Wednesday, February 14, 2018

आज अटकेचा पंधरावा दिवस (१५) १५ फेब्रुवारी १६८९ रायप्पा महार बहादूरगडाच्या एक दिवसांच्या अंतरापर्यंत पोहचला आहे....! मुखर्बखान कोण...?संभाजीराजांच्या आज अटकेचा १५ वा दिवस होता.ज्या मुखर्बखान याने छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचा सहकारी कवी कलश यांना संगमेश्वर येथून जेरबंद करून अकलूज येथे घेऊन चालला होता.तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की हा नेमका मुखर्बखान कोण...? होता.तर त्याचे खरे नाव “शेख निजाम” होते.हा गोवळकोंडा या किल्ल्याचा कुतुशहाचा लढवय्या सेनापती होता. योद्धापेक्षा फितुरी करण्यामध्ये अतिशय हुशार असा व्यक्ती होता.औरंगाजेबाने गोवळकोंड्यावर आक्रमण केल्यावर शिपायापासून सुरुवात करून सेनापती पदावर पोहचलेल्या शेख निजामाने त्याचा कडवा प्रतिकार केला. औरंगाजेबाने फितुरीने त्याला फोडून आपल्यात सैन्यात घेतले.त्याला सहा हजार घोडे व पाच हजार स्वरांची मनसब आणि “मुखर्बखान” हा किताब देऊन त्याचा सन्मान केला.

No comments:

Post a Comment