Friday, March 8, 2019

पनवेल व रायगड मध्ये प्रकाश आंबेडकर यांची खोती आंदोलनाला सुरुवात…..तर मोदीच्या खोटारडेपणामुळे जगात देशातील नागरिकाची होतेय प्रतिमा खोटारडी…! राजेश खडके सकल मराठी समाज


                विषय असा आहे की,छत्रपती शिवाजी महाराज यांनी शेती करण्यासाठी रयतेला जमिनी दिल्या त्यामुळे शेती करणाऱ्याला कुणबी असे म्हणत...या कुणबी समाजाचे संरक्षण करण्यासाठी आणि त्याच्या शेतात पिकणाऱ्या मालाला संरक्षण दिले.त्यामुळे वैदिक धर्म पंडितांच्या असे लक्षात आले की,इथला कुणबी जो पर्यंत मारला जात नाही आणि इथल्या जो पर्यंत जमिनी ताब्यात येत नाही तो पर्यंत इथली अर्थव्यवस्था,प्रशासन व्यवस्था आणि राजव्यवस्था ताब्यात येणार नाही.त्यामुळे नंतरच्या काळात कोकणातील मोठ्या प्रमाणातील जमिनी ह्या ब्रिटीश अधिकारी असणाऱ्या व्यक्तीकडे गेल्या त्यालाच खोत असे म्हटले जाते.त्यामुळे कोकणातील खोत हे जास्तीत जास्त प्रमाणात सरदेशपांडे, सरदेसाई, सरपोतदार, सरजोशी, प्रभुदेसाई इ. सापडतील.हे खोत लोक आपल्या जमिनी कसण्यासाठी कुणबी समाजाला द्यायचे आणि इतर कामे करण्यासाठी अलुतेदार आणि बलुतेदार नेमायचे त्यामुळे या लोकांचे खोताकडून मोठ्या प्रमाणात शोषण केले जायचे.असा सुरु असलेला अन्याय जेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कळाला तेव्हा ते खोतांच्या विरोधात कुळांच्या बाजूने उभे राहिले.त्यामुळे खोती आंदोलन नारायण नागू पाटील यांचे नेतृत्वात सुरु करण्यास सांगितले.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे खोतांच्या जमिनी जो पर्यंत कुळांना मिळत नाही तो पर्यंत शेती पिकवली जाणार नाही असा पवित्रा घेतला.त्यामुळे या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे हे आंदोलन ६ वर्षे चालले.या आंदोलनात बऱ्याच लोकावर गुन्हे दाखल झाले त्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पूर्णपणे ताकद लावून हे आंदोलन यशस्वी केले...आणि स्वतंत्र भारतात खोती विरोधी कुळाचा अधिकार १९४९ ला तयार करून तसा न्याय या कोकण वासियांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे.
            परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर खोतांनी दंडेलशाहीच्या जोरावर आपल्या जमिनी कुळाच्या ताब्यात जाऊ दिल्या नाहीत.आणि इथली राजकीय आणि भांडवली व्यवस्था इथल्या खोतांच्या पाठीशी उभी असल्यामुळे कुळ आजही अन्याय सहन करीत आलेला आहे.त्यामुळेच याच भागात सनातनी व्यावस्था मोठ्या प्रमाणात दहशत करून आपले प्रशिक्षण केंद्र चालवीत आहे.पुन्हा खोतांच्या विरोधी कोणतेही आंदोलन उभारले जाऊ नये म्हणून या कोकण वासियांना जास्तीत जास्त धर्मांध कसे करता येईल याकडे लक्ष दिले जाते.म्हणून या खोतांच्या विरोधात प्रकाश आंबेडकर यांनी पनवेल आणि रायगड येथील वंचित बहुजन आघाडीच्या सभेच्या माध्यमातून आंदोलन पुकारले आहे.त्यमुळे आरएसएसला संविधानाच्या चौकटीत आणण्याचा जो प्रयत्न प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सुरु केला आहे.तो योग्य असून आमची सकल मराठी समाज त्यांच्या या मागणीला पूर्णपणे समर्थन करीत आहे.
             प्रकाश आंबेडकर असे म्हणतात की,नरेंद्र मोदी हा खोटा माणूस आहे,देशभक्तीच्या खोट्या वल्गना करीत आहे.भारतीय वायुसेनेने जो एअर स्ट्राईक पाकिस्तानवर केला त्याची खरी गरज होती परंतु त्याला उत्तर म्हणून जो पाकिस्तानने आपल्या भारतीय सेनेच्या तळावर हल्ला केला त्याला उत्तर देणे गरजेचे होते.परंतु जेव्हा खरे उत्तर देण्याची वेळ आली तेव्हा हे मोदी महाशय समोर आले नाही.मोदी आणि अमित शहा यांनी जो दहशतवादी मेल्याचा ३०० चा आकडा सांगितला आहे तो आकडा युरोपियन मिडीयाने खोडून काढला आहे.त्यामुळे मोदी यांनी खोटारडे पणाचा कळस करून जागतिक पातळीवर भारताची आणि भारतीय नागरिकाची प्रतिमा खोटेपणाची निर्माण केली आहे.त्यामुळे भारतातील नागरिक हा खोटेपणाचे समर्थन करीत नाही ही जर प्रतिमा संपूर्ण जगात उभी करायची असेल तर मोदी सरकारला पाडले पाहिजे.त्यांच्या या मताशी आमची सकल मराठी समाज सहमत असून त्यांनी उभारलेल्या या लढ्याला समर्थन करीत आहोत.त्यामुळेच वंचित बहुजन आघाडी यांनी आमच्या सकल मराठी समजाला त्यांचे उमेदवार यांचा प्रचार करण्याचे आदेश प्रकाश आंबेडकर यांनी द्यावेत अशी विनंती करीत आहोत.

No comments:

Post a Comment