Friday, March 9, 2018

आज अटकेचा अडोतीसावा दिवस (३८) १० मार्च १६८९ आज डोळ्यांनी आंधळे झाले शंभूराजे वडाच्या झाडला बांधलेले आहेत.....हळू हळू त्यांच्या अंगातील आता अवसान कमी कमी होऊ लागले आहे....! आपण सर्वानी सकाळी ११.०० ते ६.०० पर्यंत उपस्थित राहून शंभूराजे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना द्यावी असे आवाहन आपणास सकल मराठी समाज वतीने करण्यात येत आहे.....!



शंभूराजे वडाच्या झाडला बांधलेले अवस्थेत आहेत हळू हळू त्यांच्या अंगातील आता अवसान कमी कमी होऊ लागले आहे.कारण ३८ दिवसांचा अटकेचा प्रवास आता त्यांच्या शरीराला साथ देऊ शकत नव्हता.डोळे फोडलेल्या अवस्थेत त्यानी १७ दिवस काढलेले आहेत.या प्रवासात अर्जुना महार – रायप्पा महार आणि त्याचा भाऊ देवाप्पा महार वीरगतीला प्राप्त झाले आहे.उद्या म्हणजे ११ मार्च १६८९ मध्ये त्यांची मनुस्मृती प्रमाणे हत्या होणार आहे.त्यामुळे उद्याचा दिवस समतावादी स्वराज्यातील रयतेसाठी दुख:चा दिवस आहे.त्यांची आठवण आपल्या रोम रोमात असावी यासाठी सकल मराठी समाज वतीने उद्या दिनांक ११ मार्च २०१८ रोजी पुणेस्टेशन येथील डॉ बाबसाहेब आंबेडकर पुतळा याठिकाणी सकाळी ११.०० शंभूराजे यांची प्रतिमेचे पूजन करण्यात येणार असून महार योध्याचे इतिहासातील योगदानाची माहिती त्याठिकाणी देणार आहे.तरी आपण सर्वानी सकाळी ११.०० ते ६.०० पर्यंत उपस्थित राहून शंभूराजे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना मानवंदना द्यावी असे आवाहन आपणास सकल मराठी समाज वतीने करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment