Saturday, February 2, 2019

नक्षलवादाने मारले दहा हजार तर दहशतवादाने मारले लाखो...तरीही हम है हिंदुस्थानी...तेलतुंबडे यांची अटक केवळ वंचित बहुजन आघाडीचा प्रचार दाबण्यासाठीच…! सकल मराठी समाज राजेश खडके


जंगलात राहणाऱ्या आदिवासी समाजाला एक विश्वास होता की,आम्हाला न्याय डॉ बाबासाहेब आंबेडकर हेच देऊ शकतात त्यामुळे हा समाज त्यांच्याकडे आस लावून बसला होता.तसे पाहिले तर त्यांच्या जमिनीला तसूभरही कोणी हात लावू शकत नाही असे संरक्षण बाबासाहेबांनी त्यांना दिले होते.मग हा आदिवासी समाज नक्षलवादी का झाला असा प्रश्न कोणी विचारताना दिसत नाही...मात्र नक्षलवाद सामाजिक स्थरावर संपविण्याचे सोडून त्यांनाच संपविण्याची भाषा केली जात आहे.जो पर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर हयात होते तो पर्यंत न्यायाची अपेक्षा या आदिवासी समाजाला होती परंतु १९५६ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले तसा या समाजाचा विश्वास कोणी जिंकू शकले नाही आता आपला वाली गेल्याची भावना या आदिवासी समाजाला झाली आणि त्यांनी १९५७ ला न्याय मिळण्यासाठीचे संघटन उभारले परंतु मोठ्या प्रमाणात त्यांचेवर अन्याय सुरु झाला आणि १९५८ साली त्यांनी हत्यार उचलून नक्षलवाद उभारला आहे.या नक्षलवादी यांनी न्याय मिळविण्यासाठी बंदुकीच्या जोरावर जी दहशत उभारली त्याचे समर्थन कोणी करू शकत नाही.त्यांनी आतापर्यंत ज्या हत्या केल्यात त्याचेही समर्थन कोणी करू शकत नाही.परंतु ते मूळ भारतवासी आहेत आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी भावना जर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातुची असेल आणि ते त्यांच्यासाठी संवैधानिक पाउले जर उचलत असतील तर यात वावगे काय आहे…? असा आमच्या सकल मराठी समाजाचा प्रश्न आहे.या नक्षलवादी यांनी आत्ता पर्यंत दहा हजार लोक मारले आहेत..परंतु जे लोक मारले आहेत ते प्रशासनातील लोक मारले त्यानी जनसामान्य लोक कधीही मारलेले नाहीत.परंतु दहशतवादी हल्ल्यात मग तो हिरवा हल्ला असोत की,भगवा हल्ला असोत यात आतापर्यंत सामान्य लाखो लोक मारले गेले आहेत याचे समर्थन आपण का करतो असा आमचा प्रश्न आहे.स्वातंत्र भारतात जो विना परवाना हत्यार उचलेल तो दहशतवादीच त्याचे समर्थन आपण करू शकत नाही.मग आपण आरएसएस या संघटनेने एके-४७ सारखे हत्यार बाळगलेले आहेत.त्यांच्या कार्यकर्त्याकडे बंदुका बॉम्ब सापडले जातात अशा लोकांना आपण संरक्षण देत आहोत असा आमच्या सकल मराठी समाजाचा प्रश्न आहे.पुणे पोलिसांनी प्रकाश आंबेडकर यांचेवर नक्षलवादी असल्याचे आरोप केली होते.परंतु आरोप करणारे पोलीस सह आयुक्त श्री पाटील यांचेवर कारवाई करा अशी मागणी घेऊन सकल मराठी समाज रस्त्यावर उतरला त्यावेळेस त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट सांगितले की,यल्गार परिषदेचा आणि भीमा कोरेगाव दंगलीचा कोणताही संबध नाही.परंतु त्यांची बदली करण्यात आली.जसे मुख्यमंत्री श्री फडवणीस यांचे मर्जीतील अधिकारी जेव्हा पुण्यात आले तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा यल्गार परिषद आणि भीमा कोरेगावचा संबध जोडण्याच केविलवाणा प्रयत्न करीत प्रकाश आंबेडकर यांचे मेव्हणे श्री तेलतुंबडे यांचेवर भीमा कोरेगाव दंगलीचा आरोप केला त्यांना बेकायदा अटक करून वंचित बहुजन आघाडीचा प्रचार दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे.त्यामुळे भीमा कोरेगाव हल्ला प्रकरणात तेलतुंबडे यांना गवण्याचा प्रयत्न म्हणजे फक्त राजकारण आहे.त्यामुळे पोलिसांनी केलेली अटक बेकायदा असल्याचे सांगून लागलीच त्यांची सुटका करण्याचे आदेश मे.न्यायालयाने दिल्यामुळे तेलतुंबडे यांची सुटका करण्यात आलेली आहे.

No comments:

Post a Comment