Tuesday, February 20, 2018

आज अटकेचा एकविसावा दिवस (२१) २१ फेब्रुवारी १६८९ बहादूरगड याठिकाणी अटकेत असलेल्या संभाजीराजे यांना भेटण्यास औरंगाजेब आला होता....! रायप्पा महार वीरगतीला प्राप्त झाल्याची खबर औरंगाजेबाने संभाजीराजे यांना दिली....ही खबर रायगडा वरील महाराणी येसूबाई यांनाही कळाली होती.......! आज वैदिक धर्म पंडिताकडून संभाजीराजे यांचे डोळे फोडून त्यांना शाररीक अपंग करण्यात येऊन स्वराज्यात अंधार पसरविण्यात आला....! राजेश खडके



संभाजीराजांच्या आज अटकेचा २१ वा दिवस होता.गेल्या १७ तारखेपासून मी लिखाण बंद केले होते कारण छत्रपती शिवराय यांचा १९ फेब्रुवारी हा जयंती उत्सव समतावादी पर्व म्हणून मोठ्या उत्साहात साजरी होणार होता.त्या उत्सवामध्ये संभाजीराजांचा अटकेचा प्रवास लिहिणे मला पटत नव्हते.परंतु कार्य तर केले पाहिजे या भावनेने पुन्हा एकदा मी आजपासून त्यांचा अटकेचा प्रवास सुरु केले आहे.कारण त्याकाळी काय काय घडले याचा एक मावळा म्हणून मला शोधायचे आहे.रयतेलाही समजले पाहिजे वैदिक धर्म पंडिता बरोबर स्वराज्याचे गद्दार कोण कोण होते.ज्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना मनापसून वाचविण्यासाठी प्रयत्न केले परंतु अपयशी ठरले त्यांच्या वतीने मी (राजेश खडके) माता जिजाऊ यांच्या चरणी एक दिवसांचे आत्मक्लेश केले आहे.परंतु जे स्वराज्याचे गदार होते आणि आजही आहेत त्यांना आपण शोधले पाहिजे असे माझे मत आहे.मग ते मोठ्या घराण्यातील असोत किंवा अठरा अलुतेदार यांच्या मधील असोत ते रयते समोर उघड झाले पाहिजे या मताचा मी आहे.आज अटकेत असलेल्या संभाजी महाराज यांना औरंगाजेब भेटायला आला होता त्याने सांगितले की “हे राजा तुझ्यावर प्रेम करणारी रयत मोठ्या प्रमाणात आहे तुझ्यावर जीव देणारे भरपूर आहेत” याची मला खबर स्वराज्याच्या स्वार्थी गद्दारानी दिली होती.आणि तुझ्या सारखा राजा कोणी होऊ शकत नाही असे म्हणत औरंगाजेब संभाजीराजे समोर गुडघ्यावर उभा राहिला.तो म्हणाला की आता तुम्ही छत्रपती राहिला नाहीत त्यामुळे तुमचे वैर आता राहिले नाही.परंतु तुम्हाला जिवंत सोडणे हे आम्हाला शक्य नाही आणि ज्या गद्दरानी आम्हाला मदत केली आहे त्यांचेही हेच म्हणणे आहे.त्यामुळे त्यांचे असे म्हणणे आहे की,तुम्हाला आम्ही आमच्या धर्माप्रमाणे शिक्षा देऊ शकत नाही.त्यामुळे मी तुम्हाला देहदंडाची शिक्षा देऊन त्यांच्या स्वाधीन करणार आहे.त्याचे कारण असे होते की,वैदिक धर्म पंडितांचा संभाजीराजावर खूप मोठा राग होता.कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हत्येच दोषी धरून त्याने त्यांचे पूर्वज यांना देहदंडाची शिक्षा दिली होती.आणि जर आता संभाजीराजे यांना जिवंत जर सोडले तर ते आपल्याला जिवंत सोडणार नाहीत याची पूर्ण कल्पना त्यांना होती.औरंगाजेबाचे ते बोलणे एकूण वैदिक धर्म पंडित घाबरले होते त्यांना वाटले की,आता संभाजीराजे यांना औरंगाजेब जिवंत सोडणार कारण ते छत्रपती राहिले नव्हते.त्यामुळे औरंगाजेबाचे मन बदलायच्या आत संभाजीराजे यांना सोड्याचे नाही तेव्हा त्यांनी घाई घाईने संभाजीराजे यांचे डोळे फोडून त्यांना शाररीक अपंग केले तो दिवस होता २१ फेब्रुवारी १६८९ या दिवसानंतर औरंगाजेबाची संभाजीराजे यांची कधीही भेट झाली नाही.त्यामुळे आजचा दिवस स्वराज्यासाठी अतिशय दु:खाचा दिवस आहे कारण आज स्वराज्यात अंधार पसरला होता.डोळ्यांनी अपंग केलेले छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यासाठी जीव सोडीत नव्हते.

No comments:

Post a Comment