Friday, January 15, 2021

देशातील शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी प्रकाश आंबेडकर आघाडीवर....तर शरद पवारांचे काय....? वतन बचाओ आंदोलन


 

            शरद पवार यांच्या बारामतीचा खासदार शेकाफेचा.....!

             आंबेडकरी चळवळीला लागले मार्क्सवादाचे ग्रहण.....!

          सन १६६१ मध्ये नेहरू सरकारचा शेतकऱ्यावरील पहिला हल्ला....!

          पहिली जिजाऊ जयंती साजरा ओबीसी समाजानेच केली...!  

          गेल्या सहा लेखात आपण मोदी सरकारचे तीन कृषी कायदे इथल्या शेतकरी वर्गाच्या आणि सामान्य जनतेच्या लाभात नाही हे समजून घेतले आहे.आता या लेखात आपण तीन कृषी कायदे आणि शरद पवार समजून घेवूयात.शरद पवार यांचा जन्म बारामती येथील काठेवाडी गावात १२ डिसेंबर १९४० रोजी झाला.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९४२ रोजी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन यां पक्षाची स्थापना केली होती....तेव्हा पवार साहेब हे दोन वर्षाचे होते.जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हां शरद पवार हे सात वर्षाचे होते....आणि जेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांचा १० मे १९५४ रोजी जन्म झाला.... तेव्हा शरद पवार हे चौदा वर्षाचे होते.प्रकाश आंबेडकर यांचेपेक्षा शरद पवार हे चौदा वर्ष वयाने मोठे आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ साली बौध्द धम्माची दीक्षा घेतली तेव्हां शरद पवार हे सोळा वर्षाचे होते.या सर्व घडामोडी समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे त्याशिवाय शरद पवार आणि तीन कृषी कायदे आपल्याला समजणार नाहीत असे आमच्या वतन बचाओ संघटनेचे मत आहे.

        वयाच्या सोळाव्या वर्षी शरद पवारांनी राजकारणाला सुरुवात केली होती.सोळाव्या वर्षाच्या विद्यार्थी दशेत म्हणजे १९५६ साली शरद पवारांनी “गोवा मुक्ती” आंदोलनाला पाठींबा देऊन राजकीय जीवनाची सुरुवात केली होती.शरद पवार यांचे वडील गोविंदराव पवार हे सत्यशोधक चळवळीचे असल्यामुळे सहकार क्षेत्राची त्यांना चांगली जाण होती.निरा कॅनॉल सहकारी सोसायटीचे गोविंद पवार सेक्रेटरी होते.......आणि बारामती येथील सहकारी बँकेचे पहिले व्यवस्थापक म्हणून त्यानी काम पहिले होते.तर शरद पवार यांच्या आई शारदाबाई ह्या जिल्हा लोकल बोर्डाच्या शिक्षण समितीच्या प्रमुख होत्या.....आणि शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या होत्या.त्यामुळे शरद पवार यांच्या पाठीशी राजकीय वारसा असल्यामुळे त्यांना राजकारणाची चांगली माहिती ही सोळाव्या वर्षात होती.आई-वडीलामुळे शरद पवार यांचा सहकार क्षेत्राचा चांगला आभ्यास झालेला होता.त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना चांगले समजून घेण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केल्याचे नाकारता येत नाही....परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या हयातीत शरद पवार किंवा त्यांचे आई-वडील यांनी कधीही बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेतल्याचे कुठेही दिसून येत नाही.

शरद पवार यांच्या बारामतीचा खासदार शेकाफेचा.....!

        सोळाव्या वर्षात शरद पवारांचे राजकारणात पदार्पण झाले होते.......या दरम्यान संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरु होती. ६ डिसेंबर १९५६ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले होते...आणि मार्च १९५७ रोजी लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. २३ मार्च १९५७ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे त्यावेळी आठ खासदार निवडूण आलेले होते....त्याची बातमी “प्रबुध्द भारत” या वृत्तपत्रात त्यावेळी छापून आलेली होती.परंतु या निवडणुकीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांना उमेदवारी दिली गेली नाही....यावेळी राजकारणापासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस दूर ठेवण्यात आलेले होते.निवडूण आलेल्या पैकी एक खासदार अॅडव्होकेट बाळासाहेब साळुंके हे होते.यावेळी त्यांना बारामती,फलटण,भोर, वेल्हा,मावळ, मुळशी,जुन्नर, आंबेगाव, रायगड ठिकाणच्या स्वराज्याच्या मतदारांनी खासदार म्हणून निवडून दिले होते...त्यामुळे त्यावेळी बारामतीचे खासदार अॅडव्होकेट बाळासाहेब साळुंके होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे......तर पुण्यातून कॉंग्रेसच्या इंदिरा मायदेव या खासदार झालेल्या होत्या....यावेळी शरद पवार हे सतरा वर्षाचे होते आणि राजकारणात येऊन त्यांना दुसरे वर्ष लागले होते....त्यामुळे शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे खासदार अॅडव्होकेट बाळासाहेब साळुंके यांची त्यांना चांगली माहिती होती.याच काळात बी सी कांबळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्युच्या अहवालाची मागणी करीत एक भावनिक आंदोलन आंबेडकर अनुयायी यांचे समोर उभे केले होते....त्यामुळे संपूर्ण आंबेडकरी अनुयायी पुढे हा भावनिक लढा वीस वर्ष लढत होते.परंतु रिपब्लिकन चळवळीच्या कार्यकर्त्याला अॅडव्होकेट बाळासाहेब साळुंके माहित नाही याबाबतची शोकांतिका वंचित बहुजन आघाडी उपाध्यक्ष धनराज वंजारी साहेब यांनी नुकत्याच झालेल्या अॅडव्होकेट बाळासाहेब साळुंके यांच्या जन्मशताब्दी वेळी बोलून दाखविले.

      

आंबेडकरी चळवळीला लागले मार्क्सवादाचे ग्रहण.....!

    सन १९५८ रोजी मुंबई येथे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत काम करणारे कॉम्रेड आण्णाभाऊ साठे यांनी कॉम्रेड भाऊराव पाटील आणि कॉम्रेड शाहीर अमर शेख यांच्या उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण निमित्त आदरांजली कार्यक्रमात “जग बदल करून घाव...मज सांगून गेले भीमराव” हे गीत गायले होते असे म्हणतात.....तसेच स्वातंत्र्याला विरोध करण्यासाठी मुंबई येथे १६ ऑगस्ट १९४७ रोजी दहा हजार लोकांचा मोर्चा आण्णाभाऊ यांच्या नेतृत्वात निघालेचे सांगतात...परंतु त्या मोर्चाची बातमी कोणत्याही त्याकाळच्या वृत्तपत्रात छापून आलेली नाही....त्यामुळे तिथून पुढे आंबेडकरी चळवळीत मार्क्सवादाच्या विचारांचे ग्रहण लागलेले दिसते...यावेळी शरद पवार हे अठरा वर्षाचे असले तरी ते बुद्धी प्रामाण्य व्यक्ती होते त्यामुळे त्यांना राजकारण चांगले अवगत होते.परंतु या आदरांजली कार्यकर्माची माहिती १९७२ साली स्थापन झालेली दलित पॅथरचे संघटनेचे  संस्थापक नेते नामदेवराव ढसाळ यांनी जनते समोर आणली होती.......त्यांनी मार्क्सवादी विचारांचे समर्थन देखील केले होते....परंतु १९७२ पूर्वीच्या कोणत्याही नेत्याने या संदर्भात माहिती दिल्याचे संदर्भ कुठेही आढळ होत नाही असोत.

 

सन १६६१ मध्ये स्वातंत्र्यानंतर नेहरू सरकारचा शेतकऱ्यावरील पहिला हल्ला...हा कायदा राबविण्यास मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा नकार....!

          १ मे १९६० साली संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मान मिळाला होता........यावेळी शरद पवार हे वीस वर्षाचे होत्ते आणि विद्यार्थी चळवळीत अग्रेसर होते.बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय पुणे येथील कॉलेज जीएस (जनरल सेक्रेटरी) असताना सन १९६१ मध्ये वयाच्या एकविसाव्या वर्षी शरद पवार यांनी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी मेळावा यशस्वीपणे पार पाडला.या मेळाव्यात शरद पवार यांनी केलेल्या भाषणास यशवंतराव चव्हाण प्रभावित झाले होते....प्रभावित झालेल्या यशवंतराव चव्हाण यांनी शरद पवार यांना वेळोवेळी पुण्यात आले की भेटायला बोलवायचे यातूनच दोघांचा संपर्क वाढत गेला.याकाळात म्हणजे सन १९६१ मध्ये कॉंग्रेस सरकारने घटनेप्रमाणे शेती हा राज्यसरकारचा विषय असताना केंद्रातील नेहरू सरकारने जमीन कमाल धारणा कायदा शेतकरी यांच्या विरोधात मंजूर करून त्यांच्या जमिनी काढून घेतल्या परंतु सावकाराने लाटलेल्या जमिनी काढून घेण्यात आल्या नाहीत.खाजगी कंपन्यांना हा कायदा लागू नव्हता त्यामुळे त्यांच्या कडील जमिनी कढून घेण्यात आल्या नाही.हा  कायदा सरसकट जमीन धारणेचा कायदा नव्हता...हा फक्त शेतजमीन धारणेचा कायदा होता.त्यामुळे सन १९६१ मध्ये नेहरू सरकारचा स्वतंत्रनंतर काळातील शेतकऱ्यावर पहिला हल्ला झालेला होता.हा कायदा संविधान विरोधी होता.नेहरू सरकारने संविधानात नसलेले परिशिष्ट नऊ जोडण्यात आले....या परिशिष्टात टाकलेल्या कायद्या विरोधात न्यायालयात जाता येणार नाही अशी घटना दुरुस्ती करण्यात आली.महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी या कायद्याची अमलबजावणी केली नाही.यावेळी शरद पवार हे एकवीस वर्षाचे होते.२ एप्रिल १९६२ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाचे उमेदवार उभे नव्ह्ते...कारण यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेला शेड्युल्ड कास्ट फेडरेशन बरखास्त झाल्याचे समजण्यात आलेले होते.त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचा एकही खासदार निवडूण आलेला यावेळी दिसत नाही.मात्र नेहरूंच्या नेतृत्वात १९६२ साली झालेल्या या लोक सभा निवडणुकीत ४९४ पैकी ३६१ जागा कॉंग्रेसने जिंकल्या होत्या.

 

पहिली जिजाऊ जयंती साजरा केल्यामुळेच.... ओबीसी समाजातील पहिले मुख्यमंत्री मरोतराव कन्नमवार झाले पायउतार....! तर जयंती साजरा करताना सोबत होते प्रबोधनकार ठाकरे....!

      जमीन कमाल धारणा कायद्या अंतर्गत शेतकरी स्वत:कडे ५४ एकर कोरडवाहू तर १८ एकर बागायती जमीन ठेवू शकत होता....त्यावरील जमीन या कायद्या अंतर्गत सरकार काढून घेणार होते.परंतु शरद पवार आणि यशवंतराव चव्हाण यांचे या काळात अतिशय जवळचे संबध आलेले होते.त्यामुळे शरद पवार यांच्या मधील शेतकरी जागा झालेला होता....तेव्हा हा कायदा महाराष्ट्रात राबवू नये अशी विनंती चव्हाण यांना शरद पवार यांनी केली होती....त्यामुळे चव्हाण यांनी हा कायदा राबविण्यास नकार दिलेला होता...त्यानंतर २० अक्टोबर १९६२ साली नेहरूच्या नेतृत्वात भारत-चीन युध्द सुरु झाले होते.....यावेळी नेहरू सरकारने यशवंतराव चव्हाण यांची संरक्षण मंत्री म्हणून केंद्रात नेमणूक केली.त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या २६४ विधानसभा जागेसाठी सन १९६२ मध्ये निवडणुका घोषित झाल्या होत्या.या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने २१५ जागेवर विजय मिळविला होता......यावेळी शरद पवार हे २२ वर्षाचे होते.या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाला १५ जागा मिळाल्या होत्या.यावेळी ओबीसी समाजातील मारोतराव कन्नमवार महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले होते.मारोतराव कन्नमवार यांनी मुख्यमंत्री असताना सिंधखेड राजा  याठिकाणी प्रबोधनकार ठाकरे हे पत्रकार असल्याने त्यांना सोबत घेऊन माता जिजाऊसाहेबांची पहिली जयंती साजरा केली होती.....परंतु त्यांनी केलेली जिजाऊ जयंती पश्चिम महाराष्ट्रातील मराठा नेत्यांना आवडली नाही....त्यामुळे त्यांनी कन्नमवार यांचे विरुध्द आचार्य अत्रे यांच्या  “मराठा” नावाच्या वृत्तपत्राला खाद्य पुरवून त्यांची खूप मोठी बदनामी केली.त्यामुळे मारोतराव कन्नमवार यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले.पश्चिम महाराष्ट्र मधील नेत्यांनी “मराठा” वृत्तपत्रास कन्नमवार यांचे विरोधात खाद्य पुरविल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात त्याकाळी महराष्ट्रात झाल्या होत्या....परंतु काही लोकांचे म्हणणे असे आहे की “मराठा” हे नाव रुजविण्यासाठीच बामणी व्यावस्थेने हे वृत्तपत्र रुजविले आहे.मारोतराव कन्नमवार यांचा कार्याचा इतिहास पाहिला तर भरपूर काही गोष्टी आपल्या समोर येतील त्यांनी मुंबई मधील विक्रोळी याठिकाणी गरीब जनतेसाठी वसाहत उभी केलेली आहे.आज त्या वसाहतीला कन्नमवार नगर म्हणून ओळखले जाते.त्यानंतर सन १९६३ मध्ये मुख्यमंत्रीपदाची सूत्रे ही वसंतराव नाईक यांचेकडे आली.(क्रमशJ

No comments:

Post a Comment