Saturday, March 17, 2018

“पाडाव” म्हणजे वीर योद्ध्याची समाप्ती होय....आणि गुढी म्हणजे ज्यांनी पाडाव केला त्याची विजय पताका होय....! म्हणून शंभूराजे यांचा पाडाव केल्याची “विजयगाथा” म्हणजेच “गुढीपाडवा” होय......!


प्रश्न असा आहे की,संपूर्ण महाराष्ट्रात “गुढीपाडवा” हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.परंतु हा उत्सव साजरा करणारा कधीही विचार करीत नाही की,मी हा “सण” साजरा का करतो....? काहीना याबाबत विचारले तर ते असे सांगतात की,जेव्हा राम लंका जिंकून आयोध्यात परत आला....तेव्हापासून “गुढीपाडवा” हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.परंतु तो हा विचार करीत नाही की,हा सण आयोध्यात कोणीही साजरा करीत नाही.तर हुशार पत्रकार सुकृत करंदीकर असे म्हणतात की,शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचे निकटवर्तीय निराजीपंत “गुढीपाडवा” हा सण साजरा करण्यासाठी त्यांच्या घरी म्हणजे स्वत:च्या घरी गेले असा उल्लेख आहे.बऱ्याच इतिहासकार,अभ्यासू आणि संशोधकांनी याचा कोठेही उल्लेख शिवरायांच्या काळात केल्याचे दिसून येत नाही.परंतु आम्ही जो आभ्यास केला आहे त्यानुसार आमच्या समोर जे आलेले आहे त्यामध्ये स्पष्टपणे असे दिसून येते की, “गुढीपाडवा” हा सण फक्त महाराष्ट्रातच मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.मग त्याची कारणेमिमांसा काय...? तर “गुढीपाडवा” हा सण शहाजीराजे यांची जहागीर असलेला “पुणे परगणा” आणि स्वराज्यासाठी बांधलेला परगण्यातील “लाल महाल” आणि शिवरायांनी स्थापित्य केलेले स्वराज्यातून १६८९ मध्ये वैदिक धर्म पंडितांनी त्यांची “विजय पताका” म्हणून सुरु केला आहे.शंभूराजे यांची मनुस्मृती प्रमाणे औरंगाजेबाच्या माध्यमातून ११ मार्च १६८९ मध्ये हत्या केली जाते म्हणजे त्यांचा पाडाव केला जातो.आणि त्यांचा पाडाव झालेनंतर पेशवाई उभी करण्यासाठी त्यांची “विजय पताका” उभारली जाते.छत्रपती संभाजी महाराज यांचा पाडाव हा उत्सव त्यांच्याच रयतेने साजरा करावा म्हणून नवनवीन अशा कादंबरी रचून त्यांच्या रयतेच्या हातून वैदिक धर्म पंडितांच्या “विजयाची पताका” दरवर्षी उभारली जाते.म्हणून मी म्हणतो आज आपण शिकले सवरलेले आहोत शहाजीराजे – माता जिजाऊ – छत्रपती शिवाराय – संभाजीराजे – महात्मा ज्योतिबा फुले – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारे आहोत.आपण “गुढी” उभारून गुढीपाडवा हा सण साजरा करणे म्हणजे शंभूराजे यांचा पाडाव म्हणजे त्यांची समाप्तीचा आणि “गुढी” उभारणे म्हणजे वैदिक धर्म पंडित यांची “विजय पताका” उभारणे होय....! म्हणून शंभूराजे यांचा पाडाव केल्याची विजयगाथा म्हणजेच “गुढीपाडवा” होय......!

No comments:

Post a Comment