Sunday, June 10, 2018

फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – २१) जे शिवराय यांच्या घराण्याशी घडले......तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्या बरोबर घडले..! उपोषणापुर्वीची परिषद पुणे करार – भाग -६


१९ सप्टे १९३२ रोजी इंडियन मर्चंट चेंबर, मुंबई येथे अत्यंत तप्त वातावरणात एक सभा घेण्यात आली. पंडित मदन मोहन मालवीय हे अध्यक्षपद भूषवितात. मनू सुभेदार, सर चिमणलाल सेटलवाड, वालचंद हिराचंद, राजेंद्रप्रसाद, कमला नेहरु,सर तेजबहाद्दूर सप्रू, छोटीराम गिडवानी, ठक्करबाप्पा, डॉ. देशमुख, डॉ. सावरकर, माधवराव अणे, के. नटराजन, पी. बाळू, पंडित कुंझरू, स्वामी सत्यानंद, एन. शिवराज, असे एकसे बढकर एक लोकं या सभेस हजर होते. त्या मानाने बाबासाहेब हे रंजल्या गांजल्यांचे नेते. वरुन प्रश्न गांधीच्या विरोधात जाण्याचा असल्यामुळे वातावरण तापलेले होते. सर्व गांधीवादी नेत्यांची नजर बाबासाहेबाना खाऊ कि गिळू म्हणत होती. तेवढ्यात वालचंद हिराचंद यानी बाबासाहेबानी आपले मत मांडावे अशी अध्यक्षाना विनंती केली.

बाबासाहेब उभे होतात अन अत्यंत संयम व विद्वत्तपुर्वक आपले विचार मांडतात. ते म्हणतात, गांधीजीनी अस्पृश्यांच्या हिताविरोधात प्राणांकित उपोषण करणे खेदाची गोष्ट आहे. हेच उपोषण त्यानी स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरोधात केले असते तर त्यांचं महात्म्य अधिक उंचावलं असतं. गांधीनी नुसतच उपोषण जाहिर करुन माझ्यावर संकट ओढविले आहे. त्यानी बदली योजना सुचविल्या शिवाय प्रसंगातून मार्ग काढणे अशक्य आहे. मी अत्यंत कष्टाने मिळविलेले हे अधिकार नुसतचं गांधीच्या धाकामुळे पाण्यात सोडण्यास कधीच तयार होणार नाही. मग तुम्ही माझे प्राण घेतले तरी बेहत्तर. तुम्ही बदली योजना गांधींकडुन आणावे मग विचार करण्यात येईल.
मर्द कशाला म्हणतात ते जर बघायचे असेल ना तर अडचणीत सापडलेले बाबासाहेब बघावा. शत्रूच्या गोटात घुसून परिस्थीतीच्या नजरेस नजर भिडवून निर्भेडपणे गरजणारा महाबली शत्रूला नुसतं आवाजाने गारद करत असे. आपला मनसुबा जाहीर करण्याचा त्यांचा हा बाणेदारपणा अन आतील मर्दानकीचा हा दणकटपा त्यांच्यातून ओसंडून वाहताना दिसतो. शत्रू कितीही बळकट व बलवान असला तरी बाबासाहेब दंड थोपटताना जो आत्मविश्वास व निर्भेडपणा दाखवायचे त्यामूळे शत्रू चरकून जाई, अर्धा खचून जाई. लढण्यापेक्षा ईथे समेटच बरे असा शत्रूचा विचारपरिवर्तन होई. बदली योजने शिवाय समेट नाही या भीम गर्जनेने गांधीवादी चरकले. धावाधाव झाली. नेते मुंबईहून थेट पुण्या पर्यंत धावले. नुसती धावपळ व धांधल चालू झाली. सगळ्य़ांची तारांबळ उडाली. बाबासाहेब असं काही करतील याचा अंदाजच नव्हता. समेट घडविण्याच्या सा-या फुशारक्या बाबासाहेबानी उडवून लावल्या होत्या. मोठ मोठाले नेते म्हणून मिरविण्याचा ज्याना गर्व होता ते पार भूईसपाट झाले होते. सर्व नेत्यानी अवाक होऊन बाबासाहेबांच्या पुढे लोटांगण घालून गांधीपर्यंत धाव घेतली. बाबासाहेब मात्र शांत नजरेनी उडालेला गोंधळ न्याहाळत होते.
पुण्यात गांधीची भेट घेऊन एक शिष्टमंडळ मुंबईस परत आले. दुस-या दिवशी परत परिषद भरते तेंव्हा ते शिष्टमंडळ सांगते की, अस्पृश्याना राखीव जागा देण्यास गांधीची हरकत नाही.
हे ऐकुन बाबासाहेब म्हणतात, मी माझ्या कर्तव्यापासून तसुभरही ढळणार नाही, माझा प्राण गेला तरी माझ्या लोकांशी मी घात करणार नाही. मग त्यात माझा जीव गेला तरी चालेले. त्या पेक्षा तुम्ही गांधीना आपले उपोषन अठवडाभर तहकूब करायला सांगावे.
बाबासाहेबांच्या रोखठोक भूमिकेमुळे दुस-या दिवशी दुपारी परिषद स्थगीत झाली.
सप्रूनी कार्यकर्त्यांबरोबर बसून एक नविन योजना तयार केली व रात्री परत सगळे चर्चेस जमले. तेंव्हा बाबासाहेब म्हणतात, अस्पृश्य वर्गास जातीय निवाड्यानुसार स्वतंत्र मतदर संघ मिळाले आहेत. त्या बदल्यात आम्हाला अधिक जागा मिळाव्यात व मध्यवर्ती विधिमंडळात लोकसंख्येंच्या प्रमाणात अस्पृश्याना जागा मिळाव्यात.
परिषदेतील नेत्याना हे मान्य झाले. जयकर, सप्रू, बिर्ला, राजेंद्रप्रसाद व राजगोपालाचारी हे रात्रीच्या गाडीने पुण्यास रवाना झाले.(क्रमश😊

No comments:

Post a Comment