Tuesday, December 15, 2020

आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब मला वाचवा.....मी उध्वस्त होत आहे......!


 

                मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्याचा हल्ला हा भारताच्या कृषीप्रधान संस्कृतीवर झालेला हल्ला आहे म्हणून देशातील हरियाना,पंजाबचा मधील शेतकरी या कायद्या विरोधात उभा राहिलेला आहे.ज्या शेतकऱ्याने हा हल्ला ओळखला आहे तो या कायद्याच्या विरोधात उभा राहताना देशात आपल्याला दिसत आहे.परंतु हा कायदा कोणत्याही परिस्थितीत मोदी सरकार मागे घेईल असे वाटत नाही.परंतु या कायद्याचे दुष्परिणाम इतके भयानक आहेत की देशाची अर्थव्यवस्थेचा कणा हा इथला शेती व्यावसाय आहे आणि हे समजण्यासाठी “रुपयाची समस्या” हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ग्रंथ ज्यांनी वाचला आहे त्यालाच हे समजणार आहे.ज्याने छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेले स्वराज्य समजून घेतले आहे त्यालाच हे समजणार आहे.आणि ज्याने महात्मा ज्योतिबा फुले यांची सत्यशोधक चळवळ समजून घेतली आहे त्यालाच हे समजणार आहे.

      जगाला कृषीप्रधान संस्कृतीची उगम सिंधू संस्कृती मधून झाल्याचे माहित आहे म्हणून जगाचा पोशिंदा असणारा हा भारत देश आहे.आणि ह्या भारत देशाच्या कृषीप्रधान संस्कृतीवर भांडवलशाहीचा कब्जा या तीन कायद्याच्या माध्यमातून होणार आहे.हे सर्व माहित असताना महाराष्ट्रतील बळीराजा शांत कसा असा प्रश्न आता काही जाणकार यांना पडलेला आहे.परंतु तसे नाही इथल्या छत्रपती शिवरायांच्या कुणब्याला हे समजले आहे.परंतु त्याचे पुढारपण करणारा कोणी नेता आता या महाराष्ट्रात शिल्लक राहिलेला नाही अशी त्याची अवस्था झालेली आहे.मनातून तो कोकाळतोय आणि किंचाळत सुध्दा आहे की “मला वाचवा...मी उध्वस्त होत आहे”.आणि त्याला हे माहित आहे की त्याला आता एकच माणूस वाचवू शकतो आणि तो माणूस म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब....पण त्याची मजबुरी आहे त्याला इथे समाज व्यवस्थेत आणि नात्या गोत्यात अडकवून ठेवलेले आहे म्हणून तो समोर येऊन बोंबलू शकत नाही.

      या तीन कृषी कायद्यामुळे गावाचे “गावपण” उध्वस्त होणार आहे आणि इथला गावगाडा सुध्दा उध्वस्त होणार आहे.कारण इथल्या कुणबी समाजावर इथला अलुतेदार आणि बलुतेदार उभा आहे.जेव्हा हा बळीराजाच जर उध्वस्त झाला तर इथला अलुतेदार व बलुतेदार यांना उध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही याची जाणीव त्याला झाल्यामुळे तो सुध्दां कोकाळत आहे किंचाळत आहे की “मला वाचवा...मी उध्वस्त होत आहे”.अलुतेदार आणि  बलुतेदार तसेच कुणबी समाजाने ओळखले आहे की गावगाडा बंद झाला की पारंपारिक होणारे “आठवडा बाजार” बंद होणार आहे तसेच “जनावरांचे बाजार” सुध्दा बंद होणार आहे.गावगाडा उध्वस्त झाल्यामुळे गावच्या “जत्रा” सुध्दा बंद होणारा आहे त्यामुळे वर्षात होणारे पारंपारिक “उत्सव” बंद होणार आहे म्हणजेच “सिंधू संस्कृती” चे आणि बळीराजाचे होणारे वार्षिक पूजन बंद होणार आहे.म्हणून त्या गावगाड्यातील अलुतेदार आणि बलुतेदार म्हणतोय की आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब “मला वाचवा...मी उध्वस्त होत आहे”.

       या तीन कृषी कायद्यामुळे आम्हाला गावात कधीही “बुलेट किंवा फटफटी” चा आवाज ऐकू येणार नाहीये.कारण सकाळी त्या गाड्यावर दुध घेऊन येणारा दुधवाला गावकरी सुध्दा शिल्लक राहणार नाहीये.म्हणून जो शहरात आलेला गावकरी म्हणतोय आता गावात मी परत कसा जाऊ......? कारण गावात “आठवडे बाजार” राहिला नाही,गावात “जनावरांचा बाजार” सुध्दां राहिला नाही......आणि गावात होणाऱ्या पारंपारिक “जत्रा” सुध्दा राहिल्या नाहीत.म्हणून  तो शहरातील गावकरी सुध्दा म्हणतोय आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब “मला वाचवा...मी उध्वस्त होत आहे”.

        या सगळ्यांचा आवाज आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबा पर्यंत पोहचण्याची जबाबदारी आम्ही “वतन बचाओ आंदोलन” संघटनेने घेतली आहे.या सर्व बाबींचा उहापोह करीत असताना भविष्य काळातील बऱ्याच घटना आमच्या समोर येत आहे.या तीन कृषी कायद्यामुळे शेतकरी उध्वस्त झाला तर देशातील “कृषी खाते” बंद होणार आहे,”पणन खाते” बंद होणार आहे,”पशुपालन खाते” बंद होणार आहे.”साखर आयुक्त कार्यालय” बंद होणार आहे.”नाबार्ड” बंद होणार आहे,”एफसीआय” बंद होणार आहे.त्यामुळे या माध्यमातून सहकार क्षेत्राचे जे जाळे उभे राहिलेले आहे ते जाळे उध्वस्त होणार आहे.म्हणजे इथला “ऊस उत्पादक शेतकरी” उध्वस्त होणार आहे. “ऊस उत्पादक शेतकरी” उध्वस्त झाल्यास साखर कारखाने उध्वस्त होणार आहे.”पशुपालन व्यवस्था” उध्वस्त झाल्यामुळे इथल्या “दुध संस्था” बंद होणार आहे.म्हणजेच सहकार क्षेत्र उध्वस्त झाल्यामुळे “जिल्हा मध्यवर्ती बँका” सुध्दा बंद होणार आहे.त्यामुळे ह्या सर्व खात्यातील अधिकारी वर्ग,कर्मचारी वर्ग,आणि गावगाड्यातील संपूर्ण वर्ग कोकाळतोय आणि किंचाळतोय आणि म्हणतोय आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब “मला वाचवा...मी उध्वस्त होत आहे”. (क्रमशJ

No comments:

Post a Comment