Tuesday, March 5, 2019

अशांना ठोकून काढा....! मी राजकारणातील मुलगी नाही...परंतु मी पैसे घेऊन आंबेडकर विरोधी राजकारण करते...! राजेश खडके सकल मराठी समाज

विषय असा आहे गेल्या ७० वर्षात वंचित घटकांचे शोषण झाले आहे….आणि छत्रपती संभाजी महाराज यांची मनुस्मृती प्रमाणे हत्या झाल्यानंतर उभी राहिलेल्या पेशवाईने अलुतेदार आणि बलुतेदार यांना देव नावाच्या संकल्पनेत अडकवून मोठ्या प्रमाणात जातीवाद निर्माण केला आहे.परंतु अशा जातीवादी पेशवाईला संपविण्याचे कार्य स्वराज्याचा सरदार सिद्धनाक महार याच्या नेतृत्वात भीमा कोरेगाव याठिकाणी झालेले आहे.या युध्दात प्रतीशिवाजी राजे उमाजी नाईक समर्थक सहभागी झालेले होते.१ जानेवारी १८१८ च्या भीमा कोरेगावच्या युध्दानंतर उमाजी नाईक यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे जन्मस्थान असणाऱ्या पुरंधर किल्ल्यावर बामणी व्यवस्थेच्या विरोधात जाऊन स्वत:चा राज्यभिषेक १८२२ मध्ये केला होता.अशा प्रतीशिवाजी राजे उमाजी नाईक यांना ब्रिटिशाबरोबर संगनमत करून पुणे येथील मामलेदार कचेरी मधील पिंपळाच्या वृक्षाला म्हणजे बोधीसत्व वृक्षाला लटकवून फाशी दिलेली होती.त्यावेळी थोड्याच अंतरावर असणाऱ्या फुले वाड्यात महात्मा ज्योतिबा फुले हे ७ वर्षाचे होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.त्यामुळे प्रतिशिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजे उमाजी नाईक यांचा इतिहास महात्मा ज्योतिबा फुले यांना माहित होता.त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास महात्मा ज्योतिबा फुले यांना कळाल्यामुळे संभाजीराजे यांची हत्या मनुस्मृती प्रमाणे वैदिक धर्म पंडितांनी औरंगाजेबा कडून करून घेतली होती म्हणून महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले होते की,माणसाला माणूस म्हणून जगू न देणारी मनुस्मृती दहन केली पाहिजे.अशी मनुस्मृती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२७ मध्ये दहन केली आहे.त्यामुळे अशा महापुरुषांचे विचार हे नेहमी माणसाच्या कल्याणकारी जीवनासाठीच होते आणि मनुस्मृतीच्या विरोधात होते.ही मनुस्मृती पुन्हा जिवंत करण्यासाठीचे कार्य आरएसएस या असंवैधानिक संघटनेने जोरात सुरु केले आहे.म्हणून अशा संघटनेला संविधानाच्या चौकटीत आणल्यास इथल्या वंचित घटकांना न्याय मिळेल आणि त्यांचा विकास होईल यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन करून मोठ्या प्रमाणात संघर्ष उभारलेला आहे.त्यांचा तो संघर्ष मोडून काढण्यासाठी सावरकर समर्थक शरद पवार यांनी पैशासाठी स्वत:चे पोट भरणारी सुषमा अंधारे यांच्या माध्यमातून गणराज्य आघाडी निर्माण केली आहे.त्यामुळे सुपारी घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार खोडण्यासाठी आणि केवळ पैशासाठी स्वत:चे पोट भरण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला विरोध करण्यसाठी सुषमा अंधारे यांना उभारले गेले आहे.त्याच्या कडे कोणताही विचार नाही की,आचार नाही.त्यामुळे प्रकाश आंबेडकर म्हणाले सुपारी घेऊन काम करणाऱ्या अशा लोकांना ठोकून काढा…! राहिला प्रश्न सुरेश माने यांचा ते एक पक्ष चालवीत आहेत त्यामुळे राजकीय भूमिका घेणे त्यांना गरजेचे आहे.त्यांनी सुषमा अंधारे यांच्या आघाडीत न जाता सरळ महाआघाडीत सहभागी होणे गरजेचे होते.परंतु वंचित बहुजन आघाडी आणि त्याचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात तयार झालेल्या आघाडीत जाऊन त्यानी त्यांच्या विद्वानपणाचा कळस गाठला आहे असे आमच्या सकल मराठी समाजाला वाटत आहे.

6 comments:

  1. आता एकच नेते आदरणीय बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर वंचित समाजाला न्याय मिळवून देतील.
    म्हणून आता फक्त भीमाच रक्त

    ReplyDelete
  2. ‌‌only बाळासाहेब आंबेडकर

    ReplyDelete