Friday, October 11, 2019

इथून पुढे वंचित बहुजन आघाडीचे काम करणार नाही…..चांगल्या कार्यकर्त्याचा गेला बळी -: राजेश खडके सकल मराठी समाज


वंचित बहुजन आघाडीने २०१९ ची लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा उमेदवारी दिली नाही…..आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीची कसबा विधानसभा मतदार संघाची उमेदवारी दिली नाही.हे दोन्ही विषय माझ्यासाठी महत्वाचे नाहीत...माझ्यासाठी महत्वाचा आहे तो माझ्यातील कार्यकर्तापणा….आणि तो कार्यकर्तापणाच VBA ने लोकसभेला काढून घेतला होता तरीही संयम ठेऊन तो कार्यकर्तापणा विधानसभेला मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र इथेही तो मिळाला नाही.मी कोण आहे….? मी काय काय केले…? हे कोणाला सांगावे असे मला वाटत नाही.आदरणीय प्रकाश आंबेडकर यांना आणि त्यांच्या भारिप पक्षाला तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांना मी १६ वर्षापासून ओळखत आहे.कोण कोणत्या कार्यकर्त्यांनी कशाप्रकारे त्याग केला आपल्या जीवाचे बलिदान दिलेले आहे ते मी जवळून पाहिलेले आहे. तसं पाहिला गेले तर त्या कार्यकर्त्यांचा कधीच फायदा झालेला नाहीये...आजही कोणत्या परस्थितीत ते जगत आहेत हे मी जवळून पहात आहे.
परंतु पुरंधर विधानसभा मतदार संघातून ज्या व्यक्तीने उमेदवारी मागितली होती त्याच व्यक्तीच्या मनात नसताना त्याला कसबा विधानसभा मतदार संघातून उमेदवारी फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवसाला दुपारी १.५० वाचता एबी फॉर्म दिला जातो...कोणताही अनुभवी व्यक्ती त्याच्या सोबत दिले जात नाही.एबी फॉर्म कसा भरायचा याचा अनुभव नसल्यामुळे त्याचा एबी फॉर्म छाननीमध्ये बाद होतो….आणि तो उमेदवार अपक्ष ठरविला जातो आणि त्याला पुन्हा पुरस्कृत केले जाते….या सर्व घडामोडी होत असताना मला पक्षाच्या अधिकृत प्रवक्ते श्री सचिन माळी आणि पुणेशहर अध्यक्ष मुनिवर कुरेशी यांच्या माध्यमातून शेवटच्या दिवशी तुम्ही फॉर्म भरा म्हणून सांगितले जाते तुमच्या नावाचा एबी फॉर्म तयार आहे.म्हणून निवडूक कार्यालयाच्या बाहेर थांबविले जाते आणि आतमध्ये पक्षाच्या वतीने युवराज भुजबळ हे फॉर्म भरत असल्याचे अधिकृत शहर अध्यक्ष श्री कुरेशी आणि प्रवक्ते श्री सचिन माळी यांना कल्पना मिळत नाही.एबी फॉर्म न मिळाल्यामुळे पक्षाचा उमेदवार देता आला नाही याची खंत अध्यक्ष श्री कुरेशी आणि त्याच्या बरोबर उपस्थित वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी यांना होते.
वंचित बहुजन आघाडीचे अनुभवी पदाधिकारी निवडणूक कार्यलयात उपस्थित असताना त्याची माहिती युवराज भुजबळ यांना नसल्यामुळे त्यांना पक्षाचा एबी फॉर्म भरता आला नाहीये.पक्षाचे पदाधिकारी यांची मदत घेता आलेली नाहीये.अशा या वंचित बहुजन आघाडीच्या चुकीच्या भूमिकेमुळे केवळ राजेश खडके यांना निवडणुकीच्या राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी युवराज भुजबळ नावाच्या चांगल्या कार्यकर्त्याचा बळी गेला आहे असेच मी म्हणेन...त्यामुळे इथून पुढे मी वंचित बहुजन आघाडीचे काम करणार नाही.

No comments:

Post a Comment