Thursday, February 8, 2018

आज अटकेचा नववा दिवस (९) ९ फेब्रुवारी १६८९ संभाजीराजांचा वसंतगड मधील आठवा दिवसाचा अटकेचा प्रवास संपल्यानंतर ते आज नवव्या दिवशी तळबीड मध्ये आले होते .....! वैदिक धर्म पंडितांनी काही स्वराज्याचे गद्दार बरोबर घेऊन भूलभूलैया तयार केलेला होता....!संभाजीराजांच्या आज अटकेचा १० वा दिवस होता मुखर्बखान फक्त अडीच हजारच्या सेनेच्या बंदोबस्तामध्ये स्वराज्याचा “छत्रपती” अटक करून घेऊन चालला होता.गनिमी काव्यात तरबेज असणारे “मराठा” आज कमजोर पडले होते.संभाजी महाराजांच्या वाटेचा मागसुम त्यांना लागत नव्हता ही काय पचण्यासारखी गोष्ट स्वराज्याला वाटत नाही.मात्र जे स्वराज्याला प्रामाणिक होते.त्यांना स्वराज्याच्या गद्दारामुळे वैदिक धर्म पंडित दिशाभूल करीत होते.संताजी घोरपडे – खंडोजी बल्लाळ आणि रायप्पा महार महाराणी येसुबाईना भेटले होते.आता येसुबाईनी स्वत: हातात तलवार घेऊन कशी बशी जमा केलेली स्वराज्याची अठरा हजाराची सेना घेऊन ते स्वराज्याचे छत्रपती संभाजी महाराज यांना शोधण्यास निघाले होते.त्यांच्या बरोबर संताजी घोरपडे – खंडोजी बल्लाळ आणि रायप्पा महार होते.रायगडच्या पाठीमागे असलेला वागोली घाटातून निघालेल्या येसूबाईना त्यांचे बंधू मोहिते भेटले.त्यांनी येसूबाईना संभाजीराजे यांची खबरबात सुनावली ते म्हाणाले की,राजांचा मागसुम लागला आहे आजच ते औरंगाजेबाच्या अकलूज येथील पांच लाखाच्या छावणीत दाखल झाले आहेत.आता अकलूज हा परिसर मोकळ्या मैदानाचा परिसर होता.पाच लाखाच्या फौजे समोर मैदानात अठरा हजार सेनेचा निभाव लागणार नाही या जाण येसूबाईना होती.कारण त्या सुध्दा योद्ध्या होत्या.तरीही संताजी घोरपडे – खंडोजी बल्लाळ आणि रायप्पा महार त्या औरंगाजेबाच्या पाच लाखाच्या फौजेवर तुटून पडायला निघाले होते.परंतु स्वराज्यासाठी हे योग्य नव्हते कारण ही युध्दनीती नसून आत्मघात आहे.तेव्हा येसूबाईनी या सर्वाना माघारी रायगडावर फिरण्याचे आदेश दिले होते आणि हे आदेश देण्याचा त्यांना राजकीय अधिकार होता.त्याचे कारण असे की,छत्रपती शिवाजी महाराज यांनी येसूबाई यांना स्वराज्याचे कुलमुखत्यार दिले होते.....त्यामुळे निर्णय घेण्याचा त्यांना कायदेशीर अधिकार होता.रायगडावर येसूबाईनी स्वराज्या संदर्भात ११ फेब्रुवारी १६८९ मध्ये तातडीची बैठक बोलाविली होती.

No comments:

Post a Comment