Wednesday, December 21, 2011

विदयुत सुरक्षा साक्षरता

महावितरण कंपनी ही अधिकाधिक लोकाभिमुख होवुन ग्राहकांना उत्तम सेवेचा लाभ मिळवून देत आहे. वीज वापरातील निष्काळजीपणा, हलगर्जीपणा, काहीवेळा अतिआत्मविश्वास यामुळे वीजेचे अपघात होतात हे अपघात होऊ नये म्हणून जनजागरण व प्रबोधनाच्या माध्यमातून सुरक्षितता मोहिम महावितरणामार्फत १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०११ पर्यंत राज्यभरात राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत वीजेची उपकरणे वापरताना घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन केले जात आहे.

नाशिकच्या प्रशिक्षण आणि सुरक्षा विभागामार्फत सुरक्षा मोहिमेची आखणी व अंमलबजावणी करण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत राज्यभरात ५६ हजार लोकांना विदयुत सुरक्षा साक्षर करण्यात आले.. मोहिमेंतर्गत आतापर्यंत राज्यभरातील २१५१ कार्यालयातील २० हजार कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात आले. राज्यातील विविध शाळांमधील ३६ हजार विदयार्थ्यांना या मोहिमेचा लाभ देण्यात आला आहे. यात नाशिकचे ८७० विदयार्थी व ५३१ कर्मचा-यांनाही या मोहिमेला लाभ मिळाला आहे.

शाळा महाविदयालयामध्ये जाऊन एकुण १० हजार विदयार्थ्यामार्फत घराघरातून सुरक्षिततेचा संदेश पोहचविण्याचे उदिष्ट या मोहिमेत ठरविण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात पहिल्या १५ दिवसातच ३६ हजार विदयार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. १५ डिसेंबर पर्यंत चालणा-या या मोहिमेसाठी एकुण ५० प्रशिक्षण पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत महावितरणाच्या सुमारे ३० हजार जनमित्रांना प्रशिक्षण करण्याची योजना आहे. आतापर्यंत २० हजार ३२८ जनमित्रांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

वीज वापरातील निष्काळजीपणा, हलगर्जीपणा, काही वेळा अतिआत्मविश्वास यामुळे वीजेचे अपघात होतात हे अपघात होऊ नये म्हणून महावितरण कंपनीचे कर्मचारी आणि ग्राहक यांचे प्रबोधन या निमित्ताने करण्यात येत आहे.शाळेतील मुलांचे प्रबोधन झाल्यास ते संपूर्ण घराचे प्रबोधन करु शकतात. या उददेशाने विदयार्थ्यांपर्यंत हा संदेश पोहचविण्यात येत आहे.यासाठी नाशिकच्या प्रशिक्षण विभागातील तंज्ञ प्रशिक्षकांना ठिकठिकाणी पाठविण्यात आले आहे. राज्यभरात एवढया मोठया प्रमाणात जनजागरण करण्यात येत आहे.

महावितरणाच्या या मोहिमेत सर्व जनतेने सहभागी होऊन विदयुत साक्षर व्हावे असा संकल्प करु या . 

No comments:

Post a Comment