Wednesday, October 19, 2011

कुपोषण निर्मूलन ट्रस्टची यशस्वी वाटचाल

रायगड जिल्हा परिषदेने कुपोषित, दुर्धर आजारी बालकांना व जोखमीच्या गरोदर मातांना मदत करण्यासाठी जिल्हा कुपोषण निर्मूलन ट्रस्टची स्थापना केली असून जिल्ह्यात १३०७ बाल विकास केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. यात कुपोषण निर्मूलनासाठी कुपोषित बालकांना पूरक पोषण आहार व आरोग्य सेवा, तीन वेळचा सकस आहार व आवश्यक तो औषधोपचार आदी बाबी पुरविल्या जातात. कमी वजनाच्या बालकांवर ३० दिवस उपचार केले जातात.

रायगड जिल्ह्यात एप्रिल २०१० अखेर १०० टक्के सर्व्हेक्षण झाले असून सर्व्हेक्षित बालके १८३८१६ आहेत. सदर प्रत्येक बालकांची नोंद करण्यात आली असून त्यांची पोषणाची श्रेणी ठरविण्यात आली आहे. पोषण श्रेणी ठरविताना वयाप्रमाणे वजन या निकषा सोबतच उंची प्रमाणे वजनाचाही निकष गृहीत धरुन बालकांचा शोध घेण्यात आला आहे.

या बालकांमध्ये सप्टेंबर २०११ अखेरच्या अहवालाप्रमाणे एकूण सर्व्हेक्षित बालके १८१७२५ असून वजन घेतलेली बालके १८०५१२ आहेत. त्यामध्ये नवीन ग्रोथचार्ट निकषाप्रमाणे सर्व साधारण बालके १६३७१४ असून त्यांची टक्केवारी ९०.६९ आहे. मध्यम कमी वजनाची १५८७२ असून त्यांची टक्केवारी ८.९४ आहे. तीव्र कमी वजनाची मुले ९२६ असून त्याची टक्केवारी ०.५१ आहे.

माहे सप्टेंबर २०१० अखेर सॅम व मॅम बालकांचा सर्व्हे करण्यात आला असून त्यामध्ये सॅमचे ११७५ बालके व मॅमची ६४४१ बालके आढळून आली. त्यानुसार मे २०११ पर्यंत ४५९ बालविकास केंद्र चालू करण्यात आली होती. त्यामध्ये ९८५ सॅम व २४०९ मॅमच्या बालकांवर उपचार करण्यात आले. त्यामधील ९७४ सॅमची व २००३ मॅमच्या बालकांमध्ये सुधारणा झाली.

माहे जून २०११ अखेर सॅम (तीव्र कमी वजनाची बालके- अडीच किलो पेक्षा कमी) व मॅम (मध्यम कमी वजनाची बालके- अडीच किलो) बालकांचा १०० टक्के सर्व्हे करण्यात आला असून त्यामध्ये सॅमची ४६९ बालके व मॅमची ५३१९ बालके आढळून आली आहेत. त्यापैकी सॅमच्या ४६९ बालकांना व मॅमच्या १४२१ बालकांना ग्राम बाल विकास केंद्रात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी सॅमच्या ३९३ व मॅमच्या ११५१ बालकांमध्ये सुधारणा झाली आहे. सुधारणा न झालेल्या बालकांना CTC (बालविकास केंद्र) मध्ये दाखल करणेची कार्यवाही करण्यात येत आहे.

माहे २६ सप्टेंबर २०११ पासून नवीन VCDC (ग्राम बालविकास केंद्र) चे नियोजन करण्यात आले असून ४६३ ग्राम बाल विकास केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यामध्ये ९६ तीव्र कमी वजनाची बालके (सॅम) व १६६६ मध्यम कमी वजनाची बालके (मॅम) उपचार घेत आहेत.

गरोदर व स्तनदा मातांची नोंदणी १०० टक्के करण्यात आली असून सप्टेंबर २०११ अखेर एकूण १३९८९ गरोदर माता व १५९७७ स्तनदा माता आहेत. सदर सर्व बालके व गरोदर, स्तनदा माता यांना पूरक पोषण आहाराचा लाभ दिला जातो.

सप्टेंबर २०११ अखेर साधारण भागातील ० ते ६ वयोगटातील बालकांची ९३.४८ टक्के आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच नवसंजिवनी भागातील बालकांची १०० टक्के आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. आरोग्य तपासणीत आजारी असलेल्या बालकांना संदर्भ सेवा देण्यात येते. तसेच किशोरवयीन मुलींची नोंदणी १०० टक्के करण्यात आली असून जिल्ह्यात एकूण १०८५२३ किशोरवयीन मुली आहेत. त्यांना आरोग्य पोषण व स्वच्छता विषयक प्रशिक्षण तसेच आरोग्य सेवा पुरविली जाते.

या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय टास्क फोर्स समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समितीमध्ये प्रत्येक गाव कुपोषणमुक्त होण्याच्या दृष्टिकोनातून ठोस उपाययोजना म्हणून प्रत्येक तालुक्याला तालुकास्तरीय टास्क फोर्स समिती स्थापन करण्याच्या सूचना समितीने दिल्या आहेत. त्याप्रमाणे सर्व तालुक्यात टास्क फोर्स समित्या गठित करण्यात आल्या आहेत.

  • विजय ग. पवार
  • No comments:

    Post a Comment