Wednesday, March 6, 2019

प्रवीणदादा गायकवाड यांचेवर आम्ही नाराज का आहे….? त्यांनी नाराजी दूर करावी….! राजेश खडके सकल मराठी समाज


प्रवीणदादा गायकवाड यांनी शेकापमध्ये गेल्यावर नव्याने संभाजी ब्रिगेड सुरु केली सदरची संभाजी ब्रिगेड ही सामाजिक असल्याचे सांगण्यात आले.आणि ती संघटना कोणत्याही राजकीय पक्षा बरोबर जाणार नाही असे सांगितले होते.आता त्या संघटनेने काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे.त्यात बोलण्याचा आम्हाला कोणताही अधिकार नाही.परंतु सत्य इतिहासाची पाने तुम्हीच खोलली आहे.त्यामुळे ती उघडलेली पाने आम्ही वाचली.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास आम्हाला माहित झाला.त्याच इतिहासाची साक्ष म्हणून आम्ही मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी सकल मराठी समाजाच्या वतीने केली होती.त्या मागणीला पाठींबा मिळावा म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाचे निमित्त साधून किल्ले पुरंधर याठिकाणी १४ मी २०१८ रोजी स्वाक्षरी मोहीम राबविली होती.या मोहिमेत स्वत: खासदार छत्रपती संभाजी माहाराज युवराज सहभागी झाले होते.परंतु त्याच ठिकाणी गाडीत उपस्थित असणारे प्रवीण गायकवाड आणि त्यांचे सहकारी मित्र शांताराम कुंजीर सदरच्या मोहिमेत सहभागी झाले नाही.त्यानी छत्रपती संभाजी महाराज यांचे खाली उतरून दर्शन देखील घेतले नाही.प्रवीण गायकवाड आणि शांताराम कुंजीर हे माझे चांगले मित्र आहेत असे असताना सदरच्या सकल मराठी समाजाच्या मागणीला त्यांनी पाठींबा दिलेला नाही.ही आमची नाराजी व्यक्तिगत नाही….तर समाजिक आहे.
त्याच प्रमाणे तुम्हीच उघडलेल्या इतिहासाच्या पानामध्ये आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांनी पहिला राज्यभिषेक नाकारून दुसरा राज्याभिषेक हा २४ सप्टेंबर १६७४ मध्ये केल्याचे सांगितले.तो समतावादी राज्याभिषेक कार्यक्रम आमच्या सकल मराठी समाज आणि समता सैनिक दल यांच्या माध्यमतून आदरणीय अंजलीताई आंबेडकर आणि वीर बाजी पासलकर यांचे वंशज विकास पासलकर आणि प्रवीण गायकवाड यांच्या उपस्थितीत आयोजित केला होता.सदरचा कार्यक्रम होऊ नये अशी तुमची धारणा होती.परंतु सदरच्या कार्यक्रमात आदरणीय अंजलीताई आंबेडकर आणि विकास पासलकर यांनी उपस्थिती दाखवून सदरचा समतावादी राज्यभिषेक कार्यक्रमाची शोभा वाढविली होती,परंतु प्रवीण गायकवाड पुण्यात असताना देखील सदरच्या कार्यक्रमात येतो येतो म्हणून आले नाहीत.अशी त्यांची मानसिकता आजही आम्हाला त्रास देते.म्हणून आम्ही त्यांचेवर नाराज आहोत स्वत:ची भूमिका स्पष्ट आणि प्रामणिक असावी आम्ही साथ देऊ परंतु त्यात जर प्रामणिकपणा नसेल तर जवळच्या मित्रांनाही त्रास होतो हे लक्षात घेतले पाहिजे.आम्ही केलेला फोन ते उचलत नाही आमच्या फोनला उत्तर देत नाही म्हणून आम्ही नाराज आहोत.त्यामुळे त्यांनी आमची नाराजी दूर करावी….!


No comments:

Post a Comment