Saturday, February 10, 2018

आज अटकेचा अकरावा दिवस (११) ११ फेब्रुवारी १६८९ संभाजीराजांना अकलूज मध्ये आणताच औरंगाजेबाने आपली छावणी बहादूरगडाकडे वळविली....! अकलूज ते बहादूरगड दरम्यान कोणत्याही मराठ्याने घोडा वापरायचा नाही असा फर्मान काढला होता....! रायगडावर संभाजीराजांना सोडविण्यासाठी येसूबाईनी तातडीची बैठक बोलाविली होती....!संभाजीराजांच्या आज अटकेचा ११ वा दिवस होता मुखर्बखान संभाजीराजांना घेऊन औरंगांजेबाच्या अकलूज येथील पाच लाखाच्या सेनेत दाखल झाला.याची खबर औरंगांजेबाला लागताच त्याने संभाजीराजांना घेऊन बहादूरगडाकडे छावणी हलविण्याचे आदेश आपल्या सैन्याला दिले.....कारण तो अतिशय घाबरट स्वभावाचा होता.कारण शिवराय दिल्ली येथे औरंगांजेबाच्या  अटकेत असताना त्यांनी औरंगांजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटले होते.त्याला ही जबाबदारी घ्यायची नव्हती.त्याने असा फर्मान काढला की,अकलूज ते बहादूरगड दरम्यान कोणीही मराठ्याने घोडा वापरायचा नाही.इकडे रायगडावर संभाजीराजांना सोडविण्यासाठी येसूबाईनी तातडीची बैठक बोलाविली होती....! परंतु निर्णय घेण्यासाठी रायगडाचे सिहासन खाली होते....कारण सिहासनपती औरंगांजेबाच्या अटकेत होता.येसूबाईकडे कुलमुखत्यार जरी असले तरी त्यांना छत्रपती जाहीर केल्याशिवाय निर्णय घेता येऊ शकत नव्हता.तेव्हा त्यांनी आपल्या कुलमुखत्यार पत्राच्या अधिकारानुसार सोयराबाई पुत्र आपले दीर राजाराम यांचे मंचकारोहण करणे गरजेचे होते.जेव्हा वैदिक धर्म पंडितांनी छत्रपती शिवरायांची हत्या केली तेव्हा सोयराबाईच्या माध्यमातून राजारामला गादीवर बसविले होते.तेव्हा ते अवघे दहा वर्षाचे होते आता ते एकोणीस वर्षाचे झाले होते.राजारामांचा स्वाभाव प्रेमळ आणि भावनिक असे होते त्यामुळे येसूबाईनी त्यांना छत्रपती बनविण्याचा तातडीची बोलाविली बैठकीत निर्णय घेतला.आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे १२ फेब्रुवारी १६८९ मध्ये राजाराम यांचा राज्याभिषेक करण्याचे फर्मान स्वराज्याचे कुलमुखत्यारधारक छत्रपती संभाजी महाराज यांची पत्नी येसूबाई यांनी काढले.

No comments:

Post a Comment