Sunday, June 10, 2018

फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यानो सावधान.......! (भाग – २७) जे शिवराय यांच्या घराण्याशी घडले......तेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या घराण्या बरोबर घडले..! डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा लढा आता समतेचे स्वराज्य उभारणीचे...! इथल्या मनुवादी व्यवस्थेने आणि इथल्या सनातनी मराठ्यांनी मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवरायांच्या पुतळा उभारणीला केला विरोध....!

सायमन कमिशन यांनी भारताचा स्वतंत्र पूर्वीचा आढावा घेतला कारण त्यांना भारत देश स्वतंत्र करावयाचा होता.याची कल्पना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आलेली होती.त्यामुळे आंता भारत देश स्वतंत्र करण्याचा मुद्दा शिल्लक राहिला नव्हता.मुद्दा होता की,भारत वासियांना त्यांचे हक्क व अधिकार याची घटनात्मक तरतूद करण्याचा त्यामुळे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने स्वतंत्र दिवसही साजरा केला होता.परंतु स्वतंत्र भारत आपल्या हातात रहात नाही याचे दु:ख इथल्या मनुवादी व्यवस्थेला पर्यायाने कॉंग्रेस नेत्यांनाही होते.त्यामुळे स्वतंत्र भारतात अस्पृश्यांना मिळणारे अधिकार हे त्यांना मिळवून द्यायचे नव्हते.हे गांधी उपोषणावरून दिसून आले होते.त्यामुळे सुरुवाती पासून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा विचार मोठ्या प्रमाणात रुजविण्याचे कार्य केलेला आहे.महात्मा फुले यांच्या माध्यमातून छत्रपती शिवराय व शंभूराजे यांचे विचार आंबेडकर यांनी स्वीकारले होते.त्यामुळे समतेशिवाय कोतेही कार्य अनंत काळ टिकणार नाही याची कल्पना आबेंडकर यांना झाली होती.पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पहिला पुतळा उभारणीला इथल्या मनुवादी व्यवस्थेने आणि इथल्या सनातनी मराठ्यांनी मोठ्या प्रमाणात छत्रपती शाहू महाराज यांना विरोध केला होता.तरीही या विरोधाला न जुमानता त्यानी छत्रपती शिवरायांचा पहिला पुतळा उभारलेला आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.ह्या सर्व कटकारस्थाने आंबेडकर यांनी जवळून पाहिलेली आहेत.त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात या सनातनी लोकांचा आभ्यास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा झालेला होता.त्यामुळे त्यांनी चालविलेला हिंदू धर्म हा समतेचा विरोधक धर्म असल्याचे त्यांची खात्री झालेली होती.शहाजीराजे व माता जिजाऊ यांनी गौतम बुध्दापासून ते सम्राट अशोकापासून ते वारकरी सांप्रदाय पर्यंत चालत आलेला भगवा ध्वज शिवरायांच्या हातामध्ये देऊन स्वराज्य स्थापन केले होते.तोच भगवा ध्वज घेऊन महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक चळवळीची स्थापना केली होती आणि तोच भगवा ध्वज घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समता सैनिक दल स्थापन केली होते.त्यामुळे त्यांचे कार्य स्वराज्य पुर्नस्थापित करण्याचे होते त्याप्रमाणे त्यांची वाटचाल होती.परंतु मनुवादी व्यवस्थेच्या लक्षात आले होते त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता प्रस्थापणात ते अडचण निर्माण करीत होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या हिंदू धर्म सोडणार असल्याच्या घोषणेने मनुवादी व्यवस्था हादरून गेली होती.जे छत्रपती शिवराय यांनी केली म्हणजे पहिला राज्याभिषेक नाकरून दुसरा राज्याभिषेक शाक्त धर्मानुसार केला आणि इथली मनुवादी व्यवस्था नाकरून टाकली म्हणून त्यांची हत्या करण्यात आली.छत्रपती संभाजी महाराज यांनी शाक्त धर्माचा प्रचार आणि प्रसार केल्यामुळे त्यांची मनुस्मृती नुसार हत्या केली.ज्या महात्मा फुले यांनी छत्रपती शिवराय यांचे विचार शोधून तेच रयते समोर आणून मनुस्मृती दहन करावी असे बोलून दाखविले त्यांची या मनुवादी व्यवस्थेने हत्या केली.छत्रपती शिवराय यांचा पहिला पुतळा बसविला आणि बहुजन समाजाला आरक्षण दिले अशा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची हत्या घडविली त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पासून अतिशय सावध झाले होते.(क्रमश😊

No comments:

Post a Comment