Thursday, April 4, 2019

प्रकाश आंबेडकर यांचेवर गुन्हा दाखल करणे म्हणजे संविधानिक अधिकारचे हनन करणे होय…! निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा विचार करावा….! उमदेवार राजेश खडके पुणे लोकसभा

               विषय असा आहे की,लोकसभेत निवडून जाणारा खासदाराने देशाचे संरक्षण करावे असे कार्य त्याचे असते आणि त्या निवडून आलेल्या खासदार यांनी ज्याला संसदेत प्रतिनिधित्व दिले आहे म्हणजे प्रधानमंत्री बनविले आहे त्याने देशातील आणि देशा बाहेरील सुरक्षा चोख ठेवणे गरजेचे आहे.असे असताना जर देशाच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न उपस्थित होत असेल आणि साडेतीनशे आरडीएक्स भारतात येऊन सहजपणे जवानाच्या चालत्या वाहनावर हल्ला होत असेल आणि त्यात ४० जवान मृत्युमुखी पडत असतील तर त्याला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीविरोधात जर कोणतीही कारवाई होत नसेल तर हा प्रत्येक भारतीय नागरिकाच्या संविधानिक संरक्षणाच्या अधिकाराचा प्रश्न निर्माण होतो.आणि तो प्रश्न जर लोकशाही उत्सवात उपस्थित करण्यावर जर बंदी येत असेल तर तशी बंदी करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला प्राप्त होत नाही.आणि निवडूक आयोग जर तसे करीत असेल तर तो संविधानिक अधिकाराचे हनन आहे.त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी त्याच संविधानिक अधिकाराचा उपयोग करून पुलवामा संदर्भातील निवडणूक आयोगाच्या भुमिकेसंदर्भात जनतेमध्ये प्रश्न उपस्थित करून देशाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे आणि तशी चिंता व्यक्त करणे हा या देशातील प्रत्येक नागरिकाचा संविधानिक अधिकार आहे.त्यामुळे निवडणूक आयोगाने प्रकाश आंबेडकर यांचेवर दाखल केलेल्या गुन्ह्या संदर्भात पुनर्विचार करावा अशी मी राजेश नारायण खडके पुणे लोकसभा अपक्ष उमेदवार निवडूक आयोगास विनंती करीत आहे.आमच्या विनंतीचा मान ठेऊन पुलवामा हल्यामुळे देशाच्या सुरक्षेबाबतच्या उपस्थित झालेल्या प्रश्नाला वाट करून देण्यासाठी तो लोकशाही उत्सवात मांडण्याची परवानगी द्यावी.

No comments:

Post a Comment