Friday, March 23, 2018

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे बरोबरही ब्राह्मण होते मग नेमका विरोध कशाला....? छत्रपती शिवराय – शंभूराजे – उमाजी नाईक – महात्मा ज्योतिबा फुले - डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मणी व्यावस्थेकडून हत्याच...!


विषय असा आहे की,आर्यांचे आक्रमण होण्यापूर्वी सिंधू प्रांतातील पुजापाट आणि परंपरे संदर्भात भारतातील एक प्रमुख वर्ग कार्यरत होता आणि तो इथला भारतीय निवासी होता.होम हवन करणे ही आर्य संस्कृती होती तिचा आणि सिंधू संस्कृतीचा काही एक संबध नव्हता व नाही.आर्य लोकांनी जेव्हा भारत देशावर आक्रमण केले तेव्हा इथली संस्कृती ताब्यात घेण्यासाठी या वर्गावर खूप भयानक पद्धतीचा अन्याय व अत्याचार करण्यात आला.आर्यांनी त्यांच्या कुटनीतीने व त्यांच्या अंगीकृत असणाऱ्या कपटनीतीने इथली राजव्यवस्था आपल्या ताब्यात घेण्यासाठी राजघराण्यातील व्यक्तींच्या हत्या करण्याचे सूत्र अवलंबवून काही स्वार्थी लोक आपल्या गोटात घेण्याचे कार्य जोरात सुरू केल.देवगिरीचा राजाची हत्या करून त्याच घराण्यातील फितूर रामदेवराव जाधव याच्या माध्यमातून वर्णाश्रम धर्माची स्थापना या आर्य लोकांनी केली.अशा या वर्णाश्रम धर्माला इथला निवासी पुजापाट करणारा ब्राह्मण वर्गाने मोठ्या प्रमाणात विरोध केला.तेव्हा या आर्यांनी त्यांचेवर दहशत करून ब्राह्मणी व्यवस्था आपल्या ताब्यात घेऊन ब्राह्मण – वैश्य – क्षत्रिय – शुद्र अशी चातुवर्ण व्यवस्था निर्माण केली.आर्य आक्रमणापासून चातुवर्ण व्यवस्थेतून निर्माण झालेला ब्राह्मण हा शब्द तयार करून इथला भारतीय निवासी ब्राह्मण वर्ग या आर्य लोकांनी मारून टाकला आहे.परंतु अधून मधून हा वर्ग उदयास येई आणि इथल्या चातुवर्ण व्यवस्थेला विरोध करीत असे त्याचे कारण असे की,भारतातील शिवलिंग मंदिरे याच ब्राह्मण वर्गाच्या अधिपत्याखाली होती.छत्रपती शिवराय या ब्राह्मण वर्गाचा खूप आदर करीत असे त्यांच्या दरबारात जे चिटणीस होते त्यांचे नाव बाळाजी आवजी असे होते.नंतरच्या काळात त्यांची कायस्थ प्रभू म्हणून ओळख निर्माण झाली.आणि चातुवर्ण व्यवस्थेतून जे ब्राह्मण निर्माण झाले त्यांना आपण देशस्थ ॠग्वेदी म्हणून ओळखू लागलो.शंभूराजे यांचा लहान पणीचा मित्र कवीकलश हा कायस्थ प्रभू होता तो बौध्द धर्मीय शाक्य कुलीन होता.शृंगारपुर येथील पिलाजी शिर्के हे बौध्द धर्मीय शाक्य कुलीन होते.पिलाजी शिर्के यांची मुलगी येसूबाई यांचे बरोबर शंभूराजे यांचा विवाह झाला होता.त्यामुळे शंभूराजे यांनी शाक्य धर्म स्वीकारून छत्रपती शिवराय यांना देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मण यांनी शिवरायांची मुंज करून केलेला पहिला राज्याभिषेक नाकरून शाक्त धर्म पद्धतीत दुसरा राज्याभिषेक करावयास लावला.चातुवर्ण धर्म व्यावस्था प्रस्थापित होत नसल्यामुळे देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मणी व्यावस्था वेडीपीसी झाली होती.हातातील राजव्यवस्था जर निघून गेली तर स्वराज्य ताब्यात येणार नाही आणि आपली चातुवर्ण ब्राह्मणी व्यवस्था प्रस्थापित होणार नाही.तेव्हा या देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मणी व्यवस्थेने शिवरायांच्या घरात स्वार्थ निर्माण करून त्यांचेवर विषप्रयोग करून त्यांची हत्या केली.मात्र युवराज शंभूराजे यांच्या हत्येचा कट उधळला गेला आणि त्याची शिक्षा त्यातील काही देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मणाला भोगावी लागली.त्यानंतर शंभूराजे यांनी शाक्त धर्म पद्धतीत स्वत:चा राज्याभिषेक करून ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले.कविकलश यांचे बरोबर त्यानी स्वराज्यात शाक्त धर्माचा प्रचार आणि प्रसार जोरात सुरु करून राज्यविस्ताराचे कार्य जोरात सुरु केले.देशस्थ ब्राह्मणी व्यवस्था पूर्णपणे हादरून गेली कारण कायस्थ प्रभू यांचा वर्ग मोठ्या प्रमाणात उभा राहताना त्यांना दिसू लागला.तेव्हा पुन्हा देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मणी व्यवस्थेने शिवराय आणि शंभूराजे यांच्या घरात स्वार्थ निर्माण करून औरंगाजेब याचे बरोबर संगनमत करून शंभूराजे यांचा विश्वासघात करून औरंगजेबाच्या केवळ अडीच हजार सेनेच्या बळावर त्यांना जेरबंद करून तुळापुर येथे आणून देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मणी व्यवस्थेचा ग्रंथ मनुस्मृती प्रमाणे छत्रपती संभाजी महाराज यांची हत्या करून शाक्त धर्मीय शंभूराजे  आणि कायस्थ प्रभू कविकलश यांना षड्यंत्र करून वर्णाश्रम धर्माचा धर्मवीर बनविण्यात आले.अशा शाक्त धर्मीय शंभूराजे यांच्या हत्येचा बदला सातारा गादीचा सरदार शाक्त धर्मीय सिद्धनाक महार याने उमाजी नाईक यांचे काही लोक बरोबर घेऊन भीमा कोरेगाव याठिकाणी १ जानेवारी १८१८ मध्ये पेशवाईचा अंत करून टाकला.त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज यांना प्रेरणास्थानी ठेऊन रामोशी योद्धा उमाजी नाईक यांनी शाक्त धर्म पद्धतीत १८२३ मध्ये स्वत:चा राज्याभिषेक करून ते राजे झाले आणि त्यांनी संभाजी महाराज यांच्या पावलावर पाउल ठेऊन स्वराज्याचे कार्य करू लागले.देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मणी व्यवस्थेने या उमाजी नाईक याला दरोडेखोर ठरवून इंग्रजांच्या हातून उघड्या ठिकाणी झाडाला बांधून त्यांचा फासावर लटकवून तीन दिवस मृतदेह झाडाला ठेवून स्वराज्याचा योध्दा असणारा आणि पेशवाईचा अंत करण्यासाठी सिद्धनाक महार याला साथ देणारा रामोशी योध्दा याला दरोडेखोर जमात म्हणून घोषित केले.त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांचा १८२७ ला जन्म झाला त्यांनी या ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात जोरात कार्य सुरू केले.शाक्त धर्म मारण्यासाठी वर्णाश्रम धर्म दहशतीच्या बळावर आणि भीती दाखवून या ब्राह्मणी व्यवस्थेने सर्वांना शुद्र ठरविले होते यातून छत्रपती शिवाजी महाराज देखील वाचले नाहीत.अशा या वर्णाश्रम धर्माच्या विरोधात महात्मा फुले यांनी कायस्थ प्रभू यांना बरोबर घेऊन कार्य करून सामजिक जागृती करून लपविली गेलेली छत्रपती शिवरायांची समाधी शोधून त्यांचे विचार रयते समोर आणून शिवरायांची पहिली जयंती १८६९ मध्ये साजरी केली.शुद्र ठरविणारा वर्णाश्रम धर्माच्या विरोधात जाऊन त्यांनी १८७३ साली सत्यशोधक धर्म स्थापन करून पुन्हा एकदा सिंधू संस्कृतीचे दर्शन रयतेला दिले.या कार्यात त्यांच्या बरोबर महार योद्धा होता त्यामुळे या धर्माला दाबण्यासाठी देशस्थ ब्राह्मणी व्यवस्थेने शाक्त धर्मीय महार योद्ध्यांना अस्पृश्य ठरविण्यासाठी इंग्रजी राजवटीच्या माध्यमातून १८७४ मध्ये त्यांच्या जमिनी काढून घेतल्या आणि त्यांना अस्पृश्य ठरवून अघोषित बहिष्कार त्यांच्यावर टाकून त्यांना सार्वजनिक ठिकाणाच्या पाणवट्या पासून वंचित ठेऊन १८७५ मध्ये आर्य सनातनी हिंदू धर्माची स्थापना करण्यात आली.जेव्हा महात्मा फुले यांना या सर्व गोष्टी लक्षात आल्या तेव्हा त्यांनी त्यांच्या वाड्यातील पाण्याची विहीर १८८० मध्ये अस्पृश्य ठरविलेल्या महार योद्ध्यांच्या वंशजासाठी खुली करण्यात आली.इंग्रजांनी महार योद्ध्यांच्या काढून घेतलेल्या जमिनी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी परत देण्यात याव्यात असा तगादा ज्यावेळेस महात्मा फुले यांनी इंग्रजाकडे लावला तेव्हा इंग्रजांनी काढून घेतलेल्या जमिनीच्या १२ टक्के परतावा म्हणून १८८४ ला महार योद्धा आणि रामोशी योद्ध्यांना परत करण्यात आल्या.जेव्हा देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मणी व्यावस्थेच्या लक्षात आले की,जो पर्यंत महात्मा फुले जिवंत आहेत तो पर्यंत इथला महार योद्धा आणि रामोशी योध्दा संपणार नाही आणि आर्य सनातनी हिंदू धर्म प्रस्थपित करता येणार नाही आणि मनुस्मृतीचा कायद्याचा अमल करता येणार नाही.तेव्हा या देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मणी व्यावस्थेने १८९० मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची हत्या केली.त्यानंतर १८९१ मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला त्यांचे शिक्षण सातारा गादीचे छत्रपती प्रतापसिंह भोसले यांनी स्थापन केलेल्या शाळेत १ ली ते ४ थी पर्यंत झाले त्यांना स्वराज्याचे सयाजी गायकवाड आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी मदत केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले समजून घेतले आणि त्यांना गुरु मानून शिवरायांचे स्वराज्य समजून घेतले.तेव्हा त्यांच्या लक्षात आले की,कायस्थ प्रभू हा भारतीय निवासी असून सिंधू संस्कृती मधील शिवलिंग पुजारी असून शाक्त धर्मीय आहे.ब्राह्मणी व्यवस्थेच्या मनुस्मृतीचा तोही अन्यायग्रस्त व्यक्ती आहे.तेव्हा त्याला बरोबर घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर १९२४ मध्ये समता सैनिक दल स्थापन केले.त्यानंतर त्यांनी १९२७ साली भीमा कोरेगाव येथील सिद्धनाक महार याने पेशवाई अंत केला त्याठिकाणी उभारलेल्या विजयस्तंभास मानवंदना देऊन महाड येथे ज्या मनुस्मृती प्रमाणे शंभूराजे यांची हत्या करण्यात आली अशी मनुस्मृती कायस्थ प्रभू यांना बरोबर घेऊन दहन केली.चवदार तळ्याच्या सत्याग्रहांच्या हातामध्ये भगवा ध्वज देऊन शिवाजी महाराज यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या.समता प्रस्थापित करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उभे आयुष्य वेचले आहे.१९४९ साली स्वातंत्र भारताला संविधान देऊन मनुस्मृतीचा कायदा मोडीत काढला.वर्णाश्रम धर्म प्रस्थापित करण्यासाठी १८७५ मध्ये स्थापित झालेला आर्य सनातनी हिंदू धर्म मोडीत काढून पुन्हा एकदा शाक्त धर्म प्रस्थापित करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धम्माची दीक्षा साल १९५६ मध्ये घेतली.संविधानामुळे मोडीत निघालेला मनुस्मृतीचा कायदा आणि पुन्हा प्रस्थापित होता असलेला बौध्द धर्म यामुळे देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मणी व्यवस्था पुरती हादरून गेली.त्यांच्या लक्षात आले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना रोखण्याची क्षमता आपल्यात नाही.त्यामुळे पुन्हा एकदा विश्वासघात होऊन १९५६ मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची हत्या करण्यात आली.त्यामुळे कायस्थ प्रभू ब्राह्मण हा आपला शत्रू नसून देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मणी व्यवस्था ही भारत देशाला पर्यायाने मानवी धर्माला घातक व्यावस्था आहे.

1 comment:

  1. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले म्हणून आपण सर्व भारतीय १५ ऑगस्ट हा दिवस सणासारखा साजरा करतो पण आजकाल भारत ज्या दिवशी संपूर्ण पारतंत्र्यात गेला तो दिवस म्हणजे एक जानेवारी १८१८ हा दिवस सुद्धा काही जण सणासारखा साजरा करू लागले आहेत जो स्तंभ संपूर्ण भारत पारतंत्र्यात गेला म्हणून इंग्रजांनी उभा केला आहे त्या स्तंभाला अभिवादन करायला लाखोंची गर्दी काय होते आणि स्वतंत्र भारतातील सरकार त्या लोकांना सुविधा काय पुरवितात सारेच अतर्क्य आहे
    आपला देश गुलामगिरीत गेला म्हणून जल्लोष करणारे लोक आणि त्या प्रतीकाला अभिवादन करणारे लोक पाहून सर्व जगातील लोक लोक यांच्या गुलामी वृत्तीला हसत असतील आक्रमण करून जिंकायला हि जमीन किती भुसभुशीत आहे हे त्यांना पटले असेल जय देशद्रोह जय गुलामगिरी

    ReplyDelete