Thursday, June 14, 2018

(भाग – ३८) आम्ही भावनिक लोक आहोत...आम्ही कधीही शिकलेल्या लोकांना विचारले नाही की,आमचे नेतृत्व भैय्यासाहेब आंबेडकर यांच्याकडे का दिले नाही....! डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले आणि समतेचे प्रतिक असणारा भगवा ध्वज निघून गेला.



विषय असा आहे की,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अंत्यदर्शनासाठी जवळ जवळ पंधरा लाख लोक मुंबईत जमा झाले होते.समतेचे कर्ता करविते आणि बौध्दनायक आपले विचार देऊन आणि संविधानाची जबाबदारी बरोबर काही जीवनमूल्य आपल्याला सांगून आपल्यातून निघून गेले होते.ही जबाबदारी आता शिकलेल्या तरुणावर येऊन पडली होती.परंतु त्यानी सांगितलेली एक गोष्ट आपण विसरलो की, “पडे लिखे लोगोने मुझे धोका दिया” याचे भानच आपल्याला राहिले नाही.कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला ठणकावून सांगितले होते की, “मला देव मानू नका” हेही आपण त्यांचे ऐकले नाही.त्यांनी छत्रपती शिवराय आणि शंभूराजे यांच्या नंतर जी समता प्रस्थापित करण्यास आपले संपूर्ण आयुष्य वेचले त्याचेही भान आपण ठेवले नाही.कारण आपण सिंधू संस्कृतीतील सभ्यता पाळणारे लोक आहोत आपण भावनिक होणारच आणि आपण भावनिक झालो.या भावनिकपणामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचे पुत्र यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांना विसरूनच गेलो.आपण कोणाला ठणकावून सांगितले नाही की,आमचे नेतृत्व आता इथून पुढे यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर करतील म्हणून परंतु आम्हाला यशवंत उर्फ भैयासाहेब आंबेडकर यांनीही सांगितले नाही की,येथून पुढे तुमचे नेतृत्व मी करणार आहे.आम्ही भावनिक लोक कशाला विचारतोय त्यांना की,तुम्ही नेतृत्व करा म्हणून कारण आमच्या समोर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्युच्या अहवालाची मागणी बी.सी.कांबळे यांनी केली होती...आता ते जसे म्हणणार तसेच आम्ही चालणार कारण आम्ही भावनिक लोक आहोत.आम्ही हा विचार केला नाही की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची समाधी दिल्लीत उभारली पाहिजे.आम्ही हा विचार केला नाही की जे संविधान आम्हाला दिले आहे त्याच्या अमलबजावणीसाठी आता आमचा संघर्ष सुरु झाला पाहिजे.आम्ही कधीही विचार केला नाही की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या २२ प्रतिज्ञा दिल्या आहेत त्याचे आकलन करून त्याचा प्रचार केला पाहिजे.आम्ही कधीही विचार केला नाही की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जी आम्हाला समता दिलेली आहे आणि जी समता प्रस्थापित केली आहे ती आबाधित कशी ठेवायची असा कोणताच विचार आम्ही केला नाही.शिकलेल्या लोकांनी आम्हाला जो मार्ग दाखविले त्या दिशेने आम्ही जात राहिलो कारण आम्ही भावनिक लोक आहोत.आजपर्यंत आम्ही तेच करीत राहिलो पण एकदाही आम्ही त्या शिकलेल्या लोकांना विचारले नाही की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस पुत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या हातामध्ये आमचे नेतृत्व का....? देत नाही किंवा का दिले नाही.याचाच फायदा घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर असणाऱ्या लोकांनी चळवळीचे नेतृत्व हातामध्ये घेतले आणि शेड्युल्ड कास्ट फेडरेशन नावाचा पक्ष बरखास्त करून भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली.आणि निळा ध्वज हातामध्ये घेतला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना होती हे खरे आहे पण त्यांनी भारतीय रिपब्लिकन पक्ष स्थापन केलेला नाही हेही सत्य आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निळा ध्वज दिलेला नाही.परंतु या निळ्या ध्वजाला आज आपण संघर्षाचे प्रतिक मानतो.कारण भगवा ध्वज हा समतेचा विचार आहे.आणि तो समतेचा विचार गौतम बुध्दापासून ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पर्यंत पोहचला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले आणि समतेचे प्रतिक असणारा भगवा ध्वज निघून गेला. (क्रमश😊

No comments:

Post a Comment