Wednesday, April 3, 2019

पुणेकरानो तुम्ही मला मतदान का करावे…..! (भाग -१) पुणे लोकसभा उमेदवार राजेश खडके पुरस्कृत उमेदवार सकल मराठी समाज

प्रथम आपणास जय जिजाऊ जय शिवराय जय भीमराय

आपण पुणेकर नागरिक सुज्ञ आणि जाणकार असल्याचे मत साऱ्या जगात झालेले आहे.परंतु ज्यावेळेस मतदान बजाविण्याची वेळ जेव्हा आपल्यावर येते तेव्हा आपण आपल्यातील सुज्ञ आणि जाणकारपणा का गमावितो असा माझा प्रश्न आहे.जेव्हा मतदान होते तेव्हा मतदानाची टक्केवारी ही ५५ ते ६० टक्के पर्यंतच जात असते.उरलेले ४० ते ४५ टक्के सुज्ञ आणि जाणकार पुणेकर नागरिक काय करतात असा माझा प्रश्न आहे.म्हणून त्या ४० ते ४५ टक्के लोकांना माझे आवाहन आहे की आपले बहुमुल्य मत वाया घालवून पुण्याला असणारे ऐतिहासिक महत्व कमी करू नका. ”पुणे तिथ काय उणे” अशा शब्दाला खोडा घालून तेथे ४५ ते ४० टक्के मतांचे उणे अशी म्हण प्रचलित होऊ देऊ नका.आपण खासदार का निवडतो आणि तो निवडण्यासाठी आपल्याला मताचा का अधिकार दिलेला आहे याची जाण करून घ्या.५५ ते ६० टक्के मतदान करणारे कित्येक असे मतदार आहेत की आपण कोणाला आणि का मतदान करतो हे समजत नाही.आता उदाहरण द्यायचे झाले तर माझ्या फ्रेडलिस्ट मध्ये ५००० मित्र आहेत.परंतु यामध्ये लोकशाही प्रक्रियेला किती लोक मानतात असा माझा प्रश्न आहे.कारण ते लोक प्रतिक्रिया देत नाहीत आणि आपले विचारही मांडत नाही.चर्चा मसलत करीत नाही.हे आपले सामजिक खाते आहे याचे त्यांना कोणतेही भान रहात नाही.फक्त आपले फोटोशेषन करीत असतात...असो आपला मुद्दा आहे लोकशाही उत्सवात सहभागी होण्याचा आणि आपला खासदार निवडण्याचा…!
निवडणूक प्रक्रिया आणि त्या पर्क्रीयेतील मत जातीयवादावर नसून कार्य कर्त्युत्वावर दिले पाहिजे असे असताना केवळ इथला प्रस्थापित आणि घराणेशाही म्हणून पूर्वीपासून मतदार यांनाच मत देत आलेला आहे.तो उमेदवार आपण लोकसभेत का निवडून पाठवितो हे बघणे गरजेचे असताना त्याचे कार्य समजून घेणे असताना आपण लाल पिवळ्या निळ्या रंगात अडकवून आपले मत देत असतो परंतु त्या लाल पिवळ्या निळ्या आणि भगव्या रंगाचा कधी अभ्यास करीत नाही.परंतु त्या रंगाच्या आधारावर आपण आपले मतदान करीत असतो.सद्या आपण कट्टरवादाकडे वळलो आहे.कारण जो धर्म चौकटीच्या आतमध्ये पाळायचा असतो तो धर्म रस्त्यावर आणून धार्मिक दहशतवाद निर्माण करून इथला सर्व धर्म समभाव या व्याख्यालाच मूठमाती देत आहोत.इथली देव व्यवस्था आपण आपल्या घराच्या चौकटीच्या आत सांभाळायला हवी ती आपण रस्त्यावर आणून सामजिक सुव्यवस्था बिघडवीत असतो.त्यामुळे आपण निवडणूक प्रक्रियेमध्ये याच आधारावर मतदान करीत असतो जेणेकरून आपले नुकसान होते याची आपल्याला कल्पनाही नसते.असो तो समजून घेण्याचा मुद्दा आहे समजून घ्याल तर उमजून जाल नाहीतर जसे आहात तसेच चालाल.
मी लोकसभेला मतदान का ….? करावे…! आणि या मतदानामुळे माझा आणि माझ्या देशाचा आणि माझ्या देशातील नागरिकांचा फायदा काय…? हा प्रश्न मला महत्वाचा वाटतो.आपण लोकसभेसाठी मतदान का करतो हे आपण पुढील भागात पाहू….! (भाग २)

No comments:

Post a Comment