Thursday, March 8, 2018

आज अटकेचा सदोतीसावा दिवस (३७) ९ मार्च १६८९ ब्राह्मण मंत्र्यानी स्वराज्या बरोबर गद्दारी केली हे बरोबर आहे कारण तो त्यांचा धर्म होता.परंतु मराठा सरदारानी गद्दारी केली हा काय त्यांचा धर्म होता काय....? महात्मा ज्योतिबा फुले यांचे मुळे शिवरायांच्या समाधीचे दर्शन झाले...तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेमुळे भीमा कोरेगावच्या माध्यमातून शंभूराजे यांच्या समाधीचे दर्शन झाले.....!शंभूराजे आज तुळापुराच्या पंचकृषित पोहचले होते त्याठिकाणी त्यांना मिरविण्यात आले.जसा जसा त्यांच्या अटकेचा प्रवास सुरु होता तसा तसा ज्या ज्या गावात ज्या काही घटना घडल्या त्या घटनेवरून आज ती गावे प्रसिध्द झालेली आहेत. ज्या गावात त्यांच्यावर फुले उधळली गेली त्या गावाला आज “फुलगाव” म्हटले जाते.डोळ्यांनी अंधळे झालेले शंभूराजे उंटा वरून खाली पडले त्या गावाला आज “आपटी” असे म्हटले जाते.संपूर्ण अटकेचा प्रवास झालेनंतर त्यांना भीमा भामा इंद्रायणी यांचा संगम झालेल्या किनारी वडाच्या झाडाला बांधण्यात आले होते.आजची  रात्र आणि उद्याची रात्र म्हणजे (१० मार्च १६८९ ) पर्यंत त्यांना झाडाला बांधून ठेवले होते.फलटणचे महातजी निंबाळकर मोठी कामगिरी केल्यासारखे मिरवीत होते.आज आपल्याला जी निंबाळकर घराण्याची शेखी मिरविली जाते ती सर्व थोतांड आहे.आज प्रत्येक मराठा इतिहासकार आणि संशोधक त्याला फायदा होईल असे लिखाण करीत असतात.त्यांना आपण एखादा प्रश्न केला की,लगेच ते आपल्याला म्हणतात तुम्ही लिहा तुमचा इतिहास अशा बऱ्याच लोका बरोबर माझे बोलणे झालेले आहे.मात्र यांच्या भाषणात नेहमी एक मुद्दा येतो आणि तो म्हणजे शिवरायांनी रांझ्याच्या गुजर पाटलाचे हातपाय कलम करून त्याचा चौरंगा केला.होय तो मराठा होता हे मान्य आहे पण त्याने जो गुन्हा केला त्याची शिक्षा भोगली आहे.त्याचा गुन्हा होता तो स्त्री ची बेअबदा त्याने काही स्वराज्या बरोबर गद्दारी केली नाही.मात्र ज्यांनी स्वराज्य बरोबर गद्दारी केली त्या सरदार घराण्यावर कोणी साधी टीका करताना दिसत नाही.ब्राह्मण मंत्र्यानी स्वराज्या बरोबर गद्दारी केली हे बरोबर आहे कारण तो त्यांचा धर्म होता.परंतु मराठ्यांनी गद्दारी केली हा काय त्यांचा धर्म होता काय....? एक मात्र या ३८ दिवसांच्या प्रवासात सगळी माहिती मिळाली नाही.परंतु जी काय माहिती मिळाली ती अतिशय भयानक अशी अंगावर थारे आणणारी माहिती आहे.स्वराज्य संपले ते इथल्या स्वार्थी सरदार घरणेशाही मुळे त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार दोनशे वर्ष लपविण्याचे कटकारस्थान झाले महात्मा ज्योतिबा फुले यांचे मुळे शिवरायांच्या समाधीचे दर्शन झाले...तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेमुळे भीमा कोरेगावच्या माध्यमातून शंभूराजे यांच्या समाधीचे दर्शन झाले.या ३८ दिवसांच्या प्रवासात १ फेब्रुवारी १६८९ “अर्जुना महार (कवठेकर) वीरगती दिन” आणि १६ फेब्रुवारी १६८९ “रायप्पा महार वीरगती दिन” घोषित करण्यात आला....तर २१ फेब्रुवारी १६८९ “ समतावादी स्वराज्य अंधकारमय दिवस” पाळण्यात आला.

No comments:

Post a Comment