Friday, January 18, 2019

प्रवीणदादा गायकवाड यांच्या सामाजिक आणि राजकीय घडामोडी शिरूर मतदार संघातून खासदार होण्यासाठीच…! राजेश खडके सकल मराठी समाज


         छत्रपती संभाजी महाराजांचा सत्य इतिहास उजागर होऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा खरा इतिहास बाहेर येऊन लपलेल्या मावळ्यांना न्याय मिळावा यासाठी इतिहासाची पाने उघडण्यासाठी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडची या सामजिक संघटनेची स्थापन पुरुषोत्तम खेडेकर यांनी केली होती.बामसेफच्या केटरबेस मध्ये तयार झालेले हे मराठ्यांचे संघठन होते.नंतरच्या काळात मोठ मोठी आंदोलने करून हे संघटन देशपातळीवर उभे राहिले आणि कालांतराने या संघटनेच्या माध्यमातून उभे राहिलेल्या नेतृत्वामध्ये महत्वकांक्षा निर्माण झाल्या त्यामुळे संघटनेत वादविवाद उभे राहिले आणि पहिला वाद उभा राहिला तो मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड आणि पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मध्ये आणि संघटनेतून गायकवाड बाहेर पडले आणि त्यानी सर्व कामकाज बंद करून व्यवसायाकडे लक्ष दिले.परंतु असा सामाजिक दुष्टीकोन असणारा नेता समाजातून बाहेर रहाणे कोणाला पसंद नव्हते.परंतु हे सर्व होत असताना त्यांनी कोणाचे एकले नाही आणि संघटनेचा राजीनामा देऊन बाहेर पडले.त्यामुळे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड हे सामाजिक संघटन बंद होऊन संभाजी ब्रिगेड नावाचा पक्ष निर्माण करण्यात आलेला होता.परंतु या पक्षाची पायाभरणी करण्यासाठी खेडेकर यांनी मराठवाडा आणि विदर्भाकडे लक्ष केंद्रित केली होते.त्याचे कारण असे की,खेडेकर साहेब स्वत: कुणबी असल्यामुळे त्याठिकाणी कुणबी समाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांना तिकडे मोठ्या प्रमाणात वाव मिळाला आहे.परंतु मराठा आरक्षण हा मुद्दा पुढे आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात लाखोचे मोर्चे निघाले आणि जनतेला माहित नसलेला मराठा आणि कुणबी वाद पुढे आला.कुणबी समाजाला पूर्वीपासून घटनात्मक आरक्षण होते.परंतु मराठा ही जात नसल्याने त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता.राणे समितीने दिलेले आरक्षण कायद्याच्या कचाट्यात अडकले होते आणि ते अडकलेले आरक्षण मराठा समाजाला सोडवायचे होते,मराठा आरक्षण लढा हा पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांनी उभे केलेले आंदोलन आहे.त्यामुळे नेमके यातून राजकारणाचा वास येत होता पण तो नेमका कोणता…? याचा मागसुम कोणाला लागला नाही.आणि हे आरक्षण फसवे निघते की काय…? असा प्रश्न निर्माण होतो न होतो.तोच मूक मोर्चाचे रुपांतर ठोक मोर्चा मध्ये झाले आणि या ठोक मोर्चाचे नेतृत्व कोणी आणि कोणाच्या सांगण्यावरून सुरु केले आणि बंद केले आता जवळ जवळ हे सगळ्यांना माहित झाले आहे.या मूक मोर्चातून आणि या ठोक मोर्चातून कोणाला काही मिळाले नाही हे मात्र निश्चित आहे.परंतु मराठा समाजाला १६ % आरक्षण भाजप सरकारने दिल्याचे आरोळी मात्र सर्वत्र दिली गेली आणि ती आरोळी मराठा समाजा पर्यंत पोहचते ना पोहचते तोच लागली देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १० % सवर्ण आरक्षण जाहीर करून त्याचा कायदा पास करून सवर्ण-दलित असा विषय निर्माण केला.आता आमचे असे म्हणणे आहे की,आरक्षित समाज म्हणून आणि बहुजन मराठा म्हणून आरक्षण घ्यायचे की,जातीवादी सवर्ण म्हणून आरक्षण घ्यायचे असा प्रश्न मराठा समाजा समोर उभे राहिलेला आहे.यातच प्रवीण गायकवाड यांनी शेतकरी कामगार पक्षाची बहुजन म्हणून कास धरून दिलेला राजीनामा परत घेऊन मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड पुन्हा सुरु केली त्यामुळे कुणबी असणारे पुरुषोत्तम खेडेकर साहेब आणि गायकवाड यांच्या मोठा वाद सुरु झाला आणि तो न्यायालयीन वाद होऊन न्यायच्या प्रतीक्षेत उभा आहे.आता सगळ्याच्या समोर संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटना आणि संभाजी ब्रिगेड राजकीय संघटना म्हणून उदयास आली.यामध्ये सच्चे कार्यकर्ते दोन्ही संघटनेतून बाहेर पडले आणि व्यावसायिक आणि आणि राजकीय कार्यकर्ते दोन्ही ब्रिगेडमध्ये विभागले गेले.यातच प्रवीण गायकवाड यांनी “खिशात गांधी आणि डोक्यात शिवाजी” अशी घोषणा देऊन मोठ्या प्रमाणात राजकारण सुरु केले आहे.हेच राजकारण म्हणून गायकवाड हे सारखे बारामतीला असतात कारण यावेळेस काही करून पवार साहेबांना प्रधानमत्री म्हणून सगळ्यांना बघायचे आहे.यामुळे आकडेवारीची गणिती कशी वाढतील याकडे लक्ष दिले गेले आहे आणि याची सुरुवात म्हणून तुळापुरला येण्या आगोदर अजितदादा पवार यांनी शिरूर मतदार संघातून लढ्याला आमचे कार्यकर्ते पुढे येत नाही त्यामुळे आता शिरुंर लोकसभा मतदार संघ मीच लढणार आणि खासदारही मीच होणार अशी घोषणा दिलेली होती.कधी तुळापुर येथे न येणारे दादा यावेळेस छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्यभिषेक कार्यक्रमी एकत्र आले.भीमा कोरेगावला कधी न येणारे प्रवीण गायकवाड भीमा कोरेगाव येथील बामसेफच्या कार्यक्रमाचे उद्घाटक झाले.त्यामुळे येथे स्पष्टपणे दिसते की,अजितदादा यांनी प्रवीण गायकवाड यांच्या साठी शिरूर मतदार संघातून लोकसभेमध्ये जाण्यासाठी जमीन तयार केली आहे.

1 comment: