Sunday, December 27, 2020

साहेब मला वाचवा....मी ऊस उत्पादक शेतकरी उध्वस्त होतोय....माझ्या सहकारी साखर कारखान्यावर भांडवलदार कंपनीचा कब्जा होतोय....!


       

      तीन कृषी कायदे मोदी सरकारने मंजूर केले आणि “बहुजन हिताय...बहुजन सुखाय” या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीच्या ब्रीद वाक्यावर हल्ला झाला.सहकार क्षेत्राची पेरणी याच सत्यशोधक चळवळीतून उभी राहिलेली आहे.तसेच हे वाक्य गौतमी पुत्र सिद्धार्थ म्हणजे गौतम बुद्धांनी बहुजनांच्या कल्याणासाठी तयार केलेल्या ब्रीद वाक्यातून आलेले वाक्य आहे.आणि ते वाक्य म्हणजे “चरथ भिक्कवे चारिकम...! बहुजन हिताय,बहुजन बहुजन सुखाय...! आत्तानु हिताय,लोकानू कंपाय..! अध्य कल्याणम्,मध्य कल्यानम्,अंत कल्यानम्” हे होय.तसेच हे सहकार क्षेत्र मजबूत करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भरपूर प्रयत्न केलेले आहेत.त्या संबधीचे कायदे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले आहेत.

        गेल्या लेखात या तीन कृषी कायद्या संदर्भातील दुष्परिणाम आपण समजून घेतले आहेत....आज आपण  “बहुजन हिताय,बहुजन सुखाय” या वाक्यावर मोदी सरकारने कसा हल्ला केलाय याची चाचपणी करून ऊस उत्पादक शेतकरी कसा उध्वस्त होणार आहे आणि तो उध्वस्त झाल्यास कोण कोण कसे.....? उध्वस्त होणार आहेत हे आपण समजून घेणार आहोत.ऊस उत्पादक शेतकरी यांनी घाम गाळून ऊस पिकविला त्यातून त्याने एकत्र येऊन कष्टाने आपले भाग भांडवल जमा करून सहकारी साखर कारखाना उभा केला आणि साखर उत्पादनाची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली.सदर साखरेची देशात आणि परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी होऊ लागली.त्यामुळे शेतकऱ्यानी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात साखर कारखाने उभे केल.आणि ऊस उत्पादक शेतकरी हा सदन शेतकरी म्हणून पुढे आला.या सहकार साखर कारखान्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने सहकार मंत्रालय उभे करून साखर आयुक्त कार्यालय स्थापन केले.त्यामुळे कर्मचारी आणि अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात उभा राहिला.यामुळे आरक्षित समाजाला मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध झाल्या.तसेच कृषी विद्यापीठ उभे राहिले,महाविद्यालय उभे राहिली यातून कृषी संशोधक पुढे आले.विद्यार्थी कृषीचे शिक्षण घेऊन आपली शेती विकास करू लागले.

     मोदी सरकारच्या या तीन कृषी कायद्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हा ऊस उत्पादक म्हणून राहणार नाही.कारण या तीन कायद्यामुळे भांडवलदार कंपन्यांचा शिरकाव होऊन तो  ऊस उत्पादक कंपनी म्हणून पुढे येणार आहे.त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या ७/१२ उताऱ्यावर भांडवलदार कंपनीचे “कुळ” म्हणून नाव दाखल होणार आहे.ऊस उत्पादक कंपनी झाल्यामुळे त्या कंपनीचे सहकारी साखर कारखान्यावर कब्जा होऊन त्याची साखर निर्मितीचवर कंपनीची मालकी तयार होणार आहे.त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याची सहकारी साखर कारखान्या मधील भाग भांडवलाची लुबाडणूक होऊन चोरी होणार आहे.त्यामुळे त्याची सहकार साखर कारखान्या मधील भागीदारी संपणार आहे.त्याची भागीदारी आणि शेती संपल्यामुळे त्याच्या पाठीमागे असलेला “शेतकरी” हा शब्द निघून जाणार आहे.आणि फक्त कंपनीला भाड्याने जमीन देणारा “जमीन मालक” म्हणून त्याची नवीन ओळख निर्माण होणार आहे आणि ती ओळख कंपनी जास्त काळ ठेवणार नाही.नंतर “जमीन मालक” हा शब्द निघून जाणार आहे त्यामुळे तो ऊस उत्पादक शेतकरी त्या कंपनीचा पोटार्थी “गुलाम” होणार आहे.त्यामुळे तो ऊस उत्पादक शेतकरी म्हणतोय आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब मला वाचवा...मी उध्वस्त होतोय...! माझ्या सहकारी साखर कारखान्यावर भांडवलदार कंपनीचा कब्जा होतोय...!

    सहकारी साखर कारखान्यावर भांडवलदार कंपनीचा कब्जा झाल्यास ऊस उत्पादक शेतकरी उध्वस्त होऊन तिथला कामगार उध्वस्त होऊन सहकारी साखर कारखान्याच्या दीडशे ते दोनशे एकरच्या जमिनी भांडवलदार कंपनीच्या घश्यात जाणार आहेत.असे झाल्यास इथले सहकार मंत्रालय बंद होणार आहे.सहकार मंत्रालय बंद झाल्यास इथले साखर आयुक्त कार्यलय बंद होणार बंद होणार आहे.या उस उत्पादकासाठी कृषी खात्यातील काम करणारे काही विभाग बंद होणार आहे.त्यामुळे ही सर्व सरकारी खाती बंद झाल्यामुळे तिथला कर्मचारी आणि अधिकारी वर्ग संपुष्ट येणार आहे.त्यामुळे सरकारी नोकऱ्या कमी होणार आहे.सरकारी नोकऱ्या कमी झाल्या की आरक्षण सुध्दा कमी होणार आहे.आणि ह्या सर्व घडामोडी झाल्यामुळे देशातील नागरिकांना रेशनिंग कार्डवर मिळणारी साखर सुध्दा बंद होणार आहे.कारण एफसीआय म्हणजे फूड कॉर्पोरेशन इंडिया बंद झाल्यास रेशनिंगच बंद होणार आहे.यात महत्वाचा मुद्दा असा आहे की,कृषी विद्यापीठ आणि कृषी महाविद्यालयातून तयार होणारे विद्यार्थी आणि संशोधक इथून पुढे तयार होणार नाही.कारण भांडवलदार कंपन्या स्वत:चे संशोधन केद्र उभारणार असून त्यातूनच ते त्यांना लागेल तसे लोक घेणार नाहेत.त्यामुळे कृषी विद्यार्थ्याला मिळणारे कृषी शिक्षण बंद होणार आहे.

      त्यामुळे आमचे वतन बचाओ आंदोलन संघटनेचे सर्व नागरिकांना आवाहन आहे की.या तीन कृषी कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनास वंचित बहुजन आघाडी यांनी पाठींबा दिलेला आहे.आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी शेतकरी हितासाठी संघर्ष सुरु केला आहे.त्यांच्या पाठीशी आपण सर्व प्रामणिकपणे उभे राहुयात.(क्रमशJ

No comments:

Post a Comment