Friday, February 2, 2018

आज अटकेचा तिसरा दिवस (३) ३ फेब्रुवारी १६८९ संभाजीराजांचा गगनबावडा घाटातून तिसऱ्या दिवसाचा अटकेचा प्रवास सुरु झाला.....!विषय असा आहे की,१ फेब्रुवारी १६८९ मध्ये संभाजीराजांना मुखर्बखान याने स्वराज्यात जेरबंध केले होते.संभाजी महाराज हे स्वराज्याचे छत्रपती होते आजचा तिसरा दिवस होता संताजी घोरपडे निसटून जाण्यास यशस्वी झाला होता....नंतर त्याने काय केले.....? असा माझा प्रश्न आहे.त्याने ती खबर रायगडला दिली होती काय....? किंवा रयतेला दिली होती काय...? अशी बरीच प्रश्न माझ्या मनात घालमेल करीत आहेत.छत्रपती संभाजी महाराज यांना जेरबंद करण्यासाठी अकलूज वरून निघालेला मुखर्बखान याची खबर कोल्हापूरमध्ये पन्हाळ गडावर असलेल्या म्हलोजी घोरपडे यांना मिळते मात्र ती खबर संभाजी महाराज यांना का मिळत नाही.....? याचाच अर्थ सरळ आहे की,शिवरायांनी उभारलेली गुप्तहेर संघटना पोखरली गेली होती. संभाजीराजांची अडीच हजारांची  अंगरक्षक सेना कोणी गायब केली.स्वराज्यात गद्दारांची फौज उभी राहिली होती काय....? असा प्रश्न उपस्थित झाले आहे.

No comments:

Post a Comment