Sunday, June 17, 2018

( भाग – ४८ ) डॉ बाबासाहेब आंबेडकर आम्हाला माफ करा....! मी करतोय एक दिवसांचे “आत्मक्लेश आंदोलन” कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली “समता” आम्ही जतन करू शकलो नाही....!


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य सिंधू संस्कृती पासून भगवान गौतम दिलेल्या विचारापासून ते छत्रपती शिवरायांनी उभ्या केलेल्या स्वराज्य पर्यंत आहे हे आपण समजूनच घेतलेले नाही.आपण जर बौध्द धम्माची घेतलेली दीक्षा जर बघितली आणि त्यांनी आपल्याला दिलेल्या २२ प्रतिज्ञा जर वाचल्या आणि त्याचे जर आकलन केले तर स्पष्टपणे दिसून येते की “सभ्यता” म्हणजे काय याचे दर्शन होते.कारण सभ्य आचरण असलेल्या व्यक्तीचे कोणीही नुकसान करू शकत नाही हे त्यांनी सांगितले आहे.मात्र अशा सभ्य व्यक्तीला संपविण्यासाठी आपत्यांचीच गरज पडते हे लक्षात घेतले पाहिजे.त्यामुळे गौतम बुध्द असतील,छत्रपती शिवराय असतील किंवा शंभूराजे असतील, डॉ बाबासाहेब आंबेडकर असतील यांचे संरक्षण कवच म्हणजे त्यांची “सभ्यता” होती हे आपण लक्षात घीतले पाहिजे.मनुवादी व्यावस्था म्हणजेच आर्य व्यावस्था होय हे पण आपण लक्षात घेतले पाहिजे.हे जेव्हा आर्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी आपली “सभ्यता” चोरून घेतली आहे हे आपण लक्षात घ्यायला विसरलो आहे.मनुवादी व्यवस्थेला जर संपवायचे असेल तर आपण “सभ्यता” स्विकारली पाहिजे हे लक्षात घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी “सभ्यता” धारण करून मनुवादी व्यवस्थेला संपविण्याचे कार्य केले आहे.अशा सभ्यतेचे कवच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धम्माची दीक्षा देऊन दिली आहे आणि ती म्हणजे २२ प्रतिज्ञा होय.सर्वात प्रथम आपण हिंदू आणि हिंदू धर्म समजून घेतला पाहिजे असे मला वाटते.हिंदू आणि हिंदू धर्म या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत यात कोणाला काय दुमत असायचे काही कारण नाही.हिंदू ही संस्कृती आहे तर हिंदू धर्म ही मनुवादी व्यवस्था आहे आणि ही मनुवादी व्यवस्थेचे देव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती आहेत.ही हिंदू धर्माची निर्मिती आहे म्हणजे मनुवादी व्यवस्थेची निर्मिती आहे हे आपण समजून घेतले पाहीजे.म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्पष्टपणे ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती नाकरून मनुवादी व्यवस्थाच नाकारलेली आहे.परंतु कोणतेही कुळदैवत नाकारण्यास सांगितलेले आहेत असे मला वाटत नाही.त्यामुळे भारतीय निवासी हा संपूर्णपणे एकच आहेच असे त्यांना सांगायचे आहे.म्हणूनच “समता” प्रस्थापित करणे हे त्यांचे एकमेव ध्येय होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.भारत हा प्राचीन काळापासून बौध्द धर्मीय होता यासाठीच स्वातंत्र भारताने “अशोक चक्र” आणि “अशोक स्तंभ” स्विकारलेला आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र कष्ट करून “समता” प्रस्थापित केलेली आहे.एवढे हल्ले होऊनही त्यांनी कोणताही प्रतिहल्ला केल्याचे किंवा करावयास लावल्याचे दिसून येत नाही.मात्र त्यांचे महापरिनिर्वाण झाले आणि इथला व्यक्ती मनमानेल तसा वागू लागला.आपल्यावर झालेल्या हल्ल्याचे तो प्रती उत्तर देऊ लागला तो प्रतीहल्ला करू लागला त्याचा परिणाम असा झाला की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जोडलेला अलुतेदार आणि बलुतेदार आपल्यापासून जवळ जवळ तुटल्यासारखा आणि आपल्या पासून दूर गेल्याचे वातावरण निर्माण झाले.त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांना चौकट निर्माण होऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य महारांची मालमत्ता होऊन बसली.असे समीकरण झाले की बौध्द म्हणजे अस्पृश्य महार आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी याच लोकांसाठी कार्य केले असा समज होऊन बसला त्यामुळे आज त्यांनी दिलेले संविधान बदलण्याची भाषा होऊ लागली आणि तसे वातावरण निर्माण झालेले आहे.त्यामुळे माझे स्पष्ट असे म्हणणे आहे की डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली “समता” आम्हीच विस्थापित करण्याचे कार्य केले आहे.जो पर्यंत पुन्हा एकदा समता प्रस्थापित करण्याचे कार्य सुरु होणार नाही तो पर्यंत आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा विश्वासघात केला आहे असे मी म्हणेन....! त्यामुळे एकंदरीत जो आभ्यास माझ्या समोर आलेला आहे त्याचे अवलोकन केले असता आपण सर्वच “समता” विस्थापित करण्यास कारणीभूत आहोत त्यामुळे मी अस्वस्थ झालो आहे.माझ्याकडे आत्मक्लेश करण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक नाही.यासाठी मला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माफी मागावी लागणार आहे.कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली “समता” आम्ही जतन करू शकलो नाही म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने करतोय एक दिवसांचे “आत्मक्लेश आंदोलन” डॉ बाबासाहेब आंबेडकर आम्हाला माफ करा....! 

राजेश खडके 
समन्वयक 
सकल मराठी समाज 
मो.नं.९८८१७९५३०७

No comments:

Post a Comment