Friday, June 15, 2018

१९६६ ला शिवसेनेची स्थापना झाली आणि १९७२ ला ‘दलित पँथर' या लढाऊ संघटनेची स्थापना झाली...! स्वार्थापायी पाचच वर्षात ‘दलित पँथर' चे झाले तुकडे....एक ‘मासमुव्हमेंट' दोन “भारतीय दलित पँथर” होय.....! भगवा ध्वज विचार...तर निळां ध्वज संघर्ष...!


एकंदरीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर कष्ट करून सामजिक सलोखा निर्माण करून “समता” प्रस्थापित केली होती..महात्मा ज्योतिबा फुले हयात नसताना त्यांचे कार्य आणि लपवून ठेवलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार समोर फुले यांनी समोर आणले.आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वीकारलेला भगवा ध्वज पुढे आला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या सर्व बाबींचा गंभीरपूर्वक विचार करून शिवरायांचे विचार समोर आणले.त्यामुळे अशा महान पुरुषाची हत्या या आर्य सनातनी वृतीने केली होती याची पूर्ण कल्पना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना झालेली होती.त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानून १९२४ मध्ये समतेचे संरक्षण करण्यासाठी समता सैनिक दल स्थापन केले होते.प्राचीन भारत हे बौध्द राष्ट्र होते याचा पूर्ण आभ्यास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा झाला होता.त्यामुळे मनुस्मृती दहन करून स्वतंत्र भारताला संविधान देऊन बौध्द धम्माची दीक्षा घेतली होती.यातच १८८५ मध्ये जन्म घेतलेले केशव सिताराम ठाकरे म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांनीही बौध्द धम्माचा आभ्यास केला होता त्यांनीही बौध्द लेण्यावर आर्य सनातनी यांनी आक्रमण करून त्याला हिंदुत्वाचे लेबल कसे लावले आहे यावर भरपूर लिखाण केलेले आहे.ते म्हणतात कार्ल्याची लेणी ही बौध्द लेणी आहे आणि बाहेर जे एकविरा देवी म्हणून जे मंदिर उभारले आहे ती एकविरा देवी नसून गौतम बुद्धांची माता महामाया आहे.छत्रपती शिवराय यांचा भगवा ध्वज हा गौतम बुध्द आणि सम्राट अशोक आणि वारकरी सांप्रदाय यांचा आहे.तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारलेला भगवा ध्वज समतेच ध्वज आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे १९५६ साली महापरिनिर्वाण झाले नंतर भारतीय रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाल्या नंतर समता सैनिक दल पुर्नस्थापित करून “निळा ध्वज” स्वीकारण्यात आलेला होता.या सर्व बाबींचा विचार करून प्रबोधनकार ठाकरे यांना हा भगवा ध्वज आर्य सनातनी यांचेकडे जाऊन द्यायचा नाही यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांनी समतेचे विचार असणारे छत्रपती शिवाजी महाराज स्वीकारून १९६६ मध्ये शिवसेना नाचाची सामाजिक संघटना उभी केली.समतेच्या विचारावर १९७३ पर्यंत भगवा ध्वज घेऊन कार्य सुरु होते.परंतु केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे यांचे निधन झाले आणि शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कार्ल्याच्या बुध्द लेणी वर म्हणजेच महामाया यांच्या स्थानावर एकविरा देवी ही आपले अधिष्टान मानून कोळी समाजाचे अधिष्टान तयार करून समता सोडून आक्रमक हिंदुत्व स्वीकारून कार्य सुरु केले.

‘दलित पँथर' या लढाऊ संघटनेची –:
रिपब्लिकन पक्षातील गटबाजी, नेत्यांची निष्क्रियता व त्यातून उदभवलेला समाजाचा मरगळलेपणा आणि प्रचलित प्रश्नांमधून दाहक होत जाणारे वास्तव ही सगळी पार्श्वभूमी दलित लेखकांच्या लेखनामागे होती. यातूनच अर्जुन डांगळे, ज. वि. पवार, प्रल्हाद चेंदवणकर, नामदेव ढसाळ, राजा ढाले, बाबूराव बागुल इत्यादी साहित्यिकांनी पुढाकार घेऊन, दलितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व त्यावर लढा देण्यासाठी दि. ९ जुलै १९७२ रोजी मुंबईला ‘दलित पँथर' या लढाऊ संघटनेची स्थापना केली. पुढे या संघटनेला अरुण कांबळे, रामदास आठवले, दयानंद म्हस्के, गंगाधर गाडे, प्रितमकुमार शेगांवकर यांचे नेतृत्व लाभले. त्यांनी आक्रमक शब्दप्रवृत्तीच्या जोरावर व भावनिक वत्कृत्वाच्या बळावर मोठमोठ्या सभा जिंकल्या. त्याचा लाभ दलित चळवळीला मिळाला व चळवळीच्या कक्षा वाढविल्या. दलित पँथराचा उदय व विकास हे बदलत्या परिस्थितीतील दलित युवकांनी केलेल्या विचारांचे फलित आहे.
पँथर संघटनेचे नेते नामदेव ढसाळ कम्युनिस्टवादी व राजा ढाले हे आंबेडकरवादी असा वाद पुढे आला.४६ १९७४ साली नामदेव ढसाळ यांनी नागपूर येथे दलित पँथरचे अधिवेशन भरविले व स्वत:चा गट वेगळा केला; तर १९७६ साली राजा ढाले यांच्या गटातून भाई संगारे व अविनाश महातेकर बाहेर पडले; त्यांनी संगारे, महातेकर गट निर्माण केला. दि. ७ मार्च १९७७ ला राजा ढाले यांनी नाशिक येथे आपल्या गटाचे स्वतंत्र अधिवेशन घेऊन तेथे पँथर बरखास्तीचा निर्णय घेतला. वमासमुव्हमेंट' या संघटनेची स्थापना केली. ढाले गटाच्या या कृतीचा निषेध करून अरुण कांबळे, रामदाम आठवले, दयानंद म्हस्के, ज. वि. पवार, गंगाधर गाडे, प्रितमकुमार शेगांवकर इत्यादी कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन दि.२८ एप्रिल १९७७ ला औरंगाबाद येथे भारतीय दलित पँथरची निर्मिती करून आपले कार्य चालू ठेवले.(क्रमश😊No comments:

Post a Comment