Saturday, February 24, 2018

आज अटकेचा पंचविसावा दिवस (२५) २५ फेब्रुवारी १६८९

राजकारण करणाऱ्या मंडळीना मग ते मराठा असोत की,दलित असोत त्यांना छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३८ दिवसांचा प्रवासाची माहिती जनतेपर्यंत पोहचू नये असे वाटत आहे.कारण या ३८ दिवसात काय घडले याची माहिती जर रयते समोर आली की,फुले शाहू आंबेडकर विचार बळकट होतील.आणि त्यांच्या पोटची भाकरी बंद होईल.समाजहिता पेक्षा हे कार्यकर्ते आपले पोट कसे भरेल याचीच चिंता करीत बसलेले असतात.ते रयतेला हे कधीच सांगत नाही की, फुले शाहू आंबेडकर म्हणजेच स्वराज्य आणि स्वराज्य म्हणजेच छत्रपती शिवराय होय असे समीकरण असताना मराठा कार्यकर्त्यांना तसेच रिपब्लिकन कार्यकर्त्यांना त्यांचे नेते असे सांगतात की,छत्रपती शिवाजी महाराज हिंदू धर्मीय राजा होता.मला एक साधा प्रश्न तुम्हाला विचारायचा जर खरेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्मीय होते.तर त्यांचे विचार दोनशे वर्ष का लपविले गेले....? घरंदाज मराठ्यांना त्यांचा इतिहास लपविण्यासाठीचे कार्य का केले....? कारण वैदिक धर्म पंडितांचा हिंदू धर्म त्याकाळी होता का असा प्रश्न आता रयतेला पडलेला आहे.त्याचे कारण असे आहे की,हिंदू धर्माची अधिष्टान हे ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण गौरी गणपती आहेत.परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी त्यांची उपासना केल्याचे किंवा त्यांना मान्य केल्याचे कुठेही पुरावे उपलब्ध नाहीये.आणि फुले शाहू आंबेडकर यांनी कधीही यांना मान्यता दिल्याचे दिसून येत नाही.आपण सर्व सिंधू धर्मीय आहोत म्हणजे सभ्यता असणाऱ्या देशाचे नागरिक आपले कुलदैवत राम कृष्ण नसून खंडोबा ज्योतिबा आहेत.मग आपल्या मुखात “जय श्रीराम” का येते असे प्रश्न उद्या रयत आपल्या मराठा नेत्यांना आणि दलित नेत्यांना विचारणार आहे.म्हणून त्यांना ३८ दिवसांचा प्रवास नकोसा वाटत आहे.

No comments:

Post a Comment