Sunday, September 12, 2021

स्वराज्यातील तिसरा बलुतेदार लोहार होय.....! राजेश खडके समन्वयक सकल मराठी समाज


       पहिल्या व दुसऱ्या भागात आपण गावगाडा कसा उभा राहिला हे समजून घेऊन त्यातील पहिला बलुतेदार महार आणि दुसरा बलुतेदार सुतार समजून घेऊन त्याचे गावगाड्यातील आणि स्वराज्यातील योगदान समजून घेतले आहे.आता तिसरा बलुतेदार म्हणजे “लोहार” आपण समजून घेणार आहोत.सिंधू संस्कृतीमधून उभ्या राहिलेल्या गावगाड्यात ग्रामदेवत दिसतात.....आणि या गावगाड्यात पूर्वीपासून सनातन धर्म व्यवस्थेच्या विरोधात बौध्द धम्म दिसतो.म्हणजेच काय तर गावगाडा हा बौध्द धम्म विचारावर चालणारा गावगाडा होता हे कोणीही नाकरू शकत नाही.गावगाड्यात लोखंडाच्या लागणाऱ्या वस्तू बनविण्यासाठीचे काम जंगलतील काही लोकांनी हातात घेतले.त्यामुळे लोखंडापासून वस्तू बनविणाऱ्याना पुढे लोहार म्हटले जाऊ लागले आणि तो एक समाज त्या गावगाड्यात निर्माण झाला.त्याने गावगाड्यातील शेतीसाठी लागणारे अवजारे निर्माण केली.लोहार हा तप्त लोखंडाला ऐरणीवर ठोकून ठोकून लोहार वस्तूस आकार देतात.शेतीसाठी लागणारे जसे नांगराचा फाळ,विळा.खुरपी,कुदळ,टिकाव,पहारी,घमेली,पाण्याच्या मोटी,प्राण्यांच्या खुराना ठोकायच्या नाळ,बैलगाड्यांच्या चाकांना लागणारे लोखंडी धाव इत्यादी वस्तू बनविण्याचे काम त्यांनी केले आहे.गावगाड्यातील घरे,इमले,वाडे उभारण्यासाठी लागणाऱ्या वस्तू त्यांनी बनविल्या आहेत.जसे दरवाजांना लागणारे कोयंडे,खिडकीचे गज,सळ्या वगैरे बनविण्याचे काम त्यानी केले आहे.गावगाड्याच्या संरक्षण करण्याची जबाबदारी ही महार समाजाकडे होती म्हणजे सैन्याचे फळी त्यांच्याकडे होती.त्यामुळे सैन्यांना लागणारी शस्त्रे बनविण्याचे देखील काम लोहाराकडे होते.जसे ढाल,तलवारी,भाले,बिचवे इत्यादी वस्तू बनविण्याचे काम त्यानी केले आहे.एकंदरीत काय तर गावगाडा उभारणीत महत्वाचे स्थान हे लोहाराचे होते हे आपण समजून घेतले पाहिजे.लोहार नसता तर गावगाड्यातील घरे,इमले,वाडे उभी राहिली नसती आणि शेतीतील अवजारे उभी राहिली नसती.तसेच गावगाड्याच्या संरक्षणासाठी उभ्या राहिलेल्या सेनेकडे शस्त्रसाठा निर्माण झाला नसता.

       गावगाड्या मधून शशस्त्र सेना उभी राहिली होती.ज्या गावगाड्यात बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार एकसंघ उभी राहिल्यामुळे तिथली प्रशासन व्यवस्था मजबूत उभी राहिली होती.मग ज्या गावगाड्याचा कारभार चांगला असायचा तो गावगाडा इतर गावावर आपली प्रशासन व्यवस्था राबविण्यासाठी पुढे यायचा यातूनच पुढे सरंजामशाही उभ्या राहिल्या.....आणि या सरंजामशाहीवर आपला ताबा निर्माण करण्यासाठीचे कार्य आर्य सनातन धर्म व्यवस्था राबविणारे पुढे आले.आणि या लोकांनी गावची व्यवस्था आपल्या हातामध्ये हळू हळू घेण्यास सुरुवात केली.आणि गावगाड्यातील लोकावर अन्याय करण्याचे कार्य सुरु झाले.या सरंजामशाही गावातून कर वसुल्या करायला लागल्या या सरंजामशाही यांच्या माध्यमातून आठव्या शतकात कोकणात आलेल्या आर्यांनी त्यांच्या पाठीमागून आलेले रजपूत यांच्या माध्यमातून उभ्या असलेल्या महाराष्ट्रावर वर्णाश्रम धर्म लादण्याचा प्रयत्न सुरु केला.गावातील “समता” विस्थापित करण्यासाठीचा प्रयत्न त्यांनी सुरु केला.गावगाड्यातील बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार तसेच कुणबी यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे शुद्र म्हणून लेखू लागले.आणि या शूद्रामध्ये उच्च नीच्च म्हणून विभागणी करू लागले.ह्या विभागणीमुळे एकसंघ असलेला गावगाडा विभागू लागला.या गावगाड्यात समता विस्थापित होऊ नये यासाठी बाराशेमध्ये संत नामदेव यांनी पंढरपुरातील गौतम बुद्धांना केंद्रस्थानी ठेऊन भगव्या पताक्याखाली वारकारी पंथ स्थापन करून तो गावागावात पोहचविला.याच वारकारी पंथातील संत तुकाराम महाराज यांना गुरु मानून या समतेच्या ध्वजाखाली गावगाड्यातील बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार यांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य उभे केले.या स्वराज्याला लागणारा शस्त्रसाठा हा लोहाराने निर्माण केला ढाल,तलवारी,भाले,तोफा बनविण्याचे काम इथल्या लोहाराने केले.आणि शिवरायांनी उभ्या केलेल्या सैन्यामध्ये तो सामील होऊन तो स्वराज्याचा मावळा झाला.

         परंतु गावगाडा उभा केलेला लोहार आणि स्वराज्य स्थापनेत योगदान दिलेला लोहार आज विस्थापित झालेला आहे.गावगाड्यापासून असणाऱ्या लोहाराची लोकसंख्या आज दिसत नाही.लोहारमध्ये अनेक जाती निर्माण करून गावगाड्यातील त्याचे अस्तित्व संपुष्टात आलेले आहे.आज तो भटक्या जमाती मधील एनटी बी प्रवर्गातील अनुक्रमांक ८ मध्ये येतो.आज तो सामाजिक आणि राजकीय मागासलेल्यामध्ये आहे.त्याचे गावगाड्यात अस्तित्व दिसत नाही.

No comments:

Post a Comment