Sunday, June 10, 2018

फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – २०) जे शिवराय यांच्या घराण्याशी घडले......तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्या बरोबर घडले..! मताधिकाराचा निवाडा जाहीर झाला “पुणे करार” भाग – ५

बाबासाहेब मुंबईच्या प्रवासात होते. तिकडे भारतापासून हजारो मैल दूर ब्रिटनमधे अस्पृश्यांच्या मताधिकार व इतर मागण्यावर निर्णय घेण्यात आला. १४ ऑगस्ट १९३२ रोजी ब्रिटनच्या पंतप्रधानानी अल्पसंख्यांक प्रश्नावर आपला निवाडा जाहीर केला. या निवाड्या प्रमाणे अस्पृश्याना स्वतंत्र मतदार संघ बहाल करण्यात आले. आता अस्पृश्य जनता आपला माणूस निवडून आणू शकत होती. त्याच बरोबर स्पृश्य हिंदूच्या प्रतिनिधीच्या निवडनुकीत मतदान करुन आपला हक्क बजावण्याचा दुहेरी अधिकारही बहाल करण्यात आला होता. अस्पृश्यांसाठी आज सोनियाचा दिनू होता. भारतभर जल्लोषाचं वातवरण होतं, पण ज्या माणसानी हे मिळविण्यासाठी पराकोटीचे कष्ट उपसले होते तो मात्र दूर समूद्रात भारताच्या दिशेनी प्रवासात होता. १७ ऑगस्ट १९३२ ला बाबासाहेब मुंबईस पोहचले. या निवाड्यामुळे अस्पृश्य वर्गामधे नवचैतन्याची लाट उसळली. आता नव्या दिशा त्याना खुणावू लागल्या होत्या. प्रगतीचे नवे पथ समोर दिसू लागले. राजकीय हक्क बजावण्यासाठी ब्रिटिशानी दिलेली संधी अतूल्य अन अमूल्य होती. आज पर्यंत दास्यात खितपत पडलेला समाज आता धन्याच्या बरोबरीत येऊन ठेपला होता. सरकार दरबारी अस्पृश्यांची वर्णी लागणार होती. ज्या सनातन्यानी आजवर कुत्र्यापेक्षा वाईट वागविले त्यांच्या बरोबरीचा मान सन्मान बहाल झाला होता. सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. जल्लोष चालू होता. देशाच्या कानाकोप-यातील दलित आनंदाने भारावून गेला होता. या सर्व धामधूमीत मग्न झालेला दलित येणा-या वादळी संकटापासून अनभिज्ञ होता. या जल्लोषाला नजर लागली होती.
उभा समाज सर्वत्र आनंदात न्हाऊन निघत असताना भारताच्या पश्चिम भागात पुणे नावाच्या शहरात गांधी नावाचा इसम ज्याला लोकं महात्मा म्हणत त्यानी या सर्व आनंदावर विरजण घालण्यासाठी एक अत्यंत क्रुर व निष्ठुर आक्रमणाची तयारी सुरु केली. अस्पृश्यांचं राजकीय अस्तित्व उदयास येण्याआधीच त्याला ठेचण्याचा आराखडा पुण्यातील येरवडा तुरुंगात आकार घेऊ लागला. सर्व शक्ती झोकून देऊन दलितांचे नवे सर्व अधिकार विसर्जीत करुन त्याना परत गुलाम म्हणून वागविण्याची गांधीनी जणू शपथच घेतली होती. आपली पूर्ण ताकद झोकून दलितांच्या अस्तित्वावर घाला घाण्यास आता गांधी सज्ज झाला होता. अस्पृश्याना मिळालेले स्वतंत्र मतदार संघ व दुहेरी मतदानाचे अधिकार हे ब्रिटिशानी दिलेले कवच कुंडल काढून घेण्यासाठी गांधीनी त्यांच्या आयुष्यातील अत्यंत शक्तीशाली असे ब्राह्मास्त्र म्हणजेच आमरण उपोषण उपसले. हे अस्त्र ईतके प्रभावी होते की दलितांची उभी जमात यात भस्म झाली असती. या उपोषणात गांधीचा मृत्यू झाल्यास देशात रक्ताचे पाट वाहिले असते अन मृत्यु न झाल्यास ती कवच कुंडले गांधी पळवुन नेणार होता. एकंदरीत काय तर गांधीची खेळी दोन्ही बाजूनी आमचा घात करुन जाणार होती. कारण त्यांनी पोतळीतून सर्वात घातक व शक्तीशाली अस्त्र बाहेर काढण्याचे जाहिर केले. आज पर्यंतचे बाबासाहेबांचे सर्व कष्ट मातीस मिसळणार होते. पर्यायही नव्हता. दलितांच्या विरोधातील उघड उघड घेतलेली ही गांधीची भूमीका समस्त मानव जातीला लाजविणारी होती. बर हे स्वतंत्र मतदार संघ फक्त दलितानाच मिळाले होते अशातला भाग नव्हता. मुसलमान, शीख, ख्रिश्चन याना सुद्धा स्वतंत्र मतदार संघ मिळाले होते. पण गांधीना इतरांचे मतदार संघ मान्य होते. त्यानी देशाला धोका नव्हता. पण दलितांचे मतदार संघ मात्र गांधीना नको होते. यावरुन दिसेल की गांधी किती जातीवादी व अस्पृश्य द्वेष्टा होता. त्यानी सरळ सरळ दोन समाजात मतभेद केला होता. मुसलमान व शीखाना मिळालेल्या स्वतंत्र मतदार संघाला समर्थन दिले होते तर फक्त अन फक्त दलितांचा अधिकार मात्र त्यांच्या डोळ्यात खुपू लागला. जातीयवादी संस्कारात ज्याची जडण घड्ण होते त्याच्या बुद्दीच्या मर्यादा अशा प्रकारे सिद्ध होतात. गांधीमधील महात्मा आज गडून पडला व जातियवादी पुरुष जगापुढे आला. ज्या स्वतंत्र मतदार संघामुळे मुसलमान सारख्या समाजाकडुन गांधीला कुठलाच धोखा वा देशातील लोकामधे पडणारी फूट दिसली नाही ती दलितांच्या बाबतीत मात्र दिसली. गांधीच्या या दृष्टीकोनानी हे जगजाहीर झाले की गांधीची वैचारीक क्षमता फारच कुचकामी व मर्यादीत होती.
गांधीजी लवकरच उपोषणास बसणार आहेत ही बातमी हाहा म्हणता देशभर पसरली. सगळीकडे गांधीवादयानी अस्पृश्यांवर दबाव आणणे सुरु केले. दलितानी आपले सर्व अधिकार विसर्जीत करुन गांधी देतील ते अधिकार स्विकारावे असा पवित्रा सगळ्या सवर्णानी घेतला. अस्पृश्य समाज मात्र हताश होऊन कात्रीत सापडलेल्या बाबासाहेबांकडे खिन्न बघू लागला. या वेळेस गांधीनी बाबासाहेबाना अशा खिंडीत गाठले होते जिथे विजय अशक्यप्राय होते. पराजय मात्र अटळ होता. गांधीच्या या अमानवी, निर्दयी अन निष्ठूरपणाचा निषेध करावा तेवढा कमीच. (एम.डी.रामटेके) (क्रमश

No comments:

Post a Comment