Wednesday, August 29, 2012

पुणे





पुणे

पुणे Pune.ogg उच्चार  हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोयीसुविधा व विकासाबाबतीत पुणे हे महाराष्ट्रात मुंबईनंतर अग्रेसर आहे.
शिवपूर्वकाळापासून ज्ञात इतिहास असलेले पुणे हे भारतातील सातवे मोठे शहर व महाराष्ट्रातील दुसरे मोठे शहर आहे.संदर्भ हवा ].समृद्ध सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा लाभलेले पुणे शहर ही महाराष्ट्राची 'सांस्कृतिक राजधानी';शहरात असलेल्या नामांकित शिक्षणसंस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर मानली जाते.पुणे शहर उद्दोग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातसुद्धा अग्रेसर आहे.मराठी ही शहरातील मुख्य भाषा आहे.

नाव

पुणे हे नाव 'पुण्यनगरी' या नावावरून आले असल्याचे समजले जाते. इ.स. ८ व्या शतकात ते 'पुन्नक' (किंवा 'पुण्यक') नावाने ओळखले जात असल्याचे संदर्भ सापडतात. इ.स. ११ व्या शतकात ते 'कसबे पुणे' किंवा 'पुनवडी' नावाने ओळखले जाऊ लागले. मराठा साम्राज्याच्या कालखंडात या शहराचे नाव 'पुणे' असे वापरले जात होते. ब्रिटिशांनी त्याला 'पूना' संबोधण्यास सुरुवात केली. आता हे शहर पुणे या अधिकृत नावाने ओळखले जाते.

इतिहास

आठव्या शतकात पुणे हे पुन्नक म्हणून ओळखले जात असे. शहराचा सर्वांत जुना पुरावा इ.स. ७५८चा आहे ज्यात त्या काळातील राष्ट्रकूट राजवटीचा उल्लेख आढळतो. मध्ययुगीन काळाचा अजून एक पुरावा म्हणजे जंगली महाराज रस्त्यावर असलेली पाताळेश्वर लेणी. ही लेणी आठव्या शतकातील आहेत.
१७ व्या शतकापर्यंत हे शहर निजामशाही, आदिलशाही, मुघल अशा वेगवेगळ्या राजवटींच्या अंमलाखाली होते. सतराव्या शतकामध्ये शहाजीराजे भोसले यांना निजामशाहाने पुण्याची जहागिरी दिली होती.. या जहागिरीमध्ये त्यांच्या पत्नी जिजाबाई वास्तव्यास असताना इ.स. १६२७ मध्ये शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीराजे भोसले यांचा जन्म झला. शिवाजी महाराजांनी आपल्या साथीदारांसह पुणे परिसरातील मुलखापासून सुरुवात करत मराठ्यांचे स्वराज्य स्थापले. या काळात पुण्यात शिवाजीमहाराजांचे वास्तव्य होते. पुढे पेशव्यांच्या काळात इ.स. १७४९साली सातारा ही छत्रपतींची गादी असलेली राजधानी राहून पुणे मराठा साम्राज्याची प्रशासकीय राजधानी बनली. पेशव्यांच्या या काळात पुण्याची मोठी भरभराट झाली. इ.स. १८१८ पर्यंत पुण्यावर मराठ्यांचे राज्य होते.

भूगोल

जगाच्या नकाशावरती पुण्याचे अक्षांश १८° ३१' २२.४५" उत्तर, आणि रेखांश ७३° ५२' ३२.६९ पूर्व असे आहेत.
पुण्याचा संदर्भ बिंदू (Zero milestone) हा पुण्यातील कॅम्प भागात असलेल्या जनरल पोस्ट ऑफिसच्या इमारतीबाहेर आहे. पुणे शहर हे सह्याद्री पर्वतरांगाच्या पूर्वेस, समुद्रसपाटीपासून ५६० मीटर (१,८३७ फूट) उंचीवर आहे. भीमा नदीच्या उपनद्या मुळा व मुठा यांच्या संगमावर हे शहर वसले आहे. पवना व इंद्रायणी या नद्यादेखील पुणे शहराच्या वायव्येच्या भागांतून वाहतात. शहराचा सर्वोच्च बिंदु वेताळ टेकडी समुद्रसपाटीपासून ८०० मीटरवर आहे तर शहराच्या जवळ असलेल्या सिंहगड किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३०० मीटर आहे. पुणे शहर हे कोयना भूकंपप्रवण क्षेत्रात येते. कोयना गाव पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटरवर आहे. पुण्याला मध्यम व लहान भूकंप झालेले आहेत. कात्रज येथे मे १७२००४ रोजी ३.२ रिश्टर स्केल चा भूकंप झालाहोता.
डोंगर आणि टेकड्या -
पुणे शहरात आणि आजूबाजूला बऱ्याच टेकड्या आहेत.
  • कात्रजची टेकडी
  • गुलटेकडी
  • चतुःशृंगी
  • तळजाई
  • तुकाई
  • पर्वती
  • पाचगाव
  • पाषाण
  • फर्ग्युसन कॉलेजची टेकडी
  • बकरी हिल
  • बावधनची टेकडी
  • बोपदेव घाट-टेकडी
  • येरवड्याची येरंडेश्वर टेकडी
  • राम टेकडी
  • रेंज हिल्स
  • वनदेवी टेकडी (कर्वे रोड)
  • वाघजई
  • विधि महाविद्यालयाची टेकडी (एस्‌एन्‌डीटीची टेकडी)
  • वेताळ टेकडी
  • सिंहगड
  • सूसची टेकडी
  • हनुमान टेकडी
नद्या, तलाव, हौद आणि नाले -
  • आंबील ओढा
  • इंद्रायणी
  • एस पी कॉलेजचा तरणतलाव
  • करपे तलाव(हा कॉंग्रेस हाउससमोर होता)
  • कात्रजचा तलाव
  • काळा हौद
  • कोंढव्याचे तळे
  • गोपाळ हायस्कूलचा तरणतलाव
  • टिळक तरणतलाव
  • तळजाई तलाव
  • देव नदी
  • धनकवडी तरणतलाव
  • नाग नदी
  • नागझरी
  • नाना हौद
  • नांदे तरणतलाव
  • पंचहौद
  • पद्मावती तळे
  • पवना नदी
  • पाषाण तलाव
  • पेशवेकालीन कात्रजचा पाट
  • फडके हौद
  • भामा नदी
  • महाराष्ट्रीय मंडळाचा तरणतलाव
  • मानस सरोवर
  • मुठा उजवातीर कालवा
  • मुठा डावा तीर कालवा
  • मुठा नदी
  • मुळा नदी
  • भैरोबा नाला
  • शाहू तरणतलाव
  • शिवाजी तलाव(हा बुजवून त्यावर संभाजी उद्यान केले)
  • सदाशिव पेठ हौद
  • साततोटी हौद
  • सारसबाग तळे

पुण्यात वरच्या यादीत नसलेले अनेक निनावी नाले आणि पूल आहेत. बांधकामे करून करून पुण्यातल्या दोन नद्यांना नाले बनवले आहे. मुठा उजव्या कालव्याच्या प्रवाहाला दुभंगून वाहणारे जुना कालवा आणि नवा कालवा असे दोन एकमेकांना समांतर असणारे कालवे हडपसरमध्ये आहेत. या प्रत्येक नाल्यावर आणि कालव्यांवर अनेक निनावी कॉजवे किंवा पूलही आहेत..उदाहरणार्थ, आंबील ओढ्यावर शाहू कॉलेज रोडवरच्या स्टेट बॆंकेच्या कॉलनीजवळ, दांडेकर पुलाखालून आणि दत्तवाडीजवळ असे तीन पूल आहेत, त्यांना नावे नाहीत. मुठेच्या उजव्या कालव्यावर सारसबागेजवळच्या सावरकरपुतळ्याशेजारी, स्वारगेटजवळ, हिंगणे गावठाणाजवळ, कर्वेनगरजवळ, आणि गोळीबार मैदानाशेजारी पूल आहेत, मात्र त्यांना नावे नाहीत, नाही म्हणायला आंबील ओढा आणि उजवा कालवा या दोघांवरती समाईक असलेल्या आणि पेशवे पार्क जवळ असलेल्या पुलाला शाहू महाराज पूल असे नाव दिले होते.हल्ली ते नाव वापरात नसावे. भैरोबा नाल्यावरच्या शिंद्यांच्या छत्रीजवळच्या आणि इतर तीनचार पुलांना नावे दिलेलीच नाहीत.

पूल

मुठा नदीवरील पूल-
  • वारजे पूल(देहू रोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर)
  • राजाराम पूल
  • म्हात्रे पूल
  • एस.एम.जोशी पूल
  • यशवंतराव चव्हाण पूल
  • लकडीपूल (संभाजी पूल)
  • झेड पूल (Z-Bridge))
  • भिडे पूल
  • जयंतराव टिळक पूल
  • ओंकारेश्वर पूल
  • नवा पूल (शिवाजी पूल - Lloyd's Bridge)
  • दगडीपूल (डेंगळे पूल)
  • संगम पूल(रेल्वेचा आणि वाहनांचा)
  • आणि शिवाय दोन दुचाकीसाठीचे पूल आणि काही कॉजवे.
मुळा नदीवरचे पूल -
  • औंधचा पूल
  • बोपोडीचा पूल
  • दापोडीचा हॅरिस ब्रिज
  • बंड गार्डन पूल

ओढ्या-नाल्यांवरील पूल -
  • भैरोबा नाला पूल
  • नागझरी वरचा दारुवाला पूल
  • आंबील ओढ्यावरचा पूल
  • उजव्या-डाव्या कालव्यांवरचे पूल

[edit]पेठा

पुणे हे पेठांचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. पुणे शहर हे पूर्वीच्या मध्यवस्तीतल्या नदीकाठच्या पेठांपासून वाढत जाऊन, नवीन उपनगरे जोडली जात विस्तारत गेले आहे. या पेठांची नावे बहुतकरून आठवड्यातील वारांनुसार, तसेच ज्यांनी या पेठा वसवल्या अशा इतिहासकालीन व्यक्तींच्या नावांवरून ठेवली गेली आहेत.१६२५ मध्ये शहाजीराजे भोसलेयांनी रंगो बापुजी धडफळे यांची पुण्याच्या प्रशासकपदी नियुक्ती केली.रंगो बापुजी धडफळे यांनी कसबा पेठ,सोमवार पेठ ,रविवार पेठ आणि शनिवार पेठ ,या पेठा बांधल्या.१६३० मधील आदिलशहाच्या हल्ल्यानंतर दादोजी कोणदेव यांनी या पेठांची पुनर- उभारणी केली. पुण्यातील पेठांची नामावली अशी:
कसबा पेठरविवार पेठसोमवार पेठ (हिला शाहापूर पेठ म्हणत), मंगळवार पेठबुधवार पेठगुरुवार पेठशुक्रवार पेठशनिवार पेठगंज पेठ (महात्मा फुले पेठ)सदाशिव पेठनवी पेठनारायण पेठभवानी पेठनाना पेठरास्ता पेठगणेश पेठवेताळ पेठ (म्हणजेच गुरुवार पेठ), सेनादत्त पेठ, डेक्कन जिमखाना, नागेश पेठ (म्हणजेच न्याहाल पेठ).
गल्ल्या, बोळ, आळ्या
जुन्या पुण्यात अनेक गल्ल्या, आळ्या आणि बोळ होते. त्यांतले जवळपास सर्वच अजूनही जुन्याच नावाने टिकून आहेत. त्यांतल्या काहींची नावे:
  • कुंभारवाडा (जवळच कुंभारवेस, कागदीपुरा)
  • गाय आळी
  • गूळ आळी
  • गौरी आळी
  • चांभार आळी
  • चोळखण आळी
  • जुनी तपकीर गल्ली
  • जोगेश्वरीचा बोळ
  • तांबट आळी
  • तुळशीबागेचा बोळ
  • दाणे आळी
  • नेने घाट
  • पंतसचिवाची पिछाडी
  • फणी आळी
  • बुरूड आळी
  • बोहरी आळी
  • भाऊ महाराजांचा बोळ
  • मुंजाबाचा बोळ
  • मुजुमदारांचा बोळ
  • मेहुणपुरा
  • लोणार आळी
  • लोणीविके दामले आळी
  • शालूकर बोळ (भाऊ रंगारी बोळ)
  • शिंदे आळी
  • शिंपी आळी

[edit]उपनगरे

पुणे शहर हे पूर्वीच्या मध्यवस्तीतल्या नदीकाठच्या पेठांपासून वाढत जाऊन, नवीन उपनगरे जोडली जात विस्तारत गेले आहे. या उपनगरांची नामावली अशी:
कोथरूडकर्वेनगरहडपसरकात्रजऔंधशिवाजीनगरवाकडेवाडीकोरेगाव पार्कयेरवडाकल्याणीनगरविमाननगरधनकवडीबालाजी नगर (सातारा रस्ता),बिबवेवाडीकँपकोंढवावारजे माळवाडीखडकीदापोडीपाषाणबाणेरखराडीविठ्ठलवाडीवडगांव (बुद्रुक)आनंदनगर (सिंहगड रस्ता), धायरीपद्मावती,अरण्येश्वरपर्वतीदत्तवाडीगुलटेकडीसॅलिसबरी पार्कअप्पर इंदिरा नगरआंबेगावभुसारी कॉलनीबावधनगोखलेनगरवडारवाडीपिसोळीवानवडीघोरपडी,वडगांव शेरीवाघोलीविश्रांतवाडीसांगवीबोपखेलसुसमुंढवा

हवामान

पुणे शहरात उन्हाळा, (मॉन्सून) पावसाळा व हिवाळा हे ऋतू अनुभवायाला मिळतात. उन्हाळा- मार्च ते मे (तापमान २५°-२९° से.) असतो व एप्रिल हा सर्वांत उष्ण महिना आहे. मे महिन्यात पावसाच्या सरी सुरू होतात. या महिन्यात उष्णता असतेच पण काही वेळेस दमटपणा अनुभवायला मिळतो. पुण्याच्या रात्री बऱ्यापैकी थंड असतात.
जून महिन्यातील अरबी समुद्रातून येणाऱ्या मॉन्सून वार्‍यांनी पावसाळा सुरू होतो. पुण्याचे पर्जन्यमान वार्षिक ७२२ मि.मी. इतके आहे. जुलै महिन्यात सगळ्यात जास्त पाऊस पडतो. पर्जन्यमान मध्यम असले तरी अनेक वेळा पावसाच्या सरी पुणे शहरातील जीवनक्रम थांबवतात. पावसाळ्यात तापमान २०°-२८° सेल्शियस इतके असते.
मॉन्सूननंतर ऑक्टोबर महिन्यात दिवसाचे तापमान वाढते व रात्री थंड असतात. हिवाळा हा ऋतू नोव्हेंबर ते फेब्रुवारीमहिन्यांपर्यंत असतो. हा काळ पुण्याला भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ आहे. या काळात दिवसाचे तापमान २९°से तर रात्रीचे तापमान १०°से च्या खाली असते. डिसेंबर व जानेवारी महिन्यात तर तापमान ५-६°से पर्यंत उतरते. पुण्यात सर्वांत जास्त तापमान ४३.३°से इतके २० एप्रिल १९८७/७ मे १८८९ रोजी तर (१७८१-१९४० सालातील) सर्वांत कमी तापमान १.७°से १७ जानेवारी १९३५ला नोंदविले गेले. नुकतेच जानेवारी १९९१ला पुण्याचे तापमान २.८°से होते.

[edit]जैवविविधता

इथे पुणे शहर टपाल कार्यालयापासून २५ कि.मी. त्रिज्येच्या परिसरात साधारणपणे, सपुष्प वनस्पतींच्या १०००, फुलपाखरांच्या १०४, पक्षांच्या ३५० आणि सस्तन प्राण्यांच्या ६४ प्रजाती आढळतात.

अर्थकारण

पुणे हे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. महाराष्ट्र राज्यात मुंबई महानगरानंतर पुणे सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. अजूनही पुणे शहराचा विकास वेगाने होत आहे. हे भारतातील बहुधा सर्वांत वेगाने विकसित होणारे शहर असावे. जगातील सर्वाधिक दुचाक्या बनावणारा बजाज ऑटो उद्योग पुण्यात आहे. टाटा मोटर्स (भारतातील सर्वाधिक प्रवासी वाहतूक आणि औद्योगिक वाहने बनावणारा उद्योग), कायनेटिक, डाइमलर-क्रायस्लर (मर्सिडिझ-बेंझ), फोर्स मोटर्स (बजाज टेंपो) हे उद्योग पुण्याच्या परिसरात स्थिरावले आहेत.
पुण्यातील अभियांत्रिकी उद्योग - भारत फोर्ज (जगातील दुसरी सर्वांत मोठी फोर्जिंग कंपनी), कमिन्स ,अल्फा लावल, सँडविक एशिया, थायसन क्रुप (बकाव वुल्फ), केएसबी पंप, फिनोलेक्स, ग्रीव्ह्‌ज् इंडिया, फोर्ब्स मार्शल, थर्मेक्स इत्यादी.
विद्युत व गृहोपयोगी वस्तुनिर्माते व्हर्लपूल आणि एल.जी. यांचे उत्पादन करणारे कारखाने, फ्रिटो-लेज, कोका-कोला यांचे अन्न प्रक्रिया उद्योग पुण्यात आहेतच, शिवाय अनेक मध्यम व लहान उद्योगही पुण्यात आहेत. आंतरराष्ट्रीय हवाईमार्गाने पुणे जोडले गेले आहे. त्यामुळे जवळच्या जिल्ह्यांतील अनेक उद्योग निर्यात करू लागले आहेत.
पुण्यात माहिती-तंत्रज्ञान उद्योग विस्तारत आहे. हिंजवडीतील राजीव गांधी आय.टी पार्क, मगरपट्टा सायबरसिटी, तळवडे एम.आय.डी.सी. सॉफ्टवेर पार्क, मॅरिसॉफ्ट आय.टी.पार्क (कल्याणीनगर), आय.सी.सी., इत्यादी आय.टी पार्क्समुळे इन्फर्‌मेशन टेक्नॉलॉजी उद्योगाची भरभराट चालू आहे.
महत्त्वाच्या भारतीय सॉफ्टवेर कंपन्या- इन्फोसिस, टाटा, फ्ल्युएंट, क्सांसा, टी.सी.एस.टेक महिंद्राविप्रोपटनीसत्यमकॉग्निझंट, आयफ्लेक्स,सायबेज, के.पी.आय.टी. कमिन्स, दिशा, पर्सिस्टंट सिस्टम्स, जियोमेट्रिक सॉफ्टवेर, नीलसॉफ्ट व कॅनबे पुण्यात आहेत.
महत्त्वाच्या बहुराष्ट्रीय सॉफ्टवेर कंपन्या- बी.एम.सी. सॉफ्टवेर, एनव्हिडिया ग्राफिक्स, एच.एस.बी.सी. ग्लोबल टेक्नोलॉजिस, आय.बी.एम., रेड हॅट, सिमेन्स, ई.डी.एस., युजीएस, कॉग्निझंट, सिमॅंटेक, सनगार्ड, वर्संट, झेन्सार टेक्नालॉजीज, टी-सिस्टिम आणि एसएएस, आयपीड्रम वगैरे.
पुणे हे कॉल सेंटर किंवा बी.पी.ओ. उद्योगात देखील अग्रेसर आहे. कन्व्हरजिस, डब्ल्यु.एन.एस., इन्फोसिस, विप्रो, इएक्सएल, एमफेसिस या महत्त्वाच्या आऊटसोर्सिंग कंपन्या पुण्यात आहेत.
पुण्यातील महत्त्वाच्या कंपन्यांची मुख्यालये -
कमिन्स इंडिया लिमिटेडटेल्को/टाटा मोटर्स लिमिटेडबजाज ऑटो लिमिटेड,फोर्स मोटर्स लिमिटेडभारत फोर्ज लिमिटेड यासारखे उत्पादनक्षेत्रातील अनेक मोठे उद्योग येथे आहेत. १९९० च्या दशकात केपीआयटी कमिन्सइन्फोसिस,टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस,विप्रो,सिमँटेक,आय.बी.एम.,कॉग्निझंट सिंटेल सारख्या प्रसिद्ध सॉफ्टवेर कंपन्यांनी पुण्यात आपली केंद्रे उघडल्यापासून पुणे हे भारतातील एक प्रमुख माहितीतंत्रज्ञान उद्योगकेंद्र म्हणून नावारूपास आले आहे.

बाजारपेठ

मार्केट यार्ड व महात्मा फुले भाजी मंडई ही ठिकाणे कृषी उत्पादनांकरिता तर रविवार पेठ हा भाग ग्राहकोपयोगी उत्पादनांच्या घाऊक व्यापाराकरिता प्रसिद्ध आहे. बुधवार पेठ विद्युत आणि संगणकीय उपकरणे, गरम कपडे, बॅगा, पुस्तके इत्यादी उत्पादनांच्या घाऊक आणि किरकोळ व्यापाराकरिता माहीत आहे. तुळशीबाग हा बुधवार पेठेतील भाग तसेच डेक्कनवरील हाँगकाँग-लेन महिलांमध्ये लोकप्रिय नित्योपयोगी उत्पादनांच्या किरकोळ खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. याच भागातील अप्पा बळवंत चौक येथे शालेय व इतर पुस्तकांची बाजारपेठ आहे. लक्ष्मी रस्ता कपडा आणि तयार कपडे आणि सुवर्णालंकारांच्या खरेदीकरिता प्रसिद्ध आहे. कँप विभागातील महात्मा गांधी रस्ता व ईस्ट स्ट्रीट हे पाश्चात्यवळणाच्या उत्पादनांसाठी माहीत आहेत. त्या प्रमाणेच जंगली महाराज रस्ता, फर्गसन रस्ता, कर्वे रस्ता या भागातसुद्धा किरकोळ व्यापाराचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झालेला आहे.

[edit]प्रशासन

[edit]नागरी प्रशासन

पुणे शहराची व्यवस्था पुणे महानगरपालिका पाहते. महानगरपालिकेचे कार्यक्षेत्र नागरी प्रशासन व पायाभूत सेवा-सुविधा पुरवणे हे असते. प्रशासकीय प्रमुख या नात्याने बहुतांश कार्यकारी अधिकार महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या आय. ए. एस्‌. अधिकारी दर्जाच्या महापालिका आयुक्ताकडे असतात. महानगरपालिका मतदारांनी निवडून दिलेल्या नगरसेवकांनी बनते. नगरसेवकांचे नेतृत्व महापौर या पदावरील व्यक्तीकडे असते. महापौर हे केवळ नाममात्र पद असून या पदाकडे अधिकार कमी असतात. पुणे महापालिकेचे क्षेत्र हे ४८ प्रभागात विभागले गेले असून प्रत्येक विभागाचे कामकाज साहाय्यक आयुक्त पहात असतात. राज्यातील जवळजवळ सर्व राजकीय पक्ष आपले उमेदवार महापालिकेच्या नगरसभेवर निवडून येण्यासाठी उभे करतात.

[edit]जिल्हा प्रशासन

अधिक माहितीसाठी पहा पुणे जिल्हा
पुणे शहर महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात आहे. जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी हा असतो व त्याचे काम सातबारा, जमीनजुमल्याच्या नोंदी ठेवणे, राज्य सरकाराकरिता सारावसुली, करवसुली व निवडणुकीचे व्यवस्थापन करणे हे असते.

[edit]महानगर पोलीस यंत्रणा

पुणे पोलिसांचा प्रमुख पोलीस आयुक्त असतो. हा राज्याच्या गृह मंत्रालयाने नेमलेला एक आय. पी. एस्‌. अधिकारी असतो. पुणे पोलीस व्यवस्था ही महाराष्ट्र राज्याच्या गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येते.

वाहतूक व्यवस्था

पुणे शहर भारताच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी रस्ता, रेल्वे व हवाईमार्गाने चांगल्या प्रकारे जोडले गेले आहे. पुणे विमानतळावरुन पूर्वी फक्त देशांतर्गत वाहतूक चालत असे पण आता सिंगापूर व दुबईला जाणाऱ्या उड्डाणांमुळे, विमानतळ आंतरराष्ट्रीय झाला आहे.नवा ग्रीनफिल्ड पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प महाराष्ट्र सरकार सुरू करणार असून तो चाकण व राजगुरुनगर या गावांमधील चांदूस व शिरोळी यांच्या जवळ (पुण्यापासून ४० कि.मी. अंतरावर) होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाची जबाबदारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडेसोपवली गेली आहे.शहरात पुणे व शिवाजीनगर ही दोन महत्त्वाची रेल्वे स्थानके आहेत. पुणे स्थानकावर सर्व रेल्वेगाड्या थांबतात. पुणे व लोणावळ्यादरम्यान उपनगरी रेल्वे वाहतूक चालते. त्यामुळे पिंपरीखडकी व चिंचवड ही उपनगरे शहराशी जोडली गेली आहेत. पुण्याच्या उपनगरी गाड्यालोणावळ्यापर्यंत जातात तर मुंबईच्या कर्जत पर्यंत येतात. मध्ये फक्त घाटमार्गाची अडचण आहे. रेल्वे प्रशासन लोणावळा व कर्जत/खोपोली ह्या गावांदरम्यानही स्थानिक उपनगरी गाड्या चालू करण्य़ाचा विचार करीत आहे. असे होऊ शकले तर, पुणे-मुंबईच्या दरम्यान असलेल्या कुठल्याही स्थानकावरून दुसऱ्या कुठल्याही स्थानकाला गाडी न बदलता जाता येईल. कर्जत-पनवेल लोहमार्ग तयार झाला असून त्यामुळे पुणे-मुंबई शहरातील अंतर २९ कि.मी.ने कमी झाले आहे. मात्र या मार्गावरून अजून फार गाड्या धावत नाहीत.
पुणे व मुंबई दरम्यानची रस्तावाहतूक मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गामुळे सुधारली आहे. यामुळे दोन्ही शहरांदरम्यान केवळ तीन तासांचे अंतर राहिले आहे. शासकीय व खाजगी बससेवा पुण्यालामुंबईहैदराबाद व बंगळूर या शहरांशी जोडतात. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे (एस.टी) बससेवा पुण्याला महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाशी जोडते.
पुणे शहर हे २०१० पर्यंत महत्त्वाचे आय.टी केंद्र होण्याच्या मार्गावर आहे. पुण्याचे चाकरमानी वाढत आहेत त्याचबरोबर गाड्या(कार)/दुचाक्यांची संख्या वाढत आहे. २००५ मध्ये पुण्याच्या १४६ चौ.कि.मी क्षेत्रफळात २०,००,०० कार (मोटारगाड्या) व १०,००,००० दुचाक्या होत्या असे एका अभ्यासात नमूद केले आहे. पुण्यातील उपनगरे कल्याणीनगर, विमाननगर, मगरपट्टा, पिंपरी, चिंववड, बाणेर, वाकड, औंध, हिंजवडी, बिबवेवाडी, वानवडी, निगडी-प्राधिकरण झपाट्याने वाढत आहेत पण अरुंद रस्ते वाढत्या वाहनांना कमी पडत आहेत. रस्ता रुंदीकरण, उड्डाणपूल वैगरे प्रकल्प अनेक वर्षे प्रलंबित आहेत. काही पूल बांधून तयार झाले आहेत. तरीही, महापालिका प्रशासनाच्या दिरंगाईमुळे योजना अंमलात यायला खूप वेळ लागतो.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुण्याच्या वाढत्या लोकसंख्येसाठी अपुरी ठरत आहे. पी.एम.टी. व पी.सी.एम.टी. या अनुक्रमे पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाहतूक व्यवस्थांचे सम्मीलन होऊन आता पी.एम.पी.एल. ही संस्था पुण्याची सार्वजनिक बस वाहतूक सांभाळते. तीन माणसे बसू शकतील अशा रिक्षा हे शहरांतर्गत वाहतुकीचे मुख्य साधन आहे. वाहतूक-कोंडीमुळे मोटारगाडीचालक व दुचाकीचालक त्रस्त असतात, तर पार्किंगची अपुरी व्यवस्था त्यांना आणखी जेरीस आणते.

लोकजीवन

पुणे शहराच्या लोकसंखेत गेल्या २० वर्ष पासुन मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. १९९१ च्या जनगणनेनुसार पुणे शहराची लोकसंख्या ११ लाख होती. २००१ साली ती २५ लाख झाली. २०११ साली ती ५० लाखाच्या वर जाण्याची शक्यता आहे, ज्यात पिंपरी चिंचवड ह्या जुळ्या शहराची लोकसंख्याही समाविष्ट आहे. पुणे हे भारतातील सातवे सर्वांत मोठे शहर आहे परंतु पुण्याच्या शहरी अर्थव्यवस्थेचा क्रमांक सहावा आहे. पुण्याचा दरडोई उत्पन्नाबाबत (per capita income) पहिला क्रमांक लागतो.
पुण्यात राहणार्‍यांना पुणेकर असे संबोधतात. शहराची मुख्य भाषा मराठी असून इंग्रजी व हिंदी भाषादेखील बोलल्या जातात. पुणे शहरात सॉफ्टवेर व वाहननिर्मिती व्यवसायात झपाट्याने गुंतवणूक होत आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात परप्रांतीय शहरात दाखल होत आहेत व लोकसंख्येत भर पडत आहे. पुणे शहराच्या विकासाबरोबर पुणे शहरामध्ये गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. शांत समजले जाणारे पुणे शहर १४/०२/२०१० रोजी झालेल्या बॉम्बस्फोटामुळे हादरले.

[edit]पुण्याची भगिनी शहरे

ही शहरे पुण्याची भगिनी शहरे आहेत -

[edit]संस्कृती

पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी समजली जाते. पुण्यात बोलली जाणारी भाषा ही मराठी भाषेची प्रमाणबोली (standard) मानली जाते. पुण्यात वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. पुणेकरांना संगीत, कला, साहित्याची जबरदस्त आवड आणि जाण आहे.

गणेशोत्सव

इ.स.१८९४ मध्ये लोकमान्य टिळकांनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. भाद्रपद (ऑगस्ट किंवा सप्टेंबर) महिन्यात येणाऱ्या या सणाच्या दहा दिवसांत अवघे पुणे शहर चैतन्यमय असते. देशा-परदेशांतून लोक हा उत्सव पाहण्यासाठी पुण्यात येतात. जागोजागी लहान-मोठी गणेश मंडळे मंडप उभारून देखावे सजवतात. या पुण्याचा प्रसिद्ध गणेशोत्सवादरम्यान महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पुणे फेस्टिव्हल नामक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजते. या कार्यक्रमात संगीत, नृत्य, मैफिली, नाटक आणि क्रीडा हे प्रकार समाविष्ट असतात. दहा दिवस चालणारा हा सण गणेशविसर्जनाने समाप्त होतो. अनंत चतुर्दशीला सकाळी सुरू होणारी विसर्जन मिरवणूक पुढच्या दिवसाच्या पहाटेपर्यंत चालते. मिरवणुकीसाठी पहिल्या पाच गणपती मंडळांचे अग्रक्रम ठरलेले आहेत.
  1. कसबा गणपती (हे पुण्याचे ग्रामदैवत आहे)
  2. तांबडी जोगेश्वरी गणपती
  3. गुरुजी तालीम गणपती
  4. तुळशीबाग गणपती
  5. केसरीवाडा गणपती (हे मंडळ टिळक पंचांगाप्रमाणे गणेशोत्सव साजरा करते.)
पुण्यातील गणेशोत्सव मंडळे प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती विसर्जित करून उत्सवमूर्ती परत नेतात. विसर्जन मिरवणुकीत ढोल, लेझीम अशी अनेक पथके असतात. अनेक शाळाही आपली पथके पाठवतात.

[edit]सवाई गंधर्व संगीत महोत्सव

दरवर्षी हिवाळ्यामध्ये सवाई गंधर्व संगीत महोत्सव हा अभिजात संगीत मैफलीचा कार्यक्रम पुण्यात होतो. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात सुप्रसिद्ध कलावंत हिंदुस्तानी व कर्नाटक संगीत प्रकार सादर करतात. संगीतप्रेमींना हा उत्सव म्हणजे एक पर्वणीच असते.

[edit]वसंतोत्सव

दरवर्षी हिवाळ्यामध्ये वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान तर्फे "वसंतोत्सव" हा संगीतच महोत्सव साजरा केला जातो. तीन दिवस चालणाऱ्या या उत्सवात सुप्रसिद्ध कलावंत आपली कला सादर करतात. अभिजात संगीताबरोबरच नवीन प्रकारचे संगीतही येथे सादर केले जाते.

[edit]रंगभूमी

पुणे हे मराठी बुद्धिजीवींचे शहर आहे. मराठी रंगभूमी ही मराठी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. मराठी नाटके मग ती प्रायोगिक असो वा व्यावसायिक, पुण्यातील मराठी रसिक आवडीने पाहतात. टिळक स्मारक मंदिरबालगंधर्व रंगमंदिरभरत नाट्य मंदिरयशवंतराव चव्हाण नाट्यगृहसुदर्शन रंगमंच, गणेश कला क्रीडा, नेहरू मेमोरियल हॉल, आंबेडकर सांस्कृतिक भवन व पिंपरी चिंचवड नाट्यगृह ही पुण्यातील व आसपासची महत्त्वाची नाट्यगृहे आहेत. महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे सुदर्शन रंगमंच हौशी कलावंतांना चांगले व्यासपीठ पुरवते. या यतिरिक्त बऱ्याच महाविद्यालयांची वर्तुळाकार प्रेक्षागृहे(amphitheatres) आहेत.

[edit]चित्रपट

पुण्यात अनेक मल्टिप्लेक्स आहेत. त्यांत मराठीहिंदी भाषा व इंग्रजी चित्रपट दाखविले जातात. पुणे स्थानकाजवळील आयनॉक्स, विद्यापीठ रस्त्यावरील ई-स्क्वेअर, सातारा रस्ता व कोथरूड येथील सिटीप्राइड, कल्याणीनगर येथील गोल्ड ऍडलॅब्स आणि आकुर्डी येथील फेम गणेश व्हिजन ही पुण्यातील मल्टीप्लेक्स आहेत. मराठी चित्रपट प्रामुख्याने प्रभात आणि सिटीप्राइड या चित्रपटगृहांत पहायला मिळतात.

[edit]धर्म- अध्यात्म

चतुःशृंगी हे देऊळ शहराच्या वायव्य डोंगर-उतारांवर आहे. या मंदिराची उंची ९० फूट व रुंदी १२५ फूट आहे. याची व्यवस्था चतु:शृंगी देवस्थान पाहते.दर वर्षी आश्विन महिन्यातल्या नवरात्रीच्या दिवसांत मंदिरात जत्रेनिमित्त विशेष गर्दी असते. शहरातील टेकडीवर पर्वती हे देवस्थान आहे.
पुण्याजवळील आळंदी व देहू येथे विठ्ठलाची मंदिरे आहेत. आळंदीत संत ज्ञानेश्वर यांची समाधी तर देहू येथे संत तुकारामांचे वास्तव्य होते. दरवर्षी वारकरी संप्रदायाचे लोक या संताच्या पालख्या घेऊन पंढरपुरास पायी जातात. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पंढरपूरात वारी पोहोचते.
पुण्यात भारतीय ज्यू लोकांची (बेने इस्रायल) मोठी वस्ती आहे. प्ण्यात ओहेल डेविड हे इस्रायल देशाबाहेरचे आशियातील सर्वांत मोठे सिनेगॉग (ज्यूंचे प्रार्थनास्थळ) आहे. पुणे हे मेहेरबाबा यांचे जन्मस्थान तर रजनीश यांचे वसतीस्थान होते. रजनीश यांच्या आश्रमात देशी-परदेशी पर्यटक भेट देतात. आश्रमात ओशो व झेन बागा व मोठे ध्यानगृह आहे.
कबरी, मशिदी, दर्गे





No comments:

Post a Comment