Sunday, September 12, 2021

स्वराज्यातील आठवा बलुतेदार जोत्शी होय.....! राजेश खडके समन्वयक सकल मराठी समाज


 

गावगाड्यातील आपण बारा बलुतेदार समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत.या गावगाड्यात जेव्हा सनातन धर्म व्यवस्थेचा शिरकाव झाला..आणि गावगाड्यातील समताविस्थापित करण्याचे काम सुरु झाले तेव्हा या गावगाड्यातील समता टिकविण्यासाठी गावगाड्यातील बलुतेदार आणि अलुतेदार यांनी पुढकार घेऊन वारकरी पंथ स्थापन केला.पंढरपूर येथील विठ्ठलरुपी गौतम बुद्धांचे विचार स्वीकारून गावगाड्यात समताप्रस्थापित करण्याचे कार्य केले.आता पर्यंत जे सात बलुतेदार आपण समजून घेतले.त्यापैकी पहिला बलुतेदार महारातील संत चोखोबा,दुसरा बलुतेदार सुतारातील संत भोजलिंग काका सुतार,चौथा बलुतेदार चांभार मधील संत रोहिदास.पाचवा कुंभारातील संत गोरा कुंभार,सहावा बलुतेदार न्हावी मधील सेना न्हावी,सातवा बलुतेदार म्हणजे सोनारमधील संत नरहरी सोनार यांनी समताप्रस्थापित करण्याचे कार्य केले आहे.आजच्या लेखात आपण आठवा बलुतेदार म्हणजे जोत्शीसमजून घेणार आहोत.या जोत्शी समाजाची कुणब्याला फार मदत होत असे.हा समाज त्याकाळी वातावरणाचा आढावा घेऊन पाऊस कधी पडणार आणि पिके कोणती घ्यायची तसेच पेरणी कधी करायची याची माहिती कुणब्याला देत असे तसेच माणसावर किंवा शेतावर रोगराई येईल काय...? याची माहिती देत असत.त्याच प्रमाणे निसर्गाचा आढावा घेऊन येणारा काळ कसा असेल याची माहिती तो गावातील लोकांना देत असत..त्यामुळे त्या कुटुंबात किती लोक आहेत...ते लोक काय करतात...त्या कुटुंबावर काय संकट आले आहे किंवा त्यांचे प्रश्न काय आहेत याची माहिती तो गावप्रमुखाला देत असत.त्यामुळे त्याच्या माहितीच्या आधारे काय उपाय योजना कराव्यात हे त्या गावप्रमुखाला समजत असत.

     या समाजाचा आभ्यास पहाता छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभारणीत या समाजाला सामवून घेऊन त्याच्यावर हेरगिरी करण्याची जबाबदारी दिली.शत्रूच्या गोठातील माहिती गोळा करून स्वराज्याला पुरविण्याचे काम त्याने केले आहे.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गनिमी कावे यशस्वी होत असे.छत्रपती शिवाजी महाराज यांचा या जोत्शी समाजावर फार विश्वास होता.या समाजामुळे स्वराज्याचे हेरगिरी खाते मजबूत झाले होते.छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या स्वराज्यात जोत्शी समाजाने केलेल्या कामामुळे तो शिवरायांचा मावळाम्हणून संबोधला जाऊ लागला.छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांना औरंगजेब मरहटटे म्हणून बोलायचा..त्या मरहटटेला नंतर मराठा म्हणून संबोधले जाऊ लागले.त्यामुळे जो स्वराज्याचा मावळाहोता त्याची पुढे मराठाम्हणून ओळख निर्माण झाली.त्यामुळे मराठाहा दुसरा तिसरा कोणी नसून तो गावगाड्यातील बलुतेदार आणि अलुतेदार आहे हे आपण समजून घेतले पाहिले.

       आज गावगाडा उभा केलेला जोत्शीहा गावातून विस्थपित झालेला समाज म्हणून पुढे आलेला आहे.त्याचे अस्तित्व आज गावगाड्यात दिसत नाही.तो भटका समाज म्हणून भटकत आहे.लोकांचे पोपटाच्या माध्यमातून भविष्य सांगणे हा त्याचा व्यवसाय संपुष्टात आलेला आहे.त्याची भटके विमुक्त म्हणून नोंद झालेली आहे.आज तो भटके विमुक्त प्रवर्गात मोडत असून भटके विमुक्त (एनटी बी ) प्रवर्गा मधील अनुक्रमांक १३ वर जोत्शीचा जोशीम्हणून नोंद झालेला आहे....राज्यात मुठभर समाज म्हणून त्याची ओळख निर्माण झालेली आहे

No comments:

Post a Comment