Friday, January 18, 2019

खासदार संजय काकडे यांनी भाजापा विरुध्द उभारले बंडाचे निशाण…..! राजेश खडके सकल मराठी समाज


बांधकाम व्यावसायिक क्षेत्रातील एक मोठे नाव म्हणून संजय काकडे यांचे घेतले जाते.अजितदादा पवार यांचे खास मित्र म्हणून त्यांचेकडे पाहिले जाते.असे म्हणतात की,संजय काकडे हे पवार साहेबांच्या शब्दाबाहेर नाहीत त्यामुळे आज ते एवढे मोठे व्यावसायिक म्हणून उदयास आलेले आहे.परंतु भाजपाच्या मदतीने राज्यसभेवर खासदार झाले असल्यामुळे पुणे महानगरपालिका आणि पर्यायाने पुणेशहर आपल्या ताब्यात कशी राहील यासाठी त्यांनी भाजपच्या तिकिटावर आपले स्वत:च्या हक्काचे लोक नगरसेवक म्हणून निवडून आणले आहेत.पुणे मनपाच्या निवडणुकीत भाजपच्या निवडून येणाऱ्या नगरसेवकांची आकडेवारीच यांनी सांगितली होती आणि त्यांनी सांगितल्या प्रमाणे त्या आकड्याचे नगरसेवक निवडून आले होते.आता पुणेशहर लोकसभेतून त्यांना निवडून खासदार व्हायचे आहे त्यामुळे सध्या त्यांनी भाजपकडे उमेदवारी मागणी केल्याचे समजते परंतु त्यांना डावलण्याची खेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी भाजपा महाराष्ट्र अध्यक्ष दानवे यांच्या माध्यमातून खेळत असल्याचे संजय काकडे यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी दानवे यांच्या मतदार संघाचा आढावा घेऊन त्यांनी पत्रकार यांचे समोर असे जाहीर करून आव्हान केले आहे की,जर शिवसेने बरोबर भाजपाची युती झाली नाही तर दानवे यांचा दोन लाखांनी पराभव होईल.आणि हे सर्व करीत असताना भष्ट्राचार प्रकरणी गिरीश बापट यांनी राजीनामा द्यावा.आमच्या सकल मराठी समाजचे असे मत आहे की,संजय काकडे एक दबाव तंत्राचे राजकारण करीत आहे.त्यांना जर भाजपाने पुणे लोकसभा मतदार संघाची उमेदवारी जर दिली नाही तर ते बंडाचे निशाण उभारून स्वत:च्या हक्काचे ४२ नगरसेवक घेऊन ते पुणे मनपात गात निर्माण करून त्यांचे जीवावर एखाद्या दुसऱ्या पक्षात जाऊन तेथील उमेदवारी घेऊ शकतात किंवा बंडखोरी करू शकतात.संजय काकडे यांच्या या भूमिकेमुळे पुणे लोकसभा मतदार संघ कोणाला द्यायचा किंवा ठेवायचा यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात चुरस सुरु आहे.त्यामुळे संजय काकडे यांना विश्वास वाटत आहे की,पुणे शहरातून येणाऱ्या लोकसभा खासदारकीची माळ पुण्यातील मतदार आपल्या गळ्यात घालतील त्यामुळे संजय काकडे यांनी भाजप विरुध्द बंडाचे निशाण उभारले आहे असे दिसते.

No comments:

Post a Comment