Saturday, March 30, 2019

कॉंग्रेसकडून प्रवीण गायकवाड यांची उमेदवारी जाहीर झाल्यास….वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी दाखल होईल काय…? राजेश खडके सकल मराठी समाज

          
विषय असा आहे की,गेल्या नऊ महिन्यापासून प्रवीण गायकवाड हे कॉंग्रेस श्रेष्टीच्या पुणे लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नात आहेत.आणि उमेदवारी मिळाल्यास प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या उमेदवारीस पाठींबा द्यावा अशी त्यांची आणि बहुजन मराठा वर्गाची आग्रही विंनती आहे.त्यांच्या या विनंतीला प्रकाश आंबेडकर मान देतील काय…? हा त्या वेळेचा प्रश्न आहे.परंतु उमेदवारीच्या रिंगणातून गुरुवार २८ मार्च रोजी प्रवीण गायकवाड यांनी माघार घेतली आणि शनिवारी ३० मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी दाखल होणार आणि ही उमदेवारी दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यानी महात्मा फुले वाडा येथे जमावे अशा सूचना शुक्रवारी २९ मार्च रोजी देण्यात आलेल्या होत्या.परंतु प्रवीण गायकवाड यांनी २९ मार्च रोजी सांयकाळी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असे जाहीर केले.आणि त्यानंतर ३० मार्च रोजी दाखल होणारी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी काही तांत्रिक अडचणीमुळे थांबली गेली आहे.आता येथे प्रश्न असा निर्माण झालेला आहे की,३० मार्च रोजी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी तर दाखल झाली नाही परंतु ३० मार्च रोजी प्रवीण गायकवाड यांचा कॉंग्रेस पक्षात प्रवेश झालेलां आहे.प्रवीण गायकवाड यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यास खरेच वंचित बहुजन आघाडी पाठींबा देणार आहे काय....? असो कोणत्या पक्षांनी कोणाला पाठींबा द्यावा हा ज्या त्या पक्षाचा विषय आहे.परंतु सामजिक स्तरावर प्रवीण गायकवाड यांची मान्यता चांगली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांना पाठींबा मिळणार आहे.परंतु त्यांना उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवार अरविंद शिंदे आणि मोहन जोशी यांना शांत करावे लागणार आहे.

No comments:

Post a Comment