Saturday, March 3, 2018

आज अटकेचा बत्तीसावा दिवस (३२) ४ मार्च १६८९ स्वराज्याचे सरसेनापती मालोजी घोरपडे संभाजी महाराजांना वाचविण्यासाठी वीरगतीला प्राप्त....तर रणांगणाला पाठ दाखवून संताजी घोरपडे पसार.....! गद्दार मराठ्यामुळे छत्रपती असणारे संभाजी महाराज आता फक्त शंभूराजे झाले होते...!



छत्रपती संभाजी महाराज यांना १ फेब्रुवारी रोजी संगमेश्वर येथे मुखर्बखान याने जेरबंद केले तेव्हा संताजी घोरपडे पळून गेला होता.तेव्हा महाराणी येसूबाई यांनी संताजी घोरपडे याला खूप सुनाविले होते.स्वराज्यात मराठा सरदार स्वार्थी झालेला होता.त्यामुळे केवळ अडीच हजाराच्या सेनेत ११ फेब्रुवारी रोजी जेरबंद छत्रपती संभाजी महाराज अकलूजच्या औरंगाजेबाच्या छावणीत पाच लाखाच्या सेनेत दाखल झाले होते.१२ फेब्रुवारी रोजी महाराणी येसूबाई यांनी राजारामाचा राज्याभिषेक करून रायप्पाला राजदूत म्हणून बहादूरगड येथे पाठविले होते तेथे तो वीरगतीला प्राप्त झाला होता.आज संभाजी महाराज छत्रपती नव्हते.....आता ते फक्त शंभूराजे होते.आज गद्दार मराठ्यामुळे छत्रपती असणारे संभाजी महाराज आता फक्त शंभूराजे झाले होते.लाख लाख सलाम त्या मालोजी घोरपडे यांना तर लाख लाख सलाम त्या अर्जुना महार कवठेकाराला तर लाख लाख सलाम त्या धनगरांच्या २५ तरुणाला तर लाख लाख सलाम त्या रायप्पा महाराला ज्यांनी स्वराज्याचा छत्रपती वाचविण्यासाठी स्वत:च्या प्राणाची आहुती दिली.

No comments:

Post a Comment