Monday, June 11, 2018

फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – २९) जे शिवराय यांच्या घराण्याशी घडले......तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्या बरोबर घडले..! धर्मांतर मारण्यासाठीच महसुली प्रशासनात हिंदू शब्द लावण्याच्या पूर्वनियोजित खेळी.....!


विषय असा आहे की,महार समाज हा अस्पृश्य नव्हता त्याचे छत्रपती शिवराय यांचे स्वराज्यात मोलाचे योगदान होते.त्याकाळी कुणबी आणि अलुतेदार व बलुतेदार असा वर्ग होता.पूर्वीपासून महार समाजाचे  इथल्या सत्ताकारणात मोलाचे स्थान होते.त्याच्याकडे पूर्वीपासून जमिनीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात होते तसेच तो गावपातळीवर पंचायतीचा निवाडा प्रमुख होता...त्याकाळी मराठा समाज अस्तित्वात नव्हता.मोगल साम्राज्य विरोधात लढत असताना लढवय्या म्हणून त्याचा मराठा हा एक वर्ग तयार झालेला होता.राजस्थान मधून रजपुतांची संख्या आपल्या भागामध्ये आलेली होती.त्याने पूर्वीपासून वैदिक व्यवस्थेशी हातमिळवणी केली होती.त्यामुळे त्याला इथे अस्तित्व बनविण्यास त्यांची भरपूर मदत झालेली आहे.मिर्जाराजे जयसिंग जेव्हा मोगल साम्राज्याच्या आदेशावर छत्रपती शिवराय यांना जेरबंद करण्यासाठी स्वराज्यात आला होता तेव्हा त्याच्या बरोबर मोठ्या प्रमाणात रजपूत सेना आलेली होती.छत्रपती शिवरायांच्या आग्र्याच्या अटके नंतर आणि त्यांच्या सुटके नंतर तो रजपूत स्वराज्यात मोठ्या प्रमाणात स्थयिक झालेले आहे.तो नंतर त्याच्या राज्यात गेलेला नाही.यातच प्रसिद्ध कांदबरीकार व राज्यशासन पुरस्ककर्ते बाबा पुरंधरे यांनी या राजस्थानी रजपुतांचे अस्तित्व कायम राखण्यासाठी त्याच्या पुस्तकात शिवरायांचा राज्याभिषेकाचे रेखाडलेल्या चित्रामध्ये त्याने सगळेच रजपूत दाखविलेले आहेत एकही स्वराज्याचा मावळा दाखविलेला नाही.स्वराज्य स्थापने पूर्वी आलेला रजपूत इथे स्थाईक होऊन इथली भाषा अवगत करून तो नेहमी ब्राह्मणी व्यावस्थे बरोबर राहिलेला आहे.आजही काही ऐतिहासिक लोकांच्या वंशावळी राजस्थानच्या रजपूत घराण्याशी जुळत आहेत.असे लोक स्वराज्या बरोबर नेहमीच विरोधात राहिले आहेत आणि काही लोकांनी ब्राह्मणी व्यवस्थेची खबरगिरी केलेली आहे.त्यामुळेच छत्रपती शिवराय आणि शंभूराजे यांच्या हत्या घडविण्यात त्यांना यश आले आहे.छत्रपती शिवराय यांचे विचार लपविण्यासाठी त्यांची समाधी लपवून त्यांचे स्वराज्य संपविण्यासाठी याच लोकांची ब्राह्मणी व्यवस्थेला मोठे सहकार्य झालेले आहे.छत्रपती शिवराय यांचा पहिला पुतळा बसविण्यास याच लोकांच्या जीवावर राजश्री शाहू महाराज यांना मोठ्या प्रमणात विरोध करण्यात आलेला होता.याच लोकांच्या जीवावर महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विरोध करण्याचे धाडस ब्राह्मणी व्यवस्थेने केले आहे.ज्यावेळेस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३५ मध्ये धर्मांतर करण्याची घोषणा येवला येथून केली आणि ते बौध्द धम्माची दीक्षा घेणार असे ब्राह्मणी व्यवस्थेला कळले होते तेव्हा त्यांनी एक षड्यंत्र आखले होते.१८५७ चा उठाव हा कोकण मधून उभा राहिला होता त्या लढ्याच्या आधारे ब्राह्मणी व्यावस्थेने ब्रिटीश सरकारवर दबाव टाकून इथली महसुली प्रशासन व्यावस्था ताब्यात घेऊन हा लढा बंद करण्यात आला.स्वतंत्र्याच्या भावनेने एकत्रित होऊन अलुतेदार व बलुतेदार लढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालेला होता.त्याला १९७१ च्या कायद्यानुसार गुन्हेगार ठरविण्यात आले होते.त्यामुळे १९३५ ते १९४२ मध्ये ज्या महसुली दप्तरी मोठ्या प्रमाणात हिंदू म्हणून नोंदी झाल्या त्या नोंदी याच महसुली प्रशासनातील ब्राह्मणी व्यावस्थेने केलेल्या आहेत.त्यामुळे भारत देश हा हिंदू राष्ट्र नसताना आजही तुमच्या नोंदी हिंदू म्हणून तुमची असलेली जी कोणती जात आहे ती लिहिली जात आहे.अशा नोंदीमुळे मोठ्या प्रामाणात स्वराज्याचे प्रामणिक असणारे मावळे यांचेवर अन्याय होऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मांतराला बाधा आणण्याचे कार्य या ब्राह्मणी व्यवस्थेने केले आहे.त्यामुळे आज बौध्द असणाऱ्या माणसाला हिंदू शब्द लावून हिंदू महार हा दाखला दिला जातो.त्यामुळे धर्मांतर मारण्यासाठी ब्राह्मणी व्यावस्थेने केलेली ही एक पूर्वनियोजित खेळी आहे.(क्रमश😊

No comments:

Post a Comment