Monday, June 11, 2018

फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – २८) जे शिवराय यांच्या घराण्याशी घडले......तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्या बरोबर घडले..! कुणबी मराठा तसेच अलुतेदार आणि बलुतेदार यांच्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कोकणात खोती आंदोलन केले या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी पहिल्यांदाच संपावर गेले...! राजेश खडके सकल मराठी समाज

मजुरांचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी १९३६ मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती.या पक्षाच्या माध्यामतून त्यानी राजकीय प्रश्न हाताळण्याचे कार्य केले होते.कोकणामध्ये पूर्वापार चालत आलेली खोती पद्धत बंद करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लढा उभारला.त्यांच्यामुळे भूमिहीन असणारा कोकणातील कुणबी, बहुजन समाज पहिल्यांदाच जमिनीचा मालक झाला. १६ मे १९३८ ला खेर्डी (ता. चिपळूण) येथील हत्ती माळावर खोती विरोधी परिषद झाली.ती सर्वत्र गाजली. या परिषदेतील बाबासाहेबांचे दीड तास भाषण झाले. कुळांच्या नेमक्‍या शोषणावर आणि त्यांच्या प्रश्‍नांवर त्यांनी सखोल विवेचनाने बोट ठेवले होते. त्यांच्या प्रज्ञेचा आणि अभ्यासाचा अनुभव कोकणला यानिमित्ताने मिळाला.कोकणातील  ब्राह्मण लोकांकडे शेकडो, हजारो एकर जमीन असे. या खोतांच्या शेतात राबण्यासाठी गावातील मागास, इतर मागास वर्गातील मंडळी असे.कुणबी लोक खोतांची शेती, शेतात काम करण्याचे काम करीत असे त्यांना ‘कुळे’ म्हटले जात असे. या कुळांचे तसेच त्यांची सेवाचाकरी करणाऱ्या मंडळींचे खोतांकडून शोषण होत असे. बारा बलुतेदार बहुजन समाज, बहुसंख्य कुणबी समाज समाज या खोती पद्धतीने भरडला जात होता. खोताकडे सगळी यंत्रणा होती. अख्खा गाव त्याच्या ताब्यात होता.त्यामुळे ही मंडळी आवाज उठवू शकत नव्हती.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२५ पासून या प्रश्‍नाचा अभ्यास सुरू केला.कोकणातील वेगवेगळ्या समूहांच्या परिषदा घेऊन खोतीविरुद्ध संघर्ष पुकारला.१३ व १४ एप्रिल १९२९ रोजी भारतीय बहिष्कृत समाजसेवक संघाच्या विद्यमाने चिपळूणच्या मामलेदार कचेरीजवळ रत्नागिरी जिल्हा बहिष्कृत परिषदेचे दुसरे अधिवेशन भरण्यात आले होते.आणि याकाळी शेतकरी पहिल्यांदा संपावर गेला होता. (क्रमश😊

No comments:

Post a Comment