच महत्व छत्रपती शिवाजी महाराज यांना दिले पाहिजे.
इथला बहुजन याचा थेट संबध हा त्याच्या कुलदैवत असलेल्या ज्योतिबा खंडोबा जगदंबा यांचे बरोबर येतो त्याचा संबध आयोध्याचा रामा बरोबर येत नाही.त्यामुळे राम त्याची देवता होत नाही.त्यामुळे आर्य सनातनी यांनी स्थापन केलेल्या आर्य सनातनी हिंदू
धर्म आणि आयोध्याचा राम यांचा संबध येतो.परंतु महाराष्ट्रातील असलेल्या भूमीशी रामाचा कोणताही संबध येत नाही.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीही रामाला इतिहासात पुजल्याचे पुरावे सापडत नाही.त्यामुळे धम्म चक्र प्रवर्तन दिनात तेवढेच महत्व छत्रपती शिवाजी महाराज यांना दिले पाहिजे.
लिंगायत समाजाने नेहमी शिवलिंगाची पूजा केलेली आहे.शिवलिंग आणि शंकर (महेश) याचा कधीही संबध आलेला नाहीये.त्यामुळे लिंगायत समाज कधीही शंकराची म्हणजे महेशाची पूजा करीत नाही.तो पूजा करीत आहे तो शिवलिंगाची पूजा करीत असतो त्यामुळे इतिहासामध्ये शंकराची पूजा छत्रपती शिवाजी महाराज यांनी केल्याचे कुठेही पुरावे उपलब्ध होत नाहीये.त्यानी नेहमी शिवलिंगाची पूजा केलेली आहे त्यामुळे धम्म चक्र प्रवर्तन दिनात तेवढेच महत्व छत्रपती शिवाजी महाराज यांना दिले पाहिजे.
भारत देशाची खरी ओळख ही इथली बोध्द लेणी,विहार,स्तूप आहेत.भारताच्या इतिहासात तुम्हाला कधीच ब्रह्मा विष्णू महेश यांची मंदिरे सापडणार नाहीत.भारताच्या इतिहासात कधीच तुम्हाला कृष्ण व राम यांची मंदिरे सापडणार नाहीत.हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी बाबरी मशीदला राम मंदिर बनविण्याचा त्यांचा अट्टाहास सुरु आहे अष्टविनायक म्हणून देवतांची आग्रही देवता म्हणून गौरी आणि गणपती पुढे आणले गेले आहेत.त्यामुळेच डॉ बाबासाहेब आंबेडकर धम्म दीक्षेत या देवतांचे स्थान ठेवलेले नाही आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी या देवतांचे कधीही पूजन केले आहे याचे इतिहास दाखले देत नाही.त्यामुळे धम्म चक्र प्रवर्तन दिनात तेवढेच महत्व छत्रपती शिवाजी महाराज यांना दिले पाहिजे.
ज्या बौध्द लेण्यांचा विहारांचा स्तुपांचा ज्यांचा ज्यांचा आभ्यास झालेला आहे.आणि त्यानी बौध्द लेणी आभ्यासलेली आहे त्याने त्या बौध्द लेण्यात आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या धम्मात इथली सिंधू संस्कृती अनुभवलेली आहे.सिंधू संस्कृती म्हणजे सभ्यतेची संस्कृती होय…! याच सिंधू मातेने आपल्याला कृषी प्रधान संस्कृती दिलेली आहे.याच सिंधू संस्कृती आपल्याला विद्वता,विचार आणि संघटन दिले आहे.अशा या सिंधू संस्कृती मधील विद्वान यांना स्वत: गौतम बुध्द शरण गेले आहेत.तिथला विचारांना शरण गेलेले आहेत आणि तिथल्या संघटनेला शरण गेले आहेत.म्हणून गौतम बुध्दानी पाली भाषेत विकसित केलेली प्रार्थनेचे आकलन आपण केले तर सर्व गोष्टी आपल्याला समजून येतील.म्हणून गौतम बुध्द म्हणतात.”बुद्धं शरणंम गच्छामी” “धम्म शरणंम गच्छामी” “संघम शरणंम गच्छामी" या तीनही गोष्टीचा सारंश डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी एका वाक्यात दिलेला आहे आणि तो म्हणजे “शिका” म्हणजे बुध्द (विद्वान) बना आणि “संघटीत व्हा” (संघाला शरण जा) आणि संघर्ष करा…! (म्हणजे मानवीकल्याणकारी जीवन जगा)
हीच सभ्यता छत्रपती शिवाजी महाराज यांनी अंगीकृत करून सम्राट अशोक यांचा बौध्द साम्राज्याचे भगवे निशाण घेऊन मानवकल्याणकारी स्वराज्य निर्माण केले म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रमाणे धम्म चक्र प्रवर्तन दिनात तेवढेच महत्व छत्रपती शिवाजी महाराज यांना दिले पाहिजे.असे आमच्या सकल मराठी समाजाचे म्हणजे आहे…!

No comments:

Post a Comment