Saturday, June 16, 2018

(भाग – ४३) भगवा ध्वज विरुध्द निळा ध्वज संघर्ष म्हणजेच एक राजकारण.....! डॉ बाबासाहेब आंबेडकर विरुध्द छत्रपती शिवाजी महाराज संघर्ष पेटविणे म्हणजे एक मनुवादी खेळी....या खेळात हजारो दलित कुटुंब उध्वस्त...! भगवा ध्वज विचार...तर निळां ध्वज संघर्ष...!


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा संपूर्ण भारत देशालाच नव्हे तर जगाला झाला होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य देशहितासाठी व सामजिक परिवर्तनासाठी होते जवळ जवळ सर्वांनाच माहित झाले होते.परंतु आर्य सनातनी वृत्ती इतकी भयानक आहे की,नेहमी हे लोक समोर न येता नेहमी पाहुण्याच्या काठीने साप मारण्याचे कार्य करीत असतात.जेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भगवा ध्वज घेऊन समता प्रस्थापित करून बौध्द धम्माची दीक्षा घेतली आणि संपूर्ण भारत बौद्धमय करेन अशी घोषणा केली तेथेच आर्य सनातनी घाबरले होते.कारण त्यांना याची पूर्ण कल्पना होती की,प्राचीन भारत हा बौद्ध भारत आहे.जर तसे नसते तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला अशोक स्तंभ आणि अशोक चक्र स्वीकारले नसते.त्यामुळे त्यांना याची कल्पना होती की, डॉ बाबासाहेब आंबेडकर भारत बौद्धमय केल्याशिवाय शांत बसणार नाही.त्यामुळे त्यानी धम्म दीक्षा घेतली आणि लगेचच त्यांचे निधन झाले.समता सैनिक दलाच्या माध्यमातून भगवा ध्वज आपल्याकडेच होता.१९२५ साली स्थापन झालेल्या स्वयंसेवक संघाकडे नव्हता.मात्र प्रबोधनकार ठाकरे यांच्या माध्यमातून तो १९६६ साली शिवसेनेकडे गेला कारण १९५७ ला आपण निळा ध्वज स्विकारलेला होता.आता भगव्या ध्वजाची मालकी शिवसेनेची झालेली होती.आणि निळ्या ध्वजाची मालकी रिपब्लिकन पक्षाची झालेली होती.मात्र त्याकाळी आपली भावना छत्रपती शिवराय यांच्या स्वराज्याच्या भगव्या ध्वजा संदर्भात होती.आता भगवा विरुध्द निळा असा संघर्ष मनुवादी व्यवस्थेला निर्माण करायचा होता.त्याची सुरुवात १९५७ पासून त्यांनी केली होती.सत्ता समीकरणे उभी राहिल्याशिवाय काय फायदा होणार नाही याची कल्पना रिपब्लिकन नेत्यांना आणि मनुवादी व्यवस्थेला होती.मग भगवा ध्वज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि निळा ध्वज म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर अशी समीकरणे तयार करण्याचे कटकारस्थान सुरू झाले होते.कारण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अठरा अलुतेदार आणि बारा बलुतेदार वर्ग आपल्याकडे वळविला होता.परंतु रिपब्लिकन नेत्यांनी दलित हा शब्द निर्माण करून अलुतेदार आणि बलुतेदार याच्या पासून आपल्या स्वत:ला वंचित करण्याचे कार्य सुरु केले होते.त्यामुळे पुन्हा सवर्ण विरुध्द दलित असा वाद निर्माण झाल्याशिवाय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रस्थापित केलेली समता आणि इतर वर्ग दूर करता येणार नाही.त्यामुळे अनुसूचित वर्ग तयार करून इतर वर्ग कसा दूर होईल याचे राजकारण सुरु झाले कारण आता राजकीय पुढारी यांना माहित झाले होते इथला समाज हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला लगेच भावनिक होतो.१९७६ साली मराठवाडा नामांतर विद्यापीठ लढा सुरु झाला.म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज विरुध्द डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणजे मराठवाडा नामांतर लढा आणि नामांतर लढा काय आहे ते आपण पुढील पाहू.. (क्रमश😊

No comments:

Post a Comment