Thursday, January 31, 2019

मला राजगृहावर नेत्यांची गर्दी पहायची आहे...आणि तुम्हाला पण ना...! राजेश खडके सकल मराठी समाज

राजगृह हा चळवळीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आत्मा आहे म्हणजेच काळीज आहे असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.कारण येथे प्रत्येक भीम अनुयायी यांच्या भावना जुडलेल्या आहेत.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जेव्हा दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले होते तेव्हा त्यांचे पार्थिव देह मुंबई येथील याच राजगृहावर आणले होते.याच ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातील गावाच्या कान्याकोपऱ्यातून आपल्या घरची भांडीकुंडी विकून समाज बाबासाहेबांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी लाखोच्या समुदायात आला होता.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी इथूनच भारतातील प्रत्येक अनुयायी यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष केला होता.१९२२ साली कोल्हापूर गादीचे आरक्षणाचे जननायक छत्रपती शाहू महाराज भेटायला आले होते.याच मुंबईतून बाबासाहेबांनी संपूर्ण जगात विद्वान म्हणून नाव लौकिक मिळविला होता.त्यामुळे या राजगृहाला देशातील प्रत्येक नेत्याने भेट द्यावी असे इथल्या भीम अनुयायी यांना वाटत आहे.परंतु इथली जातीय व्यवस्था इतकी भयंकर आहे की,माणूस म्हणून इथल्या प्रत्येक मानवाला जगायला शिकविणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेकडे जातीय नजरेने पहात आहे.परंतु भीमा कोरेगाव या ठिकाणी विजयस्तंभास मानवंदना देण्यास आलेल्या अलुतेदार यांचेवर हल्ला केला आणि त्या हल्ल्याला ज्याप्रमाणे प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर दिले.त्यामुळे इथला अलुतेदार आणि बलुतेदार त्यांच्याकडे वळला आहे आणि आता त्याच्या लक्षात आले की,इथल्या जातीयवादी कॉंग्रेसने वंचितांना नेहमी गृहीत न धरता राजकारण केले आहे.त्यामुळे आम्ही आहोत हे त्यानी कॉंग्रेसला दाखविण्यासाठी जे पाऊल उचलले ते स्वागतार्य होते म्हणून कॉंग्रेसला अखेर राजगृहावर यावे लागले.परंतु इथल्या भीम अनुयायी यांचे असे म्हणणे आहे की,नेहमी ज्यांनी मानवतावादी धर्माच्या विरोधात कार्य केले जातीयवादाचा विष नेहमी पेरण्याचे काम केले.जातीय दंगली\ना नेहमी बढावा दिला अशा मातोश्रीवर नेत्यांची नेहमी वर्दळ राहिली आहे.परंतु ज्यांनी जगाला मानवतेचा संदेश दिला.भारत देशातील प्रत्येक नागरिकाला हक्क व अधिकार दिला अशा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहावर वर्दळ का नाही.परंतु सध्याचे राजकारण पहाता इथल्या भीम अनुयायी यांची मागणी आहे की,राजगुहावर नेत्यांची वर्दळ झाली पाहीजे आणि माझीही इच्छा आहे की,राजगृहावर मला नेत्यांची गर्दी पहायची आहे.

No comments:

Post a Comment