Saturday, June 2, 2018

फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – ८) जे शिवराय यांच्या घराण्याशी घडले......तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्या बरोबर घडले..! दुसऱ्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर १९२४ मध्ये “समता सैनिक दल” स्थापन केले....!


१९२० मध्ये बाळकृष्ण गंगाधर टिळकांचे निधन झाले होते.याच काळात डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी साप्ताहिक मूकनायक हे वृत्तपत्र प्रकाशित केले होते.डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या वृत्तपत्रातील प्रबोधनकारी लिखाणामुळे कोल्हापुरचे छत्रपती राजश्री शाहू महाराज प्रभावित झालेले होते.त्यामुळे ते मुंबईला येऊन त्यांनी डॉ बाबसाहेब आंबेडकर यांची भेट घेऊन त्यांचे बरोबर त्यांनी जेवण केले होते.त्यानंतर डॉ बाबसाहेब आंबेडकर हे पुढील शिक्षणासाठी लंडनला गेले होते.त्यांना छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी मोलाचे सहकार्य केले होते.पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभाराव असे त्यांना वाटत होते.त्यामुळे त्यांनी मुंबईला पुतळा बनविण्याचे कार्य जोरात सुरु केले.शनिवार वाड्यावर त्यांना तो पुतळा बसवयाचा होता परंतु बामणी व्यवस्थेने आणि आपल्या काही स्वकीयांनी तो पुतळा तेथे बसविण्यास विरोध केला.त्यामुळे त्यांनी शिवाजीनगर येथे महार समाजाच्या जागेत छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविण्याचे निश्चित केले होते.मुंबईतून पुतळा पुण्यात आणताना खंडाळा बोगद्यातून तो पुतळा आणण्यास अडचण निर्माण झाली होती.तेव्हा भोगीची उंची कमी करून नंतर तो बोगद्यातून आणला गेला.इंग्लंडचे युवराज यांचे हस्ते अश्वरूढ पुतळ्याचे अनावरण शाहू महाराज यांनी करून घेतले.त्यानंतर छत्रपती राजश्री शाहू महाराज पुण्याहून मुंबईला जात असताना लोणावळा येथे त्यांचे १ मे १९२२ मध्ये निधन झाले (म्हणजे त्यांची हत्या झाली) याची खबर दोन महिन्यानंतर डॉ बाबसाहेब आंबेडकर यांना तारेने लंडनला असताना कळाली त्यांना याचे खूप मोठे दु:ख झाले. डॉ बाबसाहेब आंबेडकर लंडनला असताना त्यानी रुपयाच्या समस्यावर एक अहवाल तयार करून तो सादर केले होता.१९२३ ला डॉ बाबसाहेब आंबेडकर यांना “डॉक्टर ऑफ सायन्स” ही पदवी मिळाली होती.एकंदरीत पहात डॉ बाबसाहेब आंबेडकर यांचे आणि स्वराज्याचे नाते अतिशय घट्ट झाले होते.सामाजिक घडामोडीचा आभ्यास करीत असताना अस्पृश्यतेच्या समस्यांवर आणि महिलांच्या समस्यावर कार्य करीत असताना त्यांना महात्मा फुले यांच्या कार्याचा आभ्यास झाला त्यांनी महात्मा फुले समजून घेतले.त्यांना महात्मा फुले यांनी केलेले कार्य आणि छत्रपती शिवरायांचा विचार लक्षात आलेले होते.महात्मा फुले यांनी सांगितले होते की,वैदिक धर्म पंडितांनी मनुस्मृती तयार करून तो कायदा मानून इथली सामजिक व्यवस्था आपल्या ताब्यात ठेवलेली होती.छत्रपती शिवरायांनी वैदिक धर्म पद्धतीचा राज्याभिषेक नाकरून दुसरा राज्याभिषेक शाक्त धर्म पद्धतीत २४ सप्टेंबर १६७४ मध्ये केला होता.आणि महात्मा फुले यांनी याच दिनाचे औचित्य साधून २४ सप्टेंबर १८७३ मध्ये सत्यशोधक चळवळीची स्थापना करून भगवा ध्वज स्विकारलेला होता.डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या लक्षात आले होते की,दुसरा राज्याभिषेक म्हणजे समता आणि ही समता प्रस्थापित करण्याचे कार्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून केले आहे.तेव्हा समता लक्षात घेऊन डॉ बाबसाहेब आंबेडकर यांनी २४ सप्टेंबर याच दिनाचे औचित्य साधून २४ सप्टेंबर १९२४ मध्ये “समता सैनिक दल” स्थापन करून त्याच्या सदस्याच्या डोक्यावर निळी टोपी देऊन हातामध्ये भगवा ध्वज दिला.(क्रमश😊

No comments:

Post a Comment