Sunday, February 4, 2018

आज अटकेचा पाचवा दिवस (५) ५ फेब्रुवारी १६८९ संभाजीराजांचा मळे घाटातून चौथ्या दिवसाचा अटकेचा प्रवास संपल्यानंतर ते आज पाचव्या दिवशी मळे घाट उतरून पाकरकुंज गावात आले होते.....!


विषय असा आहे की, १ फेब्रुवारी १६८९ मध्ये संभाजीराजांना मुखर्बखान स्वराज्यात जेरबंद करून संगमेश्वरातून निवडी या गावातून नरदवाडी मार्गे मळे घाटातून पाकरकुंज गावात घेऊन आला होता.या पाच दिवसांच्या प्रवासात आतापर्यंत सरनोबत मालोजी घोरपडे - गणोजी शिर्के आणि शिर्केंचा सरदार अर्जुना महार तसेच पंचवीस धनगर तरूण संभाजीराजांना वाचविण्यासाठी वीर गतीला प्राप्त झाले होता.मात्र १ फेब्रुवारी रोजी निसटून गेलेला संताजी घोरपडे म्हणजे सरनोबत मालोजी घोरपडे यांचा मुलगा स्वराज्याची सेना घेऊन आजून पर्यंत संभाजीराजांना वाचविण्यासाठी आलेला दिसत नाही.पाच पाच लाखांच्या सेनेला सळो की पळो करून सोडणारा छत्रपती संभाजी महाराज केवळ विश्वासघातकी लोकांमुळे अडीच हजारच्या सेनेत जेरबंद होता ही फार मनाला टोचणारी बाब माझ्या समोर आलेली आहे.पाच दिवसांचा कालावधी खूप मोठा कालावधी आहे.अजून मुखर्बखान स्वराज्यातच आहे हे विसरून चालणार नाही आमचे पूर्वज काय करीत होते जेव्हा स्वराज्याचा छत्रपती संभाजी महाराज यांना जेरबंद करून निघाले तेव्हा म्हणून मी १६ फेब्रुवारी २०१८ रोजी माता जिजाऊ चरणी आत्मल्केश करीत आहे.

No comments:

Post a Comment